म्हापसा, दि. १० (प्रतिनिधी): म्हापसा थिवी येथील लक्ष्मी नारायण मंदिर फोडून सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला. म्हापसा पोलिसांनी यासंबंधी माहिती दिली. पोलिस निरीक्षक राजेश कुमार यांनी याबाबत सांगितले की, काल रात्री पोलिस थिवी येथे गस्तीवर गेले असता त्यांनी रात्री एकच्या सुमारास त्यांनी मंदिराच्या रजिस्टरवर सही केली होती. त्यानंतर रात्री २.३० च्या दरम्यान पुन्हा तेथून पोलिस जात असताना त्यांना मंदिराचा दरवाजा उघडा दिसला. पोलिसांनी पुढे जाऊन पाहिले असता मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्वरित म्हापसा पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे उघड झाले.
मूर्तीच्या मागील प्रभावळ, मुकुट आणि इतर चांदीचे सामान चोरट्यांनी चोरल्याची तक्रार देवस्थानचे अध्यक्ष हनुमंत आंबेकर यांनी म्हापसा पोलिसांत दिली आहे. या चोरीत सुमारे आठ लाखांची चोरी झाल्याची तक्रार श्री. आंबेकर यांनी केली असून म्हापसा पोलिस याबाबत तपास करत आहेत.
Saturday, 11 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment