Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 8 June 2011

कामत सरकारविरोधात आजपासून निषेध सभा

भाजपची जागृती मोहीम
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): गोव्यातील कॉंग्रेसप्रणीत आघाडी सरकारला उद्या (दि.८) चार वर्षे पूर्ण होत आहेत. या चार वर्षांत सर्वच आघाड्यांवर कॉंग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याचा निषेध म्हणून गोवा भाजपतर्फे उद्या बुधवार ८ जून ते ११ जून या दरम्यान विविध ठिकाणी निषेध सभांचे आयोजन केले आहे. यात उद्या ८ रोजी एकूण पाच सभा होणार आहेत. यात मये मतदारसंघात देवकीकृष्ण सभागृह, पांडववाडा चोडण येथे संध्याकाळी ५ वा. पहिली सभा होईल. त्यानंतर प्रियोळ मतदारसंघात दोन सभा होणार असून म्हार्दोळ बाजारात संध्याकाळी ६.३० व दुसरी सभा माशेल बाजारात संध्याकाळी ७ वा. होणार आहे. तसेच सांताक्रुज मतदारसंघातील सातेरी मंडप पेरीभाट मेरशीत संध्याकाळी ६.३० वा. पहिली सभा तर रात्री ८ वा. दुसरी सभा हनुमान मंदिर मंडप चिंबल येथे होणार आहे.
या सभांतून गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, प्रदेश प्रवक्ता राजेंद्र आर्लेकर उपाध्यक्ष प्रकाश वेळीप, उपाध्यक्ष अनिल होबळे, आमदार दामोदर नाईक, प्रदेश सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर, प्रदेश सचिव ऍड. विश्‍वास सतरकर, आमदार अनंत शेट, आमदार रमेश तवडकर उपस्थितांना मार्गदर्शन करतील
भ्रष्टाचार, विविध घोटाळे, बेकायदा खाण व्यवसाय, कॅसिनो, उच्च सुरक्षा क्रमांक पट्टी घोटाळा, पाण्याच्या टाक्यांचा घोटाळा, कावरे रास्ता रोको, बाळ्ळी हत्याकांड प्रकरण, माध्यम प्रकरण बारावीच्या गुणपत्रिकांतील घोळ, चोर्‍या, खून, प्रार्थना स्थळांची मोडतोड व चोर्‍या अशा अनेक घटनांच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या या निषेध सभांत आम जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे.

No comments: