• रामदेव बाबांवरील हल्ल्याचा निषेध
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): ‘सोनिया गांधी मुर्दाबाद! मनमोहन सिंग खुर्ची छोडो! कपिल सिब्बल हाय हाय! दादागिरी नही चलेगी! अत्याचारी केंद्राचा निषेध असो! कॉंग्रेस पक्ष मुर्दाबाद! अशा जोरदार घोषणा देत भारत स्वाभिमान एवं पतंजली योग समिती गोवाच्या सदस्यांनी व देशप्रेमी नागरिकांनी आज पणजी दणाणून सोडली.
रामलीला मैदानावर ‘भ्रष्टाचार मिटाओे’साठी उपोषणाला बसलेल्या रामदेव बाबा व त्यांच्या हजारो अनुयायावर दिल्ली पोलिसानी जो रविवारी मध्यरात्री जो हल्ला केला होता, त्याचा निषेध करण्यासाठी ‘भारत स्वाभिमान’ गोवा व इतर स्वयंसेवी संघटनांच्या सदस्यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. आझाद मैदानावर सुरू झालेला हा मोर्चा नॅशनल चौक, चर्च स्क्वेअर, सांतीनेज, काकुलो चौक असा फिरून पुन्हा आझाद मैदानावर आला. येथे त्याचे सभेत रुपांतर झाले. सभेत ह. भ. प. उदयबुवा फडके, कमलेश बांदेकर आदिंनी पोलिस कारवाईचा निषेध केला.
राज्यपालांना निवेदन
भारत स्वाभिमानच्या सहा सदस्यीय पथकाने राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची आज भेट घेतली व रामलीला मैदानावरील कारवाईचा निषेध करणारे निवेदन त्यांना दिले. सदर निवेदन राष्ट्रपतीपर्यंत पोहोेचवण्याची विनंती केली. राज्यपालांना भेटून आल्यानंतर भारत स्वाभिमानाचे सहनिमंत्रक कमलेश बांदेकर यांनी राज्यपालांनी सदर घटनेबद्दल खेद व्यक्त केल्याचे सांगितले.
दरम्यान भारत स्वाभिमानाचे आझाद मैदानावर सुरू असलेले लाक्षणिक उपोषण रामदेव बाबांच्या हरिद्वार येथील उपोषणापर्यंत सुरूच राहणार असल्याचे कळते.
Wednesday, 8 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment