Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 5 June 2011

भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे

‘गोवा बंद’साठी आवाहन
पणजी, दि. ४ : भारतीय भाषा सुरक्षा मंचाने पुकारलेल्या सोमवार दि. ६ जूनच्या ‘गोवा बंद’ला संपूर्ण गोव्यातून उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. मंचाच्या कार्यकर्त्यांना गोव्यातील सर्व स्तरांवरील, विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी प्रत्यक्ष संपर्क साधणे कठीण आहे. म्हणूनच भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे निमंत्रक शशिकला काकोडकर यांनी आवाहन केले आहे की, गोव्यातील सर्व...
- विद्यार्थी, पालक, व्यवस्थापन मंडळ
- औद्योगिक आस्थापने, कर्मचारी
- सरकारी कचेर्‍या, सरकारी कर्मचारी, अधिकारी
- खाजगी प्रवासी वाहने, वाहक, चालक, टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी
- बसमालक संघटना, प्रवासी
- सर्व प्रकारची दुकाने, दुकानदार
- बँका, कर्मचारी वर्ग
- हॉटेल मालक व कर्मचारी
- फळविक्रेते, भाजी, फुले, मासे व अन्य वस्तू विक्रेते
- राजकीय पक्षांचे भारतीय भाषा प्रेमी कार्यकर्ते व नेते
- पोलिस व होमगार्ड कर्मचारी
या घटकांनी व्यक्तिशः सहभागी होऊन हा बंद शांततापूर्ण रीतीने पूर्णतः यशस्वी करावा.

No comments: