Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 5 June 2011

विवाहितेची आत्महत्या?

पणजी, दि.४ (प्रतिनिधी)
पणजी येथे सुवर्णा ब्रिजेश नाईक (२७) हिने आज आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. सुवर्णा हिच्या माहेरच्या लोकांनी तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून हा छळाचा प्रकार असण्याची शक्यता वर्तविली असली तरी अद्याप तशी लेखी तक्रार केली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सुवर्णा ब्रिजेश नाईक हिच्या विवाहाला १ वर्ष सात महिने झाले आहेत. आज संध्याकाळी ५.३० वाजता तिने आपल्या बेडरूमातील पंख्याला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या ठिकाणी तिने कोणतीही चिठ्ठी ठेवली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी साबाजी शेटये यांनी भेट देऊन या घटनेची पाहणी केली. पणजी पोलिस या घटनेची अधिक चौकशी करीत आहेत.

No comments: