Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 6 June, 2011

लोकशाहीला कलंकित करणारी घटना : गडकरी

-भाजपची पंतप्रधान, सोनियांवर टीका
लखनौ, दि. ५
भ्रष्टाचाराविरुद्ध बाबा रामदेव यांनी सुरू केलेले आंदोलन चिरडण्यासाठी करण्यात आलेल्या पोलिस कारवाईचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीव्र निषेध केला असून, या दडपशाहीच्या निषेधात संपूर्ण देशभरात २४ तासांचा सत्याग्रह करण्याची घोषणा केली आहे.
रामलीला मैदानावर आंदोलन करणार्‍या निष्पाप नागरिकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारामुळे आणिबाणीच्या आठवणी ताज्या झाल्या असून, भ्रष्टाचारासारख्या गंभीर मुद्यावर लोकशाही मार्गाने चर्चा न करता याविरुद्ध उठणारा आवाज दडपण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी लखनौ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसारच ही पोलिस कारवाई करण्यात आली, असा आरोप गडकरी यांनी केला असून, पंतप्रधान मनमोहनसिंग आणि सोनिया गांधींनी यासाठी देशाची माङ्गी मागावी, अशी मागणी केली आहे. या पोलिस कारवाईचा निषेध करण्यासाठी भाजपातर्ङ्गे देशभरातील सर्व जिल्हास्थानांवर २४ तासांचा सत्याग्रह करण्यात येणार असल्याची घोषणा गडकरी यांनी यावेळी केली. सरकारने परवानगी नाही दिली तरीही भाजपा कार्यकर्ते राजघाटवर आंदोलन करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचाराच्या मुद्याचे राजकारण करणे योग्य नसून, काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा सर्वप्रथम भाजपानेच उचलून धरला होता. या मुद्यांवर होणार्‍या कुठल्याही आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा असेल, असेही गडकरी यांनी सांगितले.

No comments: