पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): सुवर्णा नाईक हिचा खून केल्याचा गुन्हा आज तिचा पती, दीर, सासू आणि सासरे यांच्यावर नोंद करण्यात आला आहे. मयत सुवर्णाचा तिच्या सासरच्याच लोकांनी खून केल्याचा दावा करून चौघांवरही खुनाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी ‘सवेरा’ या संघटनेने केली होती. तसेच, खुनाचा गुन्हा नोंद न केल्यास पोलिस स्थानकावर मोर्चा आणण्याचाही इशारा देण्यात आला होता.
सुवर्णा हिचे गळ्यातील मंगळसूत्र गायब असल्याने त्याच मंगळसूत्राद्वारे तिचा गळा आवळून खून केल्याचा दावा तारा केरकर यांनी केला आहे. तसेच, गळफास घेण्यासाठी उभे राहण्यास लागणारे स्टूलही त्या ठिकाणी नव्हते. त्यामुळे तिला आधी मारून नंतर गळफास देण्यात आला असावा, असा आरोप केरकर यांनी करून तिच्या सासरच्या लोकांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती.
पोलिसांनी सुवर्णाचा पती ब्रिजेश नाईक याच्यासह दीर, सासू आणि सासर्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला. सध्या चौघेही संशयित पोलिस कोठडीत आहेत. तर, सुवर्णा हिची सहा महिन्याची मुलगी अपना घरात पाठवण्यात आली आहे. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस करीत आहेत.
Friday, 10 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment