लंडन, द. ९ : आपल्या भन्नाट चित्रांसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले, तितकेच वादग्रस्त ठरलेले आणि ‘भारताचे पिकासो’ म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात चित्रकार मकबुल ङ्गिदा हुसेन यांचे आज लंडन येथील एका रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
वृद्धापकाळामुळे गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर लंडमधील रॉयल ब्रॉम्पटन या रुग्णालयात उपचार सुरू होते. स्थानिक वेळेनुसार पहाटे अडीच वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता) हुसेन यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
राज्यसभेचे माजी सदस्य असलेले आणि ‘पद्मविभूषण’ या देशाच्या दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले एम. एङ्ग. हुसेन यांनी २००६ मध्ये हिंदू देवी-देवतांची आक्षेपार्ह चित्रे काढली होती. या चित्रांमुळे कायदेशीर अडचणीत सापडल्यानंतर आणि मृत्यूदंडाची धमकी मिळाल्यानंतर हुसेन यांनी भारत सोडला होता. भारतातून बाहेर गेल्यानंतर त्यांनी युरोप, अमेरिका आणि खाडी देशांमध्ये वास्तव्य केले. देवी दुर्गा आणि देवी सरस्वतीचे आक्षेपार्ह चित्र काढल्यानंतर संतप्त जमावाने त्यांच्या घरावर जोरदार हल्ला चढवून त्यांच्या चित्रांची नासधूस केली होती. त्यांच्या आक्षेपार्ह चित्रांमुळे त्यांच्यावर हरिद्वार येथील न्यायालयाने समन्स बजावला होता. पण, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने न्यायालयाच्या आदेशावरून त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली होती.
गेल्या वर्षी त्यांनी कतार या खाडी देशाचे नागरिकत्व स्वीकारले होते. तिथून इंग्लंड येथे आलेले हुसेन गेल्या दीड महिन्यांपासून अतिशय आजारी होते. त्यांना रॉयल ब्राम्पटन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज याच रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर केव्हा आणि कुठे अंत्यसंस्कार करायचे, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
महाराष्ट्रातील पंढरपूर येथे १७ सप्टेंबर १९१५ रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांची अनेक चित्रे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड लोकप्रिय ठरली. मोठमोठ्या प्रदर्शनांमध्ये त्यांच्या अनेक चित्रांना प्रचंड किंमत मिळाली होती. त्यांच्या अलीकडील तीन चित्रांना एका लिलावात २.३२ कोटी रुपये किंमत मिळाली होती. यातील ‘घोडा आणि महिला’ या चित्राला १.२३ कोटी रुपये किंमत लागली होती. चित्रकला क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे भारत सरकारने त्यांना १९५५ मध्ये ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित केले होते. १९६७ मध्ये त्यांनी ‘थ्रो द आईज ऑङ्ग द पेंटर’ या आपल्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाने बर्लिन चित्रपट महोत्सवात गोल्डन बीअरचा पुरस्कार पटकावला होता. १९७३ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९८६ मध्ये त्यांना राज्यसभेवर मनोनित करण्यात आले होते आणि १९९१ मध्ये त्यांना ‘पद्म विभूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
जगात कुठेही नेहमी अनवाणीच ङ्गिरणार्या हुसेन यांनी ‘हम आपके है कोन’ या चित्रपटावर प्रचंड ङ्गिदा होत या चित्रपटाची नायिका आणि युवा दिलांची धडकन माधुरी दीक्षित हिला सोबत घेऊन ‘गजमामिनी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.
राष्ट्रपती, पंतप्रधानांना दु:ख
राष्ट्रपती प्रतिभा पाटील, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हुसेन यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. हुसेन यांचे निधन म्हणजे राष्ट्रीय हानी असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
Friday, 10 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment