Friday, 10 June 2011
पंतप्रधानांची संपत्ती जाहीर
नवी दिल्ली, दि. ९ : मंत्रिमंडळातील आपल्या सर्व सहकार्यांनी आपली संपत्ती जाहीर करावी असे निर्देश दिल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीदेखील आपली संपत्ती जाहीर केली असून, पंतप्रधानांकडे दोन घरांसह सुमारे २.७ कोटींच्या मुदती ठेवी आहेत. पंतप्रधानांच्या वेबसाईटवर या संपत्तीचा खुलासा करण्यात आला आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे चंदीगड येथे ९० लाख रुपये किमतीचे घर आणि दिल्लीच्या वसंत कुंज परिसरात ८८ लाख रुपये किमतीचा एक फ्लॅट आहे. पंतप्रधानांकडे असलेला सगळा पैसा भारतीय स्टेट बँकेत जमा आहे. घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर आपल्या मंत्रिमंडळातील सर्व सहकार्यांनी आपली व कुटुंबाची संपत्ती आणि व्यावसायिक प्रपिष्ठानांमधील हितसंबंध जाहीर करावे, असे निर्देश पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी काही दिवसांपूर्वीच दिले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment