Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 9 June 2011

संजय स्कूलच्या प्राचार्य व्हिएगस यांची बदली

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): गेली अनेक वर्षे पर्वरी येथील संजय स्कूल या मूकबधिरांच्या शाळेत प्राचार्य म्हणून काम करणार्‍या ए. व्हिएगस यांची अचानक बदली करण्यात आल्याबद्दल सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे येथे कार्यरत असलेल्या व बालभवनाच्या अध्यक्षा विजयादेवी राणे यांच्या मर्जीतील म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्हिएगस यांची बदली अचानक झाल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सदर बदली ही सौ. राणे यांच्याच सांगण्यावरून झाल्याचे बोलले जात असून तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.

No comments: