Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 12 March 2011

शक्तिशाली भूकंपाने जपान उद्ध्वस्त


• भूकंपापाठोपाठ त्सुनामीच्या ३३ फूटी लाटा • हजारो ठार
• ४५ लाख इमारती जमीनदोस्त • भूकंपाची तीव्रता ८.९
• २० देशांना त्सुनामीचा धोका • भारताला धोका नाही


टोकियो, दि. ११
संपूर्ण उत्तर जपानला आज सकाळी महाशक्तिशाली भूकंपाचा हादरा बसला. रिश्टर स्केलवर ८.९ इतकी तीव्रता असलेल्या भूकंपापाठोपाठच महाविनाशी त्सुनामीच्या सुमारे ३३ फूट उंच लाटांनी सर्वत्र हाहाकार माजविला. समुद्राचे पाणी ईशान्येकडील अनेक शहरांमध्ये अनेक किलोमीटर आतपर्यंत घुसले असून, सुमारे ४० लाख इमारती जमीनदोस्त झालेल्या आहेत. या भूकंपाने अनेक इमारती आणि कारखान्यांना आगी लागल्या असून, इचिहारा तेल शुद्धीकरण केंद्रही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. सुमारे ८० ठिकाणी भीषण आगी लागल्याचे वृत्त आहे. जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहरापासून ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मियामी शहराजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपात नेमकी किती प्राणहानी झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकृत सूत्रांनी मात्र, आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक जखमी झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोक बेपत्ता झाले असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सुमारे २० देशांना त्सुनामीपासून मोठा धोका होऊ शकतो मात्र भारताला त्सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जपानचा किनारपट्टीचा भाग या भूकंपाने आणि त्सुनामीच्या लाटांनी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. असंख्य वाहने, लहान नौका, छोटी विमाने आणि मोठी जहाजेही त्सुनामीच्या लाटांवर तरंगत बर्‍याच दूर वाहून गेल्या. मियागी प्रांतातील केसेन्नुमा शहर आणि फुकुशिमा शहर पूर्णपणे पाण्याच्या विळख्यात सापडले आहे. १९९५ नंतर जपानने इतका महाशक्तिशाली भूकंप प्रथमच अनुभवला आहे.
या भूकंपामुळे आणि त्सुनामीमुळे नेमके किती नुकसान झाले, किती लोकांचा बळी गेला आणि किती जखमी झाले, याचा आढावा घेण्यासाठी तसेच मदत व बचाव कार्य हाती घेण्यासाठी जपान सरकारने ९०० चमू तयार केल्या आहेत.
८.९ इतक्या तीव्रतेचा पहिला धक्का आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार ११.१६ वाजता) बसला.

गुंड प्रवृत्तीला उखडून टाका


पर्रीकरांचे आवाहन

‘पणजी फर्स्ट ’ चा विजय निश्‍चित

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)
भूमाफिया, मनी लँडर व गुंड प्रवृत्तीला राजकारणातून उखडून टाकण्याची नामी संधी पणजीवासीयांना महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले. बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधाची लाट संपूर्ण महापालिका क्षेत्रात पसरली आहे. पणजी शहराचे हित कशात आहे याची खात्री पणजीकरांना झाल्याने ‘पणजी फर्स्ट ’ पॅनलला स्पष्ट बहुमत निश्‍चित आहे, असा ठाम आत्मविश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत ताळगावाचे भाजप नेते आग्नेलो सिल्वेरा हजर होते. महापालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने बहुतांश भागांत प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेतल्या असता मतदारांनी प्रकट केलेल्या भावना अत्यंत बोलक्या ठरल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले. महापालिका निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची याचा दृढ निश्‍चय मतदारांनी यापूर्वीच बनवला आहे व त्याचे सकारात्मक पडसाद निवडणूक निकालातून दिसून येतील. पणजीकरांचा कल आपल्या विरोधात जात असल्याची जाणीव बाबूश यांना झाल्यानेच ते आता गुडांकरवी मतदारांना धमकावण्याचे व मतदारांवर दबाव आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. पणजीचे पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर हे राजकीय दबावाखाली वावरत असून राज्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी व त्यांच्याजागी अन्य अधिकार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणीही पर्रीकर यांनी केली. सभ्यतेचा बुरखा पांघरून वावरणारे बाबूश आता महापालिका निवडणुकीत आपला पराभव डोळ्यांसमोर पाहून अस्वस्थ बनले आहेत. याचे परिणाम म्हणूनच त्यांनी गुंडांना हाताशी धरून दहशत पसरवण्याचे जोरदार प्रयत्न चालवल्याची टीका पर्रीकर यांनी केली.
ताळगावचा संपूर्ण विकास झाल्याच्या बाता किती खोट्या आहेत याची प्रचितीच या भागांत फिरल्यानंतर झाल्याचे पर्रीकर म्हणाले. इथे पाणी टंचाई, विजेचा लपंडाव, रस्त्यांची दुर्दशा व कचर्‍याची भीषण परिस्थिती उद्भवल्याचे प्रकर्षाने दिसून आले. ताळगावातील जनता या परिस्थितीमुळे त्रस्त बनली आहे. भाजपकडून या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यापुढे ताळगावात भाजप सक्रिय होणार असून या मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजप गंभीरपणे वावरणार असल्याचे पर्रीकर यांनी जाहीर केले. या भागातील एका व्यक्तीने वृत्तपत्रांत बाबूश मोन्सेरात यांच्यावर सडकून टीका केल्याने या व्यक्तीच्या घरासमोरील झाडांच्या कुंड्या फोडून टाकण्याची कृती घडल्याचे पर्रीकर म्हणाले. ऍड. आयरिश रॉड्रगीस यांच्यावर हल्ला प्रकरणातील प्रमुख संशयित संदीप वायंगणकर याच्या दहशतीबाबत तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई करण्यास हयगय होत असल्याचे ते म्हणाले. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना खबरदारी म्हणून ताब्यात घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाने मतदानादिवशीच मतमोजणी हाती घेण्याची सर्व तयारी केल्याने त्यात बदल करण्याची आवश्यकता नाही, असे मत पर्रीकर यांनी व्यक्त केले. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. गुडांवर कडक कारवाई केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवण्याची काहीच गरज नाही, असेही ते म्हणाले. बाबूश मोन्सेरात यांना एकदा पोलिसांनी आपला हिसका दाखवला आहेच, त्यामुळे आता वेगळी पद्धत अवलंबण्याची अजिबात गरज भासणार नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. राजकारणात धोकादायक ठरू शकणार्‍या या वृत्तीचा कायमचा निकाल पणजीकरांनी लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रभाग क्रमांक १८ मध्ये माजी महापौराच्या घरामागे सांडपाण्याचा डबकाच साठला आहे. प्रभाग १६ मध्ये टी. बी. इस्पितळ वसाहतीत मोठा कचर्‍याचा ढीग निर्माण झाला आहे. गोवा विद्यापीठाच्या रस्त्यालगत काय परिस्थिती झाली आहे ती पाहायलाच नको, असे सांगून ताळगावाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचेच दिसून आले, असेही पर्रीकर म्हणाले.

बगल रस्त्यावरून पंचवाडीत दोन गटात हाणामारी

• चर्चिल यांना घेराव • परस्पर विरोधी तक्रार

फोंडा व सावर्डे, दि. ११ (प्रतिनिधी)
पंचवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील सेझा गोवा कंपनीच्या नियोजित बगल रस्ता आणि बंदर प्रकल्पाच्या नियोजित जागेच्या पाहणीच्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चील आलेमाव यांनी केलेल्या कथित वक्तव्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण होऊन मारहाणीची घटना घडली असून यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. बगल रस्ता व बंदर प्रकल्पाला विरोध करणार्‍या लोकांनी मंत्री श्री. आलेमाव यांना घेराव घातला. रस्ता वाहतुकीसाठी बंद करून सदर प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी पंचवाडी बचाव समितीचे क्रिस्तेव डिकॉस्टा आणि श्रीमती मारिया आगोस्तीन कॉस्ता यांनी परस्पर विरोधी तक्रारी फोंडा पोलिस स्थानकावर दाखल केल्या आहेत.
पंचवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातून खनिजाची वाहतूक करण्यासाठी बगल रस्ता व बंदर प्रकल्प उभारण्यासाठी सेसा गोवा कंपनीने प्रयत्न चालविले आहेत. ह्या प्रकल्पामुळे गावातील पर्यावरणाचा र्‍हास होणार असल्याने पंचवाडी बचाव समितीच्या झेंड्याखाली नागरिक एकत्र आले असून या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक लोकांनी यापूर्वी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या पणजी येथील निवासस्थानाजवळ निदर्शने करून त्यांना निवेदन सादर करून बगल रस्ता व बंद प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. पंचवाडी बचाव समितीतर्फे गेल्या कित्येक महिन्यापासून ह्या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. खनिज वाहतूक करण्यासाठी नव्याने तयार करण्यात येणार्‍या बगल रस्त्यामुळे पंचवाडी गावातील शेती, बागायतीची हानी होणार असल्याने ह्या बगल रस्त्याला विरोध केला जात आहे. ह्या रस्त्यामुळे काजू व इतर झाडांची कत्तल होणार असल्याने लोकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ह्या नियोजित रस्त्याची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
ह्या बगल रस्त्याची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चील आलेमाव सरकारी अधिकार्‍याच्या समवेत शुक्रवार ११ मार्च रोजी सकाळी पंचवाडी गावात आले होते. यावेळी स्थानिक आमदार महादेव नाईक उपस्थित होते. नियोजित बगल रस्त्याच्या जागेची पाहणी केल्यानंतर मंत्री श्री. आलेमाव यांनी विचार मांडताना काही आक्षेपार्ह विधाने केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे प्रकल्प विरोधकांनी मंत्री आलेमाव यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. त्यानंतर बगल रस्ता व बंदर प्रकल्प समर्थक व विरोधक यांच्यात मारामारीची घटना घडली. ह्या प्रकल्पाला विरोध करणार्‍या लोकांनी रस्ता फोंडा - सावर्डे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून सेझा कंपनीचा नियोजित बगल रस्ता व बंदर प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने मंत्री आलेमाव यांनी सावर्डेमार्गे मडगावाला परत जाणे पसंत केले.
पंचवाडी बचाव समितीचे क्रिस्तेव डिकॉस्टा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत पन्नास लोकांनी समितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून दुखापत केली आहे असे म्हटले आहे. ह्या तक्रारीत १६ संशयितांची नावे देण्यात आली आहेत. तर मारिया कॉस्ता हिने आपण रस्त्यावरून जात असताना पन्नास जणांच्या जमावाने मारहाण करून दुखापत केली आहे, असे म्हटले आहे. तिने तिघांची नावे आपल्या तक्रारीत दिली आहेत.
ह्या घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पंचवाडी गावात निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी घटना टळली आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय दळवी, साहाय्यक उपनिरीक्षक श्री. नाळकर तपास करीत आहेत. याप्रकरणी अद्यापपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मतमोजणी १३ रोजीच

निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा सज्ज

कायदा सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलिस तैनात

पणजी, दि. ११(प्रतिनिधी)
पणजी महापालिका निवडणूक मतमोजणी १३ रोजीच होईल अशी ठाम भूमिका घेत कायदा सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलिस कुमक घेण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पोलिसांना दिले आहेत. मतमोजणीच्या दिवशी रात्रीच्या वेळी विजयी मिरवणुका काढण्यास तसेच फटाके लावण्यास बंदी घालून महापालिका क्षेत्रात १४४ कलम लागू करण्यात आल्याचे उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी सांगितले.
पणजी महापालिका निवडणूक तयारीच्या सज्जतेची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. वर्धन बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव एस. वाय. परब व निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी साबाजी शेटये हजर होते.
पणजी महापालिका क्षेत्रातील मतदारसंख्या ३२०९० असून तीस प्रभागांसाठी ६८ मतदानकेंद्रे असतील. मतदानासाठी मतदान यंत्रांचा वापर केला जाणार असून प्रत्येक मतदान केंद्रांवर किमान तीन मतदान यंत्रे ठेवण्यात येणार असल्याने जादा वेळ रांगेत राहावे लागणार नाही. पणजी महापालिका क्षेत्रातील मतदारांत ८६ अपंगांचा समावेश असून त्यांना मतदानासाठी विशेष खुर्चीची सोय केली जाणार आहे. मतदारयादीतील ८६ मतदार मृत झाल्याची नोंद आहे व या लोकांच्या नावे कुणी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला तात्काळ अटक करण्यात येणार असल्याचेही श्री. वर्धन म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांची मतदारसंख्या ६६५० आहे. बेपत्ता मतदारयादीत ३७८ मतदारांचा समावेश आहे तर कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेल्या १६ मतदारांची नोंद आहे. प्रत्येक मतदाराला ओळखीसाठी पुरावा सादर करावा लागणार आहे. मतदान देखरेख पद्धत (पीएमएस) यंत्रणेद्वारे संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात येणार असून प्रत्येक मतदाराची संगणकावर नोंद होणार आहे. या पद्धतीत कोणत्याच प्रकारे बोगस मतदान होण्याची शक्यता नाही, असे श्री. वर्धन यांनी स्पष्ट केले. ११ क्षेत्रीय दंडाधिकार्‍यांसोबत ९ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी ४५० पोलिस, २२२ सुरक्षा जवान व १२० अतिरिक्त पोलिस कुमक कायदा सुव्यवस्थेवर नजर ठेवणार आहे. संवेदनशील म्हणून एकही प्रभाग नसले तरी काही ठरावीक ठिकाणी पोलिसांची करडी नजर राहणार आहे. येत्या चोवीस तासांत खबरदारी म्हणून काही जणांना अटक होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
मतमोजणीची माहिती मतदारांना मिळण्यासाठी चार ठिकाणी बड्या स्क्रीन लावण्यात येणार आहेत. त्यात गोवा मनोरंजन संस्था, मिरामार, कदंब बसस्थानक व आझाद मैदान आदी ठिकाणांचा समावेश असेल. लोकांनी मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी न करता याठिकाणी निकालाची माहिती मिळवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. www.northgoa.nic.in या संकेतस्थळावर मतमोजणीची इत्थंभूत माहिती टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे.

मतदान गुप्तच राहणार
काही ठिकाणी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदारांवर दबाव टाकण्यात येत असून ते कुणाला मते देतील याचे छायाचित्रण होणार असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात मतदान केंद्रावर येणार्‍या मतदाराचे संगणकावर छायाचित्रण होत असले तरी प्रत्यक्ष मतदान यंत्रावर मत देताना छायाचित्रण होणार नसून प्रत्येकाचे मतदान गुप्त राहणार आहे. मतदारांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Friday, 11 March 2011

ताळगावातील ‘कॉंक्रीट’ची जंगले कुणाची?


पुरोगामी शेतकरी संघाचा खडा सवाल

• सामान्यांना देशोधडीला लावण्याचा चंग


पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
ताळगावातील गरीब, कष्टकरी व शेती व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करणार्‍या लोकांना देशोधडीला लावण्याचा चंगच इथल्या लोकप्रतिनिधीने बांधला आहे. बिल्डर लॉबीशी लागेबांधे साधून शेतजमिनींचे बिगरशेतांत रूपांतर करून कॉंक्रीटची जंगले उभारण्यात येत आहेत. या गरीब जनतेच्या जमिनी हडप करून या लोकांना आपल्या दारांत भीक मागायला लावण्याचा निष्ठुरपणा करणार्‍या नेत्यांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवताना ताळगाव व पणजीवासीयांनी हजारवेळा विचार करावा, असे कळकळीचे आवाहन ताळगाव पुरोगामी शेतकरी संघाने केला आहे.
आज (दि.१०) इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघाचे अध्यक्ष झेवियर आल्मेदा यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी संघाचे सचिव ज्योकीम डिसोझा, खजिनदार कँडिडो डायस, पुंडलीक रायकर व अखिल गोवा कूळ व मुंडकार संघटनेचे सचिव राजीव नाईक हजर होते. ताळगावातील विविध शेतजमिनीत उभी होणारी बांधकामे व पर्यावरण संरक्षणाच्या कायद्यांची उघडपणे होणारी पायमल्ली याबाबत उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरण व मुख्य सचिव यांना निवेदने सादर करण्यात आली आहेत. हे प्रकार ताबडतोब थांबवले नाहीत तर पुढील परिणामांना संबंधित अधिकारीच जबाबदार ठरतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. ताळगावात भलेमोठे रस्ते शेतातून तयार करण्यात आले आहेत. हे रस्ते इथल्या सामान्य जनतेसाठी की बिल्डरांच्या भल्यासाठी हे लोकांनी तपासून पाहावे. इथल्या शेतजमिनी बुजवून व शेतातील पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्याच्या मार्गावर मातीचे भराव टाकून संपूर्ण शेतीच उद्ध्वस्त करण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकारांमुळे पर्यावरणीय समतोलच बिघडला असून विविध ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहेत. या डबक्यांत साचणार्‍या पाण्यामुळे रोगराईचाही फैलाव होत असून डासांची पैदास वाढल्याने या भागांत मलेरिया सारखे रोग पसरत चालले आहेत. या एकूण प्रकाराकडे नगर नियोजन खाते व नियोजन विकास प्राधिकरणाचे कोणतेही लक्ष नसल्याने या बेकायदा कृत्यांना तेच जबाबदार ठरतात, असा ठपकाही श्री. आल्मेदा यांनी ठेवला. अलीकडेच सर्वे क्रमांक १०५/१ व १०६/१ याठिकाणी नवीन व्यापारी संकुल उभे राहत आहे. या भागातील शेतातील निचरा सांतइनेज नाल्यात जाण्याचा हा मार्ग असून तो बंद झाला तर या भागातील संपूर्ण शेती नष्ट होईल, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.याठिकाणी सुमारे १५० एकर जमिनीत शेती करणारे शेतकरी उघड्यावर पडणार असून ही भरपाई अजिबात भरून येणारी नाही, असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. बाबूश मोन्सेरात यांच्या बंगल्याभोवतीचा भाग म्हणजेच ताळगाव असा आभास निर्माण केला जात असला तरी ताळगाव हा भाग अनेक टेकड्या व मच्छीमार वसाहतीने भरला आहे. या भागांत अनुसूचित जमाती व मच्छीमार बांधव राहतात. त्यांचे जीवनमान अजूनही सुधारलेले नाही. या लोकांसाठी काहीही न करता इथे भले मोठे रहिवासी प्रकल्प व व्यापारी संकुले उभारून या लोकांचे जगणेच हैराण करण्याचा डाव आखण्यात आला आहे.
ताळगाव पंचायत क्षेत्र ‘ओडीपी’ क्षेत्रात येत असल्याचे सांगून प्रादेशिक आराखडा २०२१ च्या रचनेत इथल्या लोकांची मते जाणून घेतली नाहीत. या ‘ओडीपी’ आराखड्यात शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात रूपांतर करण्यात येत असून त्यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. याप्रकरणी ताळगाव पंचायत तथा संबंधित सरकारी खात्यांच्या कारभाराचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

कोळसा प्रदूषण न रोखल्यास भाजप रस्त्यावर उतरणार

आर्लेकर यांचा पत्रपरिषदेत इशारा

वास्को, दि. १० (प्रतिनिधी)
येत्या आठ दिवसांत एमपीटीकडून वास्को शहरात होत असलेल्या कोळसा प्रदूषणावर नियंत्रण न आणल्यास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कडक आंदोलन छेडतील. असा इशारा भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी आज (दि.१०) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, वाहतूक खाते, तसेच एमपीटीने शहरात होणार्‍या कोळसा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी लवकरात लवकर उपाय योजना करावी अशी मागणी यावेळी श्री. आर्लेकर यांनी केली.
आज संध्याकाळी वास्को भाजप मंडळातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शहरात सध्या मोठ्या प्रमाणात कोळसा प्रदूषणाची समस्या असल्याची माहिती श्री. आर्लेकर यांनी दिली. याबाबत एमपीटी आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक दिवस येथील नागरिक हा त्रास सोसत असून कोळसा प्रदूषणाविरुद्ध भाजपने यापूर्वी विरोध केला असल्याची माहिती श्री. आर्लेकर यांनी दिली. ज्या ज्या वेळी एमपीटीला कोळसा हाताळणी काळजीपूर्वक करून प्रदूषणावर नियंत्रण आणण्यास सांगितले होते. तेव्हा तेव्हा यावर उपाय काढण्याचे आश्‍वासन देत याकडे दुर्लक्ष केल्याचे श्री. आर्लेकर म्हणाले.
प्रदूषणामुळे येथील अनेक लोक विविध आजारांना बळी पडत आहेत. एमपीटी व्यवस्थित कोळसा हाताळणी करत नसल्याने तसेच वाहतूक केला जाणारा कोळसा हा ट्रकातून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात नेण्यात येत असल्याने ह्या कोळशाचे प्रदूषण वास्को शहरात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, वाहतूक खाते, तसेच एमपीटीने याबाबत आता कडक उपाय योजावेत अशी मागणी श्री. आर्लेकर यांनी केली.
हल्लीच झालेल्या एका सर्वेक्षणात वास्कोत कोळसा प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे सिद्ध झाल्याची माहिती श्री. आर्लेकर यांनी यावेळी दिली. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत एमपीटीला उपाय काढण्यास सांगितले होते. एमपीटी जर ही जबाबदारी टाळत असेल तर प्रदूषण नियंत्रण मंडळाला ही कोळसा हाताळणी बंद करण्याचा अधिकार असून एमपीटकडून कारवाई करून घ्यावी असे आवाहन श्री. आर्लेकर यांनी केले.
श्री. आर्लेकर पुढे म्हणाले की, वाहतुकीच्या मार्गाने नेण्यात येत असलेल्या कोळशामुळे होणार्‍या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक खात्याने पावले उचलण्याची गरज आहे. रस्त्याच्या मार्गाने नेण्यात येणारा कोळसा हा ट्रकात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात असतो. त्याचा स्थानिकांना बराच त्रास होतो. गेल्या काही दिवसांपूर्वी वाहतूक खात्याने खनिज ट्रकांवर कारवाई केली होती. अशी मोहीम याबाबतही का करण्यात येत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच एमपीटीने चार वर्षापूर्वी रस्त्यावरून होत असलेली कोळसा वाहतूक बंद करून ती रेल्वेमार्गाने करण्याचे आश्‍वासन दिले होते. एमपीटी फक्त आश्‍वासनेच देत असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या आठ दिवसांत ही प्रदूषण समस्या दूर न केल्यास भाजप याविरुद्ध आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर पत्रकार परिषदेस भाजपचे प्रशांत नार्वेकर उपस्थित होते.

मतदानासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडा - डॉ. मोंतेरो

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)
पणजीच्या सुनियोजित विकासासाठी ‘पणजी फर्स्ट’ पॅनलची सत्ता पणजी महापालिकेवर येण्याची गरज असून पणजी शहराच्या हितासाठी पणजीच्या सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन फ्रेंडस् ऑफ गुड गव्हर्नन्सचे डॉ. रुफीन मोंतेरो यांनी केले आहे.
पणजी महापालिकेची निवडणूक दि.१३ मार्च रोजी होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या तीसही प्रभागात जोरदार प्रचार सुरू आहे. एकमेकावर कुरघोडी करत चालू असलेला हा प्रचार पाहता यावेळेेची निवडणूक बरीच चुरशीची होणार आहे असे वाटत आहे. त्यातच भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप झालेल्या मंत्री बाबूश समर्थक सत्ताधारी मंडळाला पराभूत करण्यासाठी व नव्या दमाच्या सुशिक्षित उमेदवारांचा भरणा असलेल्या ‘पणजी फर्स्ट ’पॅनलला निवडून आणण्यासाठी पणजीतील अनेक मान्यवर व सुशिक्षित ज्यांचा पणजी बरोबरच परिसरात बराच दबदबा व नाव आहे अशी मंडळी एकत्र आली आहेत. त्यातील जादातर लोकांनी ‘पणजी फर्स्ट‘ या पॅनलला निवडून देण्याचे आवाहन विविध माध्यमातून सुरू केले आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधारी गटाचे धाबे दणाणले आहेत.
समाजात मोठा मान असलेल्या या डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, समाजसेवक व माजी अधिकारी वर्गाने लोकांना केलेले आवाहन योग्य कारणी लागण्यासाठी पणजीतील सुशिक्षित तथा उच्चभ्रु मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडून मतदान करण्याची गरज ‘फ्रेन्ड्स ऑफ गुड गव्हर्नन्स’चे डॉ. रुफीन मोंतेरो यांनी व्यक्त केली आहे.
अनेक वेळा विविध स्तरावरील निवडणुकांत असे दिसून आले आहे की सर्वसामान्य लोक मतदानासाठी रांगा लावतात व मतदान करतात. मात्र उच्चभ्रु लोक मतदानासाठी रांगेत उभे राहावे लागते म्हणून मतदानास येण्यास टाळतात. मात्र पणजीतील सध्या स्थिती बदलून पणजीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी व पणजीच्या विकासासाठी सर्व पणजीकरांनी घराबाहेर पडावे व ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येेने मतदान करावे असे आवाहन ‘फे्रन्डस् ऑफ गुड ग्वहर्नन्स’ इतर अनेक मान्यवरांतर्फे करण्यात आले आहे.

पोलिस ड्रग प्रकणी केंद्र सरकार प्रतिवादी

पणजी, १० (प्रतिनिधी)
पोलिस ड्रग माफिया प्रकरणात केंद्र सरकारलाही प्रतिवादी करून घेण्यात आले असून आज केंद्र सरकारच्या वकिलाने या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यामुळे या प्रकरणावरील पुढील सुनावणी येत्या १७ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना ‘एनएसयुआय’ने हे प्रकरणात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यासाठी ही याचिका सादर केली आहे. आतापर्यंत यात राज्य सरकार, केंद्रीय गुन्हा अन्वेषण व राज्य पोलिस खात्याला प्रतिवादी करून घेण्यात आले आहे. गेल्यावेळी केंद्र सरकारलाही या प्रतिवादी करून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले होते.
पोलिस ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि बड्या राजकीय व्यक्ती गुंतल्याने या प्रकरणाची केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागामार्फतच चौकशी केली जावी, अशी याचना न्यायालयात करण्यात आली आहे. या प्रकरणाची याचिका न्यायालयात सादर होताच राज्य सरकारने एका आदेशाद्वारे हे प्रकरण केंद्र सरकारकडे पाठवून दिले होते. परंतु, अद्याप या प्रकरणाचा ताबा सीबीआयने घेतलेला नाही. केंद्र सरकारचे कोणतेही कर्मचारी या प्रकरणात गुंतलेले नाही, असा दावा करून सीबीआयाने गेल्यावेळी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. तसेच, अद्याप या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणताही आदेश मिळालेला नाही, असेही सीबीआयने गोवा खंडपीठाला कळवले होते.
याप्रकरणात इस्रायली ड्रग माफिया ‘अटाला’ आणि ‘दुदू’ गुंतलेले असून यात राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय यांच्यावरही आरोप झालेले आहेत. मात्र त्यांनी तो आरोप फेटाळून लावलेला आहे.

उद्योग उच्चाधिकार बैठकीत ७ प्रस्तावांना मंजुरी

• १०९.७८ कोटींची गुंतवणूक • ३४५ नवीन रोजगार

पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
उद्योग खाते उच्चाधिकार समितीच्या गेल्या ७ मार्च रोजी झालेल्या बैठकीत एकूण ७ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. सुमारे १०९. ७८ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार्‍या या प्रस्तावांत दोन नवीन उद्योग तथा उर्वरित विस्तारीकरणाचा समावेश आहे. या उद्योगांद्वारे ३४५ जणांना नवीन रोजगार तर २४६ जणांचे रोजगार नियमित होणार आहेत.
उद्योगमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखालील उद्योग उच्चाधिकार समितीची बैठक गेल्या ७ मार्च रोजी पर्वरी मंत्रालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील औद्योगिक विकासाचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, विविध उद्योगांना अतिरिक्त विजेची आवश्यकता आहे व ती पुरवण्यासंबंधी सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीसमोर असलेल्या प्रस्तावांपैकी ७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यात ‘मेसर्स स्वॅनसन प्लॅस्टिक्स (इंडिया) प्रा. लि.’ (१२.९० कोटी) व ‘मेसर्स मार्क बायोसायन्सीस लि.’ (३७.५२ कोटी) हे दोन नवीन उद्योग होंडा व पिळर्ण येथे सुरू होणार आहेत. या व्यतिरिक्त विस्तारीकरण करण्यात येणार्‍या उद्योगांत ‘मेसर्स खवंटो मायक्रोफाईन प्रोडक्ट्स लि., (पिसुर्ले सत्तरी), मेसर्स ग्वाला क्लोझर्स (इंडिया) प्रा. लि. ( हरवळे), मेसर्स क्रोम्पटन ग्रीव्हस लि. (कोलवाळ), मेसर्स मॅर्क लि. (फोंडा) यांचा समावेश आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील मेसर्स श्रद्धा इस्पात प्रा. लि. या कंपनीचे नोंदणीकरण नियमित करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

८ लाखांचे मोबाईल चोरल्याने एकास अटक

पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
पणजी येथील मोबाईल दुकानातून ८ लाख किमतीचे १६८ मोबाईल चोरल्याने मनीष महेश शर्मा (२४) वर्षीय तरुणाला आज पणजी पोलिसांनी अटक केली. या विषयीची पोलिस तक्रार झियोन लोबो यांनी नोंद केली आहे.
अधिक माहितीनुसार संशयित मनीष हा मेगनम सेंटरच्या तळमजल्यावर असलेल्या डिजिटल वर्ल्ड या मोबाईल दुकानात नोकरीला होता. सॅमसन या कंपनीतर्फे सेल्सबॉय म्हणून त्याची याठिकाणी नियुक्ती केली होती. केवळ सॅमसनचे मोबाईल विकण्यासाठी त्याला ठेवले होते. त्यामुळे सॅमसनचे मोबाईल त्याच्या ताब्यात होते. दि. २२ फेब्रुवारी रोजी दुकान मालकाने तपासणी केल्यानंतर शेकडो मोबाईल गायब असून त्यांची नोंदच मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी मनीष याच्याकडे चौकशी केली असता हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या चोरीला गेलेल्या मोबाईलची किंमत ८ लाख ४९ हजार ९४० रुपये होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी मनीष याला या मोबाईलचे सर्व पैसे भरण्याची सूचना करण्यात आली. परंतु, त्याने ती रक्कम भरली नसल्याने याविषयीची तक्रार पणजी पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.
संशयित मनीष याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक अर्जुन सांगोडकर करीत आहेत.

तीन वेगवेगळ्या अपघातात ३ ठार

डिचोली व म्हापसा, दि. १०(प्रतिनिधी)
डिचोली तालुक्यातील हरवळे व मायणा न्हावेली येथे दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात दोघेजण तर कळंगुट येथे एक महिला ठार झाल्याची घटना आज (दि.१०) घडली.
डिचोली पोलिस निरीक्षक हरीष मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हरवळे साखळी येथे एका दुचाकीने रस्त्याच्या बाजूला पलटी खाल्ल्याने सुरेश पांडुरंग पर्येकर (३२) हा नारायणनगर होंडा येथील इसम ठार झाला. इटर्नो (जीए ०४ ए ९२६७) घेऊन सुरेश हे हरवळे येथे जात असताना त्यांचा तोल गेल्याने गाडी रस्त्यावर उलटली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना साखळी येथे १०८ रुग्णवाहिकेने नेले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर दुसर्‍या अपघातात मायणा न्हावेली येथील जंक्शनजवळ मनोजकुमार बाकीलाल पासवान (२७) हा आयडीसी डिचोलीचा व मूळ जोधपूर येथील चालक दोन ट्रकांमध्ये सापडून चिरडून ठार झाला. जंक्शनजवळ जीए ०१ टी ८४४६ व जीए ०१ व्ही ३२७५ हे ट्रक उभे होते. त्याली मनोजकुमार हा चालक खाली उतरला. ट्रकावरील दोरी सोडत असताना ८४४६ हा ट्रक उतरणीला उतरू लागल्याने मनोजकुमार हा आत जाण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी मागे असलेल्या ट्रकाची धडक बसल्याने मनोजकुमारला बसून तो जागीच ठार झाला. उपनिरीक्षक जितेंद्र नाईक यांनी पंचनामा केला.
दरम्यान, कळंगुट येथे पार्क केलेली टाटा इनोव्हा (एमएच ०९ एक्यू ५३५५) मागे घेत असताना गाडीने मागे उभ्या असलेल्या महिलेला चिरडले. यात सदर अंदाजे ३४ ते ३५ वयाची महिला ठार झाली. चालक आनंद जोशी (मालवण) याला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक हरीष गावकर हे अधिक तपास करत आहेत.

कुणबी साडी राष्ट्रीय फॅशन शोमध्ये

पालयेतील कारागिरीव्यवसायाला नवचैतन्य

पणजी, दि. १० (सांस्कृतिक प्रतिनिधी)
गोव्यातील पारंपरिक कुणबी साडीने चक्क राष्ट्रीय फॅशन शोपर्यंत मजल मारल्याने बाबूराव बाबाजी तिळवे ऊर्फ ‘काका’ यांच्या व्यवसायाला नवचैतन्य मिळण्याची शक्यता आहे. या साडीची निर्मिती करणारे पेडणे तालुक्यातील पालये या गावातील ७३ वर्षीय ‘काका’ हे एकमेव कारागिर आहेत. गेली कित्येक वर्षे हातमागावर ते या साडीचे कापड तयार करत असून बदलत्या काळात या कापडाचा वापर कमी झाल्याने या कामाला मरगळ आली होती. नोव्हेंबर २०१० मध्ये व्हील्स लाईफ स्टाईल इंडिया फॅशन डिझायनर वेंडल रॉड्रीगीस यंानी पहिल्यांदाच कुणबी साडीचे प्रदर्शन केले. त्यामुळे या कापडाचे पुनरुज्जीवन होऊन काम करताना थरथरणारे काकांचे हात पुनःश्‍च जोर धरणार आहेत.
राज्यात या साडीचा वापर करण्यासाठी कुणीही महिला पुढे येत नसल्याने आता कुणबी साडीची कल्पना काळाच्या पडद्याआड जाणार की काय अशी भीती निर्माण होत असतानाच ही साडीने राष्ट्रीय फॅशन शोपर्यत पोहोचल्याने कुणबी साडीचा प्रसार आणि प्रचार पुन्हा वाढणार आहे अशी चिन्हे दिसू लागली आहेत. व्हील्स लाईफ स्टाईल इंडिया विकमध्ये कुणबी साडीने गोव्याचे प्रतिनिधित्व केले. आता मुंबईस्थित कापड डिझायनर ग्रामीण महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी कुणबी साडीचा वापर करणार आहेत. गोव्याचे प्रख्यात फॅशन डीझायनर श्री. रॉड्रीगीस हे कुणबी साडीचे मार्केट करण्यासाठी आपल्याला पाठिंबा देणार असल्याचे मुंबईच्या कापड डिझायनर पूनम पंडित यांनी सांगितले. राज्यात कुणबी साडीला आता उतरती कळा लागली असल्याने त्याचे विणकाम करणार्‍या कारागिरांवर परिणाम झाला असल्याचे श्रीमती पंडित म्हणाल्या. राज्यात या साड्यांचा वापर कुणबी आणि गावडा समाजातील महिला करत होत्या. परंतु आधुनिक काळात या साड्यांचा वापर कमी झाल्याने हा व्यवसाय लोप पावत चालला आहे अशी चिन्हे दिसू लागली.
आता मात्र या साडीला पुनरुज्जीवन प्राप्त होण्याची चिन्हे दिसू लागल्याने कुणबी साडी, कपड्यांव्यतिरिक्त पूर्वापर कार्यरत असलेल्या नऊवारी साडी, पंचा
धोती यावर भर देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. ही साडी पूर्वीप्रमाणेच परिधान करण्यात येणार असून डाव्या खांद्यावर गाठ असणार आहे. ही साडी तयार करण्यासाठी स्वयंम सेवा गटांना डॉबी लुम्स लाकडी फ्रेम उपलब्ध करून देणार येणार असल्याचे श्रीमती पंडित यांनी सांगितले. कापड विणकाम गोव्यातून लुप्त होत झाले आहे त्यामुळे या कलेमध्ये प्रशिक्षणाद्वारे सहा ते आठ महिन्यांमध्ये महिलांना कौशल्य प्राप्त करून दिले जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

Thursday, 10 March 2011

जिल्हा पंचायत सदस्यांचा अधिवेशनादिवशीच पणजीत मोर्चा

• अधिकारांबाबत सरकारची निष्क्रियता
• मडगावात विशेष संयुक्त बैठक

मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी)
उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही सरकार अजून जिल्हा पंचायतींना अधिकार देण्याबाबत कोणतीच हालचाल करत नसल्याच्या निषेधार्थ गोव्यातील दोन्ही जिल्हापंचायत सदस्य राजधानी पणजीत मोर्चा काढणार आहेत. गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा मोर्चा काढून दिवसभर धरणे धरण्याचा व सरकारच्या निष्क्रियतेचा पंचनामा करण्यात येणार आहे. गोव्यातील दोन्ही जिल्हापंचायत सदस्यांच्या आज मडगावात झालेल्या विशेष संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दक्षिण गोवा जिल्हापंचायतीच्या आर्लेम येथील कार्यालयात ही संयुक्त बैठक झाली. बैठकीला दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा मारिया रिबेलो व उत्तर गोवा अध्यक्ष पांडुरंग परब, उपाध्यक्ष अनुक्रमे दीपिका प्रभू व खुशाली वेळीप तसेच उभय जिल्हा पंचायतीचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. उच्च न्यायालयाने हे अधिकार देण्याबाबत सरकारला स्पष्ट सूचना करूनही ते देण्यात केल्या जाणार्‍या चालढकलीचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. तसेच हा घटनेचा उपमर्द असल्याचे प्रतिपादनही यावेळी करण्यात आले. त्यांचा मोर्चा आझाद मैदानावरून सुरु होईल व मांडवी पुलापर्यंत येऊन तेथे दिवसभर धरणे धरले जाईल अशी माहिती बैठकीनंतर पत्रकारांना देण्यात आली.
इतके करूनही सरकारने तीच भूमिका कायम ठेवली व अधिकार देण्यासाठी पावले उचलली नाहीत तर सरकारविरुद्ध न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यापूर्वी जिल्हा पंचायत सदस्यांनी पंचायत राजव्यवस्था कायद्याखाली मिळालेले घटनात्मक अधिकार सरकारने द्यावेत यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले. तसेच केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री तसेच राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना त्यांच्या गोवादौर्‍यावेळी भेट घेऊन निवेदन सादर केले होते पण सरकारने अजूनही ते प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही याबद्दल सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दक्षिण गोव्यात अपघातात दोन ठार

चावडी,द. ९ (वार्ताहर)
मास्तीमळ काणकोण येथे आज (दि. ९) सकाळी आठ वाजता पोलिस स्थानकापासून अवघ्या तीस मीटरवर महामार्गावर एका पिकअपने धडक दिल्याने फ्रान्सिस्को झेवियर फर्नांडिस (६०) हे तामणे पैंगीण येथील बेकरीवाले जागीच ठार झाले.
फ्रान्सिस्को हे पैंगीण येथून पावाच्या पिशव्या मोटरसायकलला (जीडीएच ६९५१) बांधून चावडी येथे जात होते. ते मास्तीमळ येथे पोहोचले असताना शिरसी येथून म्हापसा येथे केळी घेऊन जाणार्‍या पिकअपने (केए ३१ ६००९) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक दिल्याने ते मोटरसायकलसह रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्यावरून पिकअपचे मागील चाक जाऊन फ्रान्सिस्को हे जागीच ठार झाले. फ्रान्सिस्को यांच्या डोक्यावर हेल्मेट होते तरीही पिकअपचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले.
या अपघातानंतर पिकअप चालक मुर्तुजा शेर जाफर हा पोलिसांना शरण आला. हा अपघात एवढा भीषण होता की, मोटरसायकल व हेल्मेट पिकअपची धडक बसल्यानंतर अक्षरशः चिरडून गेली. तसेच तेथे रक्ताचे पाट व मेंदुचे तुकडे पसरले होते. पोलिसांनी अपघाताचा पंचनाम केला. उपनिरीक्षक टेरन डिकॅास्टा यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक परवार अधिक तपास करीत आहेत.

गिर्दोळीत एक ठार
मडगाव, (प्रतिनिधी)
काल रात्री गिर्दोळी येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मॅन्युएल कायतान परेरा हा ४५ वर्षीय इसम जागीच ठार झाला. तो रालोय- कुडतरी येथील असून रस्त्याच्या बाजूने जात असताना त्याला वाहनाने ठोकरले. सकाळी त्याचा मृतदेह गिर्दोळी येथील रोहिणी बारजवळ आढळून आला. मायणा कुडतरी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. त्याच्या डोक्याला जबर मार बसलेला आढळून आला.
फोटो ः दिवाकर (९एफमध्ये)
काणकोण मास्तीमळ येथील अपघातग्रस्त दुचाकी व पिकअप. (छायाः दिवाकर देसाई)




दक्षिण गोव्यात
अपघातात दोन ठार

चावडी,द. ९ (वार्ताहर)
मास्तीमळ काणकोण येथे आज (दि. ९) सकाळी आठ वाजता पोलिस स्थानकापासून अवघ्या तीस मीटरवर महामार्गावर एका पिकअपने धडक दिल्याने फ्रान्सिस्को झेवियर फर्नांडिस (६०) हे तामणे पैंगीण येथील बेकरीवाले जागीच ठार झाले.
फ्रान्सिस्को हे पैंगीण येथून पावाच्या पिशव्या मोटरसायकलला (जीडीएच ६९५१) बांधून चावडी येथे जात होते. ते मास्तीमळ येथे पोहोचले असताना शिरसी येथून म्हापसा येथे केळी घेऊन जाणार्‍या पिकअपने (केए ३१ ६००९) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक दिल्याने ते मोटरसायकलसह रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्यावरून पिकअपचे मागील चाक जाऊन फ्रान्सिस्को हे जागीच ठार झाले. फ्रान्सिस्को यांच्या डोक्यावर हेल्मेट होते तरीही पिकअपचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले.
या अपघातानंतर पिकअप चालक मुर्तुजा शेर जाफर हा पोलिसांना शरण आला. हा अपघात एवढा भीषण होता की, मोटरसायकल व हेल्मेट पिकअपची धडक बसल्यानंतर अक्षरशः चिरडून गेली. तसेच तेथे रक्ताचे पाट व मेंदुचे तुकडे पसरले होते. पोलिसांनी अपघाताचा पंचनाम केला. उपनिरीक्षक टेरन डिकॅास्टा यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक परवार अधिक तपास करीत आहेत.

गिर्दोळीत एक ठार
मडगाव, (प्रतिनिधी)
काल रात्री गिर्दोळी येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मॅन्युएल कायतान परेरा हा ४५ वर्षीय इसम जागीच ठार झाला. तो रालोय- कुडतरी येथील असून रस्त्याच्या बाजूने जात असताना त्याला वाहनाने ठोकरले. सकाळी त्याचा मृतदेह गिर्दोळी येथील रोहिणी बारजवळ आढळून आला. मायणा कुडतरी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. त्याच्या डोक्याला जबर मार बसलेला आढळून आला.
फोटो ः दिवाकर (f९एफमध्ये)
काणकोण मास्तीमळ येथील अपघातग्रस्त दुचाकी व पिकअप.(fछायाः दिवाकर देसाई)




दक्षिण गोव्यात
अपघातात दोन ठार

चावडी,fद.९ (fवार्ताहर)
मास्तीमळ काणकोण येथे आज (.९)सकाळी आठ वाजता पोलिस स्थानकापासून अवघ्या तीस मीटरवर महामार्गावर एका पिकअपने दिल्याने फ्रान्सिस्को झेवियर फर्नांडिस ()? $ > . # G * H @ # / G % @ 2 , G 0 @ 5 > 2 G > @ > 0 > 2 G .
फ्रान्सिस्को हे पैंगीण येथून पावाच्या पिशव्या मोटरसायकलला (fजीडीएच ६९५१)बांधून चावडी येथे जात होते.मास्तीमळ येथे पोहोचले असताना शिरसी येथून म्हापसा येथे केळी घे जाणार् पिकअपने (fकेए ३१ ६००९)ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दिल्याने ते मोटरसायकलसह रस्त्यावर पडले.या डोक्यावरून पिकअपचे मागील चाक जा फ्रान्सिस्को हे जागीच ठार झाले.फ्रान्सिस्को यांच्या डोक्यावर हेल्मेट होते तरीही पिकअपचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले.
अपघातानंतर पिकअप चालक मुर्तुजा शेर जाफर हा पोलिसांना शरण आला.? * > $ 5 " > - @ 7 # 9 K $ > @ ,कल व हेल्मेट पिकअपची बसल्यानंतर अक्षरशः चिरडून गेली.तसेच तेथे रक्ताचे पाट व मेंदुचे तुकडे पसरले होते.नी अपघाताचा पंचनाम केला.उपनिरीक्षक टेरन डिकॅास्टा यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक परवार अधिक तपास करीत आहेत.

ीत एक ठार
मडगाव,(धी)
काल रात्री गिर्दोळी येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मॅन्युएल कायतान परेरा हा ४५ वर्षीय इसम जागीच ठार झाला.रालोय-कुडतरी येथील असून रस्त्याच्या बाजूने जात असताना त्याला वाहनाने ठोकरले.सकाळी त्याचा मृतदेह गिर्दोळी येथील रोहिणी बारजवळ आढळून आला.मायणा कुडतरी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.त्याच्या डोक्याला जबर मार बसलेला आढळून आला.

नामवंत मंडळींच्या पाठिंब्यामुळे पणजी फर्स्टमध्ये चैतन्य

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)
पणजी शहरात व आजूबाजूला जबाबदार व्यक्ती म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे अशा विविध स्तरावरील व विविध माध्यमातील मान्यवर डॉक्टर, अभियंते, समाजसेवक व स्वयंसेवी संस्थांचे नेते अशा अनेक मान्यवरांनी एकत्र येऊन पणजी फर्स्ट पॅनलच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे पणजी फर्स्ट पॅनलच्या उमेदवारांत चैतन्याची लहर पसरली आहे.
पणजी फर्स्टचे नॅटी पो, नेल्सन काब्राल, ग्लोरीना पो, प्रभाकर डोंगरीकर, डॉ. शीतल नाईक, अनंत गायतोंडे, स्वेता लोटलीकर, दुर्गा केळूस्कर, सुदिन कामत, माया जोशी, मनोज पाटील, वैदेही नाईक, भारती होबळे बोरकर, अशोक नाईक, शेखर डेगवेकर, निना सिलीमखान, नीलेश खांडेपारकर, रत्नाकर फातर्पेकर, दिवोदिता विन्ना क्रुझ, सुरज कांदे, महेश्वर चेंडेकर, माया तळकर, शैलेश उगाडेकर, दीक्षा मयेकर, शुभदा धोंड, ऑस्कर डिक्रुझ, शुभम चोडणकर, निवेदिता चोपडेकर, प्रतिमा होबळे व रुपेश हळर्णकर असे प्रभाग १ ते ३० मधील तीस उमेदवार असून या सर्वांचा प्रचार विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, खासदार श्रीपाद नाईक, तसेच पणजीतील नामवंत डॉक्टर रुफीन मोन्तेरो, डॉ. अभिजित सडेकर, डॉ. गोविंद कामत, डॉ. विनयकुमार रायकर, डॉ. पुडलीक पै काकोडे, डॉ. महेंद्र काकोडकर, डॉ. श्याम भंडारी व डॉ. शेट्ये आदी करीत आहेत. इतर अनेक मान्यवरांच्या विविध संघटनांनी पणजी फर्स्टच्या उमेदवाराना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. तसेच ऍड. जुईनो डिसोझा, डॉ. ऑस्कर रिबेलो, अरविंद भाटीकर सारख्या अन्य अनेक मान्यवर मंडळीनीही भ्रष्टाचार्‍यांना धूळ चारा असे जाहीर आवाहन करण्यास सुरुवात केल्यामुळे सुशिक्षित पणजीच्या लोकांचे मतपरिवर्तन होणे सुरु झाले आहे. त्यांची मते पणजी फर्स्टच्या उमेदवारांनाच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पणजी फर्स्टचे सर्व युवा उमेदवार खुशीत असून ते आपापला प्रचार जोरात करत असल्याचे दृष्टीला पडत आहे.

खाण बगल रस्त्याला मंजुरी

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

• शाळांसाठी समुपदेश • सरकारी सेवकांवर वचक
• कूळ जमिनीसाठी २५ रुपयांचा वाढीव दर
• आरोग्य चिकित्सालय नोंदणी कायद्याला मान्यता


पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)
राज्यात खनिज वाहतुकीसाठी बगल रस्ते तयार करण्याच्या योजनेला आज मंत्रिमंडळ बैठकीत अखेर मंजुरी देण्यात आली. दक्षिण गोव्यातील तीन महत्त्वाच्या बगलरस्त्यांचे काम प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे. फक्त खनिज वाहतुकीसाठीच वापरण्यात येणारे हे बगलरस्ते राज्य सरकार व खाण कंपनीच्या सहभागाने उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ८० कोटी रुपये खर्च होणार आहे. तीन टप्प्यात या बगल रस्त्यांचे काम पूर्ण केले जाणार असून त्याची जबाबदारी गोवा पायाभूत विकास महामंडळावर सोपवण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पर्वरी मंत्रालयात झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यावेळी हजर होते.खनिज वाहतुकीसाठी उभारण्यात येणार्‍या बगल रस्त्यांत उगे ते गुड्डेमळ, गुड्डेमळ ते कापशे व कावरे ते कुर्डी अशी तीन कामे पहिल्यांदा हाती घेतली जाणार आहेत. यात पहिल्या दोन टप्प्यांच्या कामासाठी बगल रस्त्यांचे आरेखन पूर्ण झालेले आहे. बगलरस्त्यांच्या या कामासाठी अर्थसाहाय्य करण्यास खाण कंपनीकडून सहकार्य देण्याचे आश्‍वासन मिळाले असून त्यासाठीचे निकष लवकरच निश्‍चित करून सामंजस्य करारावर सह्या करण्यात येणार आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्री कामत यांनी दिली.

शाळांसाठी समुपदेशकांची सोय
राज्यातील सर्व सरकारी व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांसाठी कायमस्वरूपी समुपदेशकांची सोय केली जाणार आहे. आजच्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली. बिगर सरकारी संस्थांच्या सहयोगाने ही योजना राबवण्यात येणार असून शैक्षणिक समूहामागे एक बिगर सरकारी संस्था कार्यरत राहणार असून महिन्याकाठी त्यांना १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे समुपदेशक विद्यार्थ्यांशी नियमित संपर्कात राहणार असून मानसिक तणाव किंवा इतर अडचणींमुळे विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेसाठी सरकारने १.१४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

कुळांना २५ रुपये प्रतिचौरसमीटर भरपाई
सरकारी प्रकल्पासाठी भूसंपादन करताना कुळांना यापूर्वी केवळ ५ रुपये प्रतिचौरसमीटर भरपाई मिळत होती. या दरांत वाढ करून ती आता किमान २५ रुपये वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या पुढील दर संबंधित भूसंपादन अधिकारी परिस्थिती व जमिनीच्या ठिकाणावरून ठरवणार आहेत.

आरोग्य चिकित्सालय केंद्र नोंदणी कायद्याला मान्यता
केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या ‘क्लीनिकल एस्टाब्लीशमेंट रजिस्ट्रेशन ऍण्ड रेग्यूलेशन ऍक्ट-२००९’ या कायद्याला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या कायद्याअंतर्गत राज्यात स्थापन होणार्‍या प्रत्येक आरोग्य चिकित्सा व संबंधित केंद्राची नोंदणी सरकारकडे करावी लागणार आहे. हे विधेयक येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होणार असून त्याला विधानसभेत मंजुरी मिळवण्यात येणार आहे.

सरकारी कर्मचार्‍यांवर वचक
विविध सरकारी खात्यांत जनतेची काम रखडून पडतात व अनेक वेळा फाईल्स पुढेच सरकत नसल्याने या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी व जनतेची कामे ठरावीक मुदतीत पूर्ण होण्यासाठी ‘गोवा लोक सेवा हमी विधेयक-२०११’ ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. अशा पद्धतीचा कायदा इतर राज्यांत लागू आहे. या कायद्याअंतर्गत जाणीवपूर्वक प्रशासकीय कारभारात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकार्‍याला जबाबदार धरण्यात येणार आहे.

पर्यटनात जलक्रीडा व्यवसायाचा समावेश
पर्यटन व्यापार कायदा-१९८०-८५ यात दुरुस्ती करून जलक्रीडाच समावेश या कायद्यात करणार्‍या दुरुस्ती विधेयकाला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या दुरुस्ती विधेयकाव्दारे पर्यटनाशी संबंधित व्यवसायांचा या कायद्यात समावेश करण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री कामत यांनी दिली.

शिरगावातही आता कावरेवासीयांचा कित्ता

• भक्तांना रस्त्यावर उतरवण्याचा संकल्प
• ‘शिरगाव बचाव अभियाना’तर्फे जनजागृती

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)
केपे तालुक्यातील कावरे पिर्लवासीयांनी बेकायदा खाण व्यवसायाविरोधात दिलेला यशस्वी लढा आता शिरगाववासीयांनाही खुणावू लागला आहे. शिरगावातील खाण उद्योगाचा अमर्याद विस्तार या गावच्या मुळावरच आला असून आता कुठेतरी या खाण व्यवसायाला पूर्णविराम देण्याची गरज येथील ग्रामस्थांना वाटू लागली आहे. शिरगाव बचाव अभियानाच्या झेंड्याखाली काही ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला असून शिरगावातील सर्व भक्तगणांना एकत्रित करून हा गाव वाचवण्याचा विडाच उचलला आहे. शिरगावच्या रक्षणार्थ भक्तांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन सुरेश बी. गावकर यांनी केले आहे.
याप्रकरणी शिरगाव ग्रामस्थांनी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांना निवेदन सादर केले आहे. शिरगावांत मेसर्स राजाराम बांदेकर शिरगाव माईन्स प्रा. लि, मेसर्स चौगुले ऍण्ड कंपनी प्रा. लि, शिरगाव माईन्स ऍण्ड मेसर्स धेंपो मायनींग कॉर्पोरेशन प्रा. लि. (वेदांत) या कंपन्यांतर्फे खाण उद्योग सुरू आहे. या प्रकरणी टीसी-४/४९, ५/४९ व १५/४१ आदी जागेत मोठ्या प्रमाणात कोमुनिदाद जमिनीचा समावेश आहे. या खाण परवान्यात येथील अनेक लोकांची घरे आहेत. शिरगावात सध्या ग्रामस्थांना योग्य रस्ता नाही, शेती खाण मातीमुळे उद्ध्वस्त झाली आहे. धूळप्रदूषण येथील ग्रामस्थांच्या पाचवीलाच पुजले आहे व त्यात सर्वांत गंभीर प्रश्‍न म्हणजे या गावातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नष्ट करण्याचे कामच खाण उद्योगाकडून सुरू आहे. याठिकाणी पाण्याचे पंपिंग बंद करण्याचे आदेश दिले असतानाही त्याचे उल्लंघन खाण उद्योजकांकडून सुरू आहे. गावातील ९० टक्के विहिरी, प्राचीन आयुर्वेदिक झर, तीर्थाची तळी, आकवाराची तळी तसेच अन्य नाले आटले आहेत. येथील खंदकात साठलेले पाणी मोठ्या क्षमतेच्या पंपाकरवी खाली करण्याच्या प्रकारांमुळे मूळ नैसर्गिक साठेही नष्ट होत चालले आहे. या कृतीद्वारे या खाण उद्योजकांकडून पर्यावरणाची जबर हानी सुरू असताना आपले सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहे.
शिरगाव कोमुुनिदादची जागा चुकीने या खाण उद्योजकांच्या नावे लागली आहे व त्यामुळे इथे बेकायदा कोमुनिदाद जमिनीवर खाण उद्योग सुरू आहे. कोमुनिदाद जमिनीच्या संरक्षणार्थ अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालाच्या आधारावर न्यायालयीन लढा पुढे नेण्याचाही निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. याठिकाणी खाण उद्योजकांनी केवळ कोमुनिदादच नव्हे तर सरकारी, खाजगी व देवस्थानच्या जमिनीवरही अतिक्रमण केल्याचे या निवेदनात म्हटले आहे. महसूलमंत्री डिसोझा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्‍वासन शिरगाववासीयांना दिल्याची माहिती श्री. गावकर यांनी दिली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्वरित हस्तक्षेप करून शिरगावची वाताहत रोखावी अन्यथा राज्यभरातील भक्तांना त्यांच्या देवीच्या या पवित्र स्थळाच्या रक्षणासाठी कायदा हातात घेणे भाग पडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

स्पर्धेसाठी नव्हे ज्ञानासाठी शिका - केंकरे


कला संस्कृतीतर्फे ‘कसे शिकावे’ व्याख्यान


पणजी, दि. ९ (विशेष प्रतिनिधी)
परीक्षेत जास्त गुण मिळविण्यासाठी, एखाद्या पारितोषिकावर डोळा ठेवून अथवा आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याच्या इराद्याने नको तर फक्त ज्ञानासाठी शिका. स्पर्धा करायची असेल तर ती स्वतःच्या कुवतीशी करा म्हणजे तुम्ही अधिक झळाळून उठाल, असा बहुमूल्य सल्ला न्यू मेक्सिकोे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्राचे विख्यात प्राध्यापक व्ही. एम. केंकरे (आयआयटीएन) यांनी आज विद्यार्थ्यांना दिला.कला आणि संस्कृती संचालनालयाने आयोजित केलेल्या स्व. भाऊसाहेब बांदोडकर जन्मशताब्दी समारोहातील ‘कसे शिकावे’ या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
सर्व विद्यार्थ्यांनी गुरुजनांना मान हा दिलाच पाहिजे परंतु सगळ्यात उत्तम शिक्षक स्वतःमध्येच असतो. तोच यशाचे शिखर गाठण्यासाठी खरे मार्गदर्शन करू शकतो असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले ‘जे काही शिकायचे आहे त्यावर आत्मकेंद्रित व्हा. अगदी स्वतःला त्यात झोकून द्या. महाभारतातील अजुर्नाप्रमाणे लक्ष केंद्रित करा, कारण यशाची गुरुकिल्ली यातच असते. सभागृहातील प्रेक्षकांशी संवाद साधताना ते म्हणाले ‘स्वतः भोवतीच्या वातावरणात बरेच काही शिकण्यासारखे असते. अगदी आपल्या शाळेत,बाजारात, हॉटेल, मंदिरातही आपण बरेच काही शिकू शकतो. तेव्हा आपली निरीक्षणशक्ती तीक्ष्ण करा, पाहा, जाणा व शिका. हे जीवनातले शिक्षण कुठल्याही पाठ्यपुस्तकात नाही. ते स्वतःच पारखले पाहिजे, अनुभवले पाहिजे. त्या त्या क्षेत्रात पारंगत असलेल्यांकडून जरूर शिका, परंतु एखाद्या विद्येत कुशल नसलेल्यांचेही निरीक्षण करा म्हणजे स्वतः काय करू नये तेही समजेल. असे श्री. केंकरे यांनी सांगितले.
पीपल्स हायस्कूल व धेंपे महाविद्यालय पणजी येथे शिक्षण घेतलेल्या केंकरेचे प्राथमिक शिक्षण मराठीतून झाले. आपल्या गोवा भेटीतील काही किस्से सांगताना ते म्हणाले ‘माझी मातृभाषा कोकणी आहे व मला तिचा सार्थ अभिमान आहे. परंतु मला अत्यंत शरम वाटते की गोव्यात येऊन तुम्हा सगळ्या गोवेकरांना मला अस्खलित इंग्रजीतून व्याख्यान द्यावे लागते. गोव्यातील माझ्या वास्तव्यात ज्या कोणाशी मी कोकणीतून संवाद साधण्याचा प्रयत्न त्या त्या त्या माणसाने माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला याचे मला फार दुःख झाले. स्वतःची मातृभाषा ही जगात सगळ्यात सुंदर असा सार्थ अभिमान फ्रेंच लोकांत आहे, मग गोवेकरांनी तसे का मानू नये’ असा सवालही त्यांनी केला. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे, मात्र त्या नंतरचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यास त्याचे बरेच फायदे असतात असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.
एखादी नवीन भाषा शिकायची झाल्यास त्या भाषेतून संवाद करायला शिका. एकेक शब्द, वाक्य जोडायला शिका आणि मग लेखी भाषेकडे वळा, असा सल्लाही त्यांनी दिला. आपण जे काय शिकतो ते दुसर्‍यांना समजावून सांगितल्यास किंवा त्यावर चर्चा केल्यास ज्ञानात अधिक वृद्धी होते असेही ते म्हणाले. अभ्यास मुकाट्याने पाठांतर करण्यापेक्षा अवघड गोष्टींचा मेळ एखाद्या सहज सुलभ कथेत गुंफून अभ्यासक्रमातील मुद्दे सहज लक्षात ठेवता येतात असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला. सूत्रसंचालन डॉ. अजय वैद्य यांनी केले. यावेळी सभागृह भरगच्च भरलेले होते.

बॉक्स करणेे

शिकण्याबाबत गुरुमंत्र
• शिक्षणातील आनंद मिळविण्यासाठी शिका. स्वतःशीच स्पर्धा करा.
• कुणाचाही शब्द ‘ब्रह्मदेवाचा शब्द’ म्हणू नका. स्वतः तपासून पाहा. स्वतःचे पाठ्यपुस्तक तसेच शिक्षणाच्या पलीकडे जा.
• शिक्षण किंवा अभ्यास ही एक जोखीम म्हणून पाहू नका. दात ओठ खाऊन अजिबात शिकू नका. हसत खेळत, रमत गमत सहज शिका.
• झपाटल्यासारखे, एकदम झोकून देऊन शिका.
• शाळेत शिकविलेल्या गोष्टी /तत्त्वे प्रयोगात आणून पाहा. अर्थात शिकविले गेलेले आचरणात आणा.
• शिकविले जाणारे समजून, उमजून घ्या. उलटे सुलटे प्रश्‍न विचारा, चिकित्सक बना. एखाद्या बिबट्याप्रमाणे अभ्यासावर झडप घाला.
• स्वतःला असलेल्या ज्ञानाबद्दल आग्रही रहा, परंतु विनयशिलता सोडू नका. विद्या विनयेन शोभते.
• शिक्षकांना मान द्याच पण स्वतःचे गुरूही बना.

निवडणूक आयुक्त मुदस्सीर यांच्याविरोधात पोलिस तक्रार

रजेवर असूनही अधिसूचना काढल्याची तक्रार

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)
पणजी महापालिका निवडणुकीची अधिसूचना लखनौ उत्तर प्रदेश येथून काढल्याने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त डॉ. एम. मुदस्सीर यांच्याविरुद्ध पणजी पोलिस स्थानकात तक्रार सादर करण्यात आली आहे. पणजी पालिका निवडणुकीची ज्या दिवशी अधिसूचना काढण्यात आली त्यावेळी निवडणूक आयुक्त लखनौमध्ये उपस्थित होते. तसेच, सरकारी नोंदीनुसार ते रजा घेऊन उत्तर प्रदेश येथे गेले होते. तरीही त्यांनी काही राजकीय लोकांचे हित जपण्यासाठी रजेवर असताना ही अधिसूचना काढली, असा आरोप करून त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करून चौकशी केली जावी, अशी विनंती करून उल्हास नाईक देसाई व महेश कामत यांनी ही तक्रार केली आहे.
पणजी पोलिसांची येत्या २४ तासात या तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिसांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचेही या अर्जात म्हटले आहे. कोणतीही तक्रार २४ तासात नोंद करून घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असून त्यानुसार या तक्रारीची नोंद करून त्याची एक प्रतही तक्रारदारांना देण्याची विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी अद्याप याची कोणतीही नोंद करुन घेतलेली नाही.
डॉ. मुदस्सीर यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यास लावले. त्यानंतर त्यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. कोणत्याही अधिकार्‍याला स्वेच्छा निवृत्ती घेण्यास भाग पाडून त्यांना आयुक्तपदाचे पद बहाल करणे उचित आहे का, असाही प्रश्‍न तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.
पालिका निवडणुकीची अधिसूचनेवर सही केली त्या दि. १४ फेब्रुवारी रोजी डॉ. मुदस्सीर हे लखनौमध्ये उपस्थित होते. तरीही या अधिसूचनेवर पणजी येथे सही केल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांनी दि. ७ ते १८ फेब्रुवारीपर्यंत रजा राज्यपालांकडून मंजूर करून घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपण अलिगड उत्तर प्रदेश येथे असणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करावी, तसेच, त्यांचा जवळचा मंत्री आणि राजकारणी असलेल्या व्यक्तीने त्यांच्याकडून हे कृत्य करून घेतल्याचेही म्हटले आहे.
हा भ्रष्टाचाराचा प्रकार असल्याने डॉ. मुदस्सीर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार निर्मूलन कायदा १३(१) सी, १३ (१) डी, १३(१) ई, तसेच, २१८, ४०५, ४०९, ४६८, ४७१ व १२०(ब) कलमा अर्ंतगत गुन्हा नोंद करावा, असेही तक्रारीत म्हटले आहे.

दोन लाखांची वास्कोत चोरी

वास्को, दि. ९ (प्रतिनिधी)
मंगोरहिल येथील अभिजित सरकार यांच्या घरातील १ लाख ९७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. श्री. सरकार हे आपल्या कुटुंबासह१५ दिवसांसाठी गोव्याबाहेर गेले होते. ते आज (दि.९) सकाळी घरी परतले असता ही घटना त्यांच्या लक्षात आली. ‘जुलीयेटा इमारतीतील’ दुसर्‍या मजल्यावर राहणार्‍या अभिजित यांच्या मुख्य दरवाजाचे विशिष्ट वस्तूने चोरट्यांनी कुरुप उघडून घरातील १ लाख ९७ हजारांचे सोन्याचे ऐवज लंपास केल्याचे उघड झाले. याबाबत कुठल्याच प्रकारचा थांगपत्ता पोलिसांना अद्याप लागलेला नाही.
आज सकाळी आठ वाजता सदर प्रकार उघडकीस आला. श्री. सरकार हे दि. २३ फेब्रुवारी रोजी कुटुंबासह भोपाळ येथे गेले होते. आज सकाळी ते परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे कळले. वास्को पोलिसांना सदर प्रकाराची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी पाहणी करताच घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप चोरट्यांनी विशिष्ट वस्तूचा वापर करून उघडल्याचे समजले.
पोलिसांच्या माहितीनुसार सदर चोरट्यांनी सरकार यांच्या फ्लॅटमधील खोलीतील कपाटाचा दरवाजा तेथे ठेवलेल्या चावीने उघडून आतील सोन्याचे ऐवज लंपास केले. यात चार सोन्याच्या बांगड्या, तीन सोन्याचे कानातील दागिने, दोन सोनसाखळ्या व इतर सोन्याचे ऐवज मिळून १ लाख ९७ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. पोलिस निरीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैभव नाईक पुढील तपास करीत आहेत.

Wednesday, 9 March 2011

पणजीच्या भवितव्यासाठी ‘पणजी फर्स्ट’ हाच पर्याय

‘फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्स’चे मतदारांना आवाहन
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेला गेल्या पाच वर्षांत लागलेले भ्रष्ट व निष्क्रिय प्रशासनाचे ग्रहण दूर करण्यासाठी स्वच्छ आणि प्रामाणिक उमेदवारांना निवडून आणण्याची गरज आहे. येत्या १३ मार्च रोजी पणजीवासीयांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे व संपूर्ण गोव्यासमोर एक नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन ‘फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्स’ यांनी केले आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीत उतरलेल्या ‘पणजी फर्स्ट’ पॅनल हाच योग्य पर्याय आहे व सर्वांनी या पॅनलच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे, अशी विनंती डॉ. रूफीन मोंतेरो यांनी केली आहे.
आज पणजीतील पत्रपरिषदेत ते बोलत होते. ‘फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्स’ या संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र झालेल्या शहरातील काही प्रतिष्ठित वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी ‘पणजी फर्स्ट’ पॅनलला आपली पसंती जाहीर करून या पॅनलातील स्वच्छ व प्रामाणिक उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉ. अभिजित सडेकर, डॉ. गोविंद कामत, डॉ. विनयकुमार रायकर, डॉ. पुंडलिक पै काकोडे, डॉ. शेटये, डॉ. महेंद्र कुडचडकर, डॉ. श्याम भांडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
पणजी फर्स्टच्या प्रचारासाठी विविध प्रभागांतील लोकांच्या गाठीभेटी घेणे, तसेच पणजीसमोरील विविध समस्यांबाबत मतदारांना अवगत करून या समस्या सोडवण्यासाठी योग्य लोकांची निवड करण्याचे आवाहन केले जाणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सरकारात असूनही पणजीसाठी काहीच कसे केले नाही, असा सवाल यावेळी करण्यात आला. पुढील पाच वर्षांत अमुकतमुक विकासकामे करण्याची आश्‍वासने ते लोकांना देत आहेत. त्यावर कसा काय विश्‍वास ठेवावा, असा प्रश्‍नही करण्यात आला. पणजी महापालिकेत घडलेला पार्किंग घोटाळा, बाजार संकुलातील गाळे वाटप घोटाळा याचबरोबर कचरा समस्या, स्वच्छतेचा बोजवारा, गटार व्यवस्थेचे तीन तेरा आदी अनेक प्रश्‍न पणजीसमोर असताना ते सोडवण्याचे कोणतेच प्रयत्न बाबूश यांनी केले नाहीत, असा ठपकाही यावेळी ठेवण्यात आला. सत्ताधारी मंडळातील एकही सदस्य या प्रकाराबाबत तोंड उघडत नसल्याचे पणजीवासीयांनी पाहिले आहे. त्यामुळे केवळ हुजरेगिरी करणारे लोकप्रतिनिधी नको आहेत, असेही डॉ. मोंतेरो म्हणाले.
भाजप सरकारच्या राजवटीत मनोहर पर्रीकर यांनी पणजीसाठी विविध विकासकामे राबवली. पर्रीकरांची राजवट गेल्यानंतर विद्यमान सरकारकडून शहराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. माजी महापौर अशोक नाईक हे एक स्वच्छ व कर्तबगार नेते आहेत व त्यांच्या नेतृत्वाखालील ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच पणजीवासीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकेल, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला. महापालिकेला स्थिर प्रशासन मिळण्यासाठी एकाच पॅनलकडे सत्ता देणे गरजेचे आहे अन्यथा महापालिकेत घोडेबाजाराला ऊत येईल. ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणल्यास आपली संघटना या पॅनलच्या कारभारावर नजर ठेवेल व पणजीच्या विकासात प्रत्यक्ष सर्वांना सहभागी करूनच निर्णय घेतले जातील. सत्ता व पैशांचा वापर करून मतदारांना आमिषे दाखवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विविध वस्तूंचे वाटप करणे तसेच काही ठिकाणी बळाचाही वापर होतो आहे. या सर्व गोष्टींना येत्या १३ रोजी मतदानाव्दारे योग्य ते उत्तर देण्याची जबाबदारी पणजीवासीयांची आहे, असेही ते म्हणाले. पणजीत सुशिक्षित व जागृत मतदार आहेत. लोकशाही पद्धतीत मतदान हीच खरी जनतेची ताकद आहे. या गोष्टीचा प्रत्यय या निवडणुकीत नक्कीच येईल, असा विश्‍वास त्यांनी बोलून दाखवला.
बाबूश मोन्सेरात समर्थक पॅनलतर्फे जाहीर करण्यात आलेला जाहीरनामा म्हणजे नव्या बाटलीत जुनीच दारू असा टोलाही यावेळी हाणण्यात आला. गेल्या २००६ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत दिलेली आश्‍वासने या पॅनलला पूर्ण करण्यात पूर्ण अपयश आले. आता पुढील कार्यकाळात या लोकांकडून काहीच वेगळे घडण्याची अपेक्षा नाही. त्यामुळे यावेळी ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणून महापालिकेत बदल घडवून आणणे हेच पणजीच्या हिताचे ठरेल, असेही ते म्हणाले.

पिळर्ण शांतादुर्गा मंदिरात अडीच लाखांची चोरी

ग्रामस्थांचा पोलिस स्थानकावर मोर्चा

पर्वरी, दि. ८ (प्रतिनिधी)
मोयकावाडो पिळर्ण येथील शांतादुर्गा पिळर्णकरीण संस्थान मंदिरात आज (दि.८) पहाटे १.३० ते ६ या वेळेत अंदाजे अडीच लाखांची चोरी झाल्याची तक्रार पर्वरी पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. पहाटे झालेल्या या चोरीत चोरट्यांनी मंदिराचा मागील दरवाजा उघडून मंदिरात प्रवेश केला व चांदीची प्रभावळ, देवीचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची नथ, पितळेचा त्रिशूळ व अन्य वस्तूंची चोरी केली. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पर्वरी पोलिस स्थानकावर मोर्चा नेऊन पोलिसांना जाब विचारला. तसेच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मोर्चेकर्‍यांनी पोलिसांना दोन दिवसांची मुदत दिली आहे.
पुजारी नाथभूषण हेगडी यांनी सकाळी ६.३० वाजतामंदिर उघडले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. देवस्थानचे अध्यक्ष पंढरी बांदोडकर यांनी पर्वरी पोलिसांत त्वरित तक्रार दाखल केली. निरीक्षक देवेंद्र गाड यांनी पंचनामा केला. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.
दरम्यान, पिळर्ण ग्रामस्थांनी पर्वरी पोलिस स्थानकावर मोर्चा आणून अधीक्षक अरविंद गावस यांना जाब विचारला. त्यावेळी श्री. गावस यांनी पोलिस सुरक्षा वाढवण्यात येणार असून या संदर्भात तपास वेगाने करण्याचे आश्‍वासन दिले. मोर्चेकर्‍यांमध्ये ऍड. जतीन नाईक, जयेश थळी, निरंजन चोडणकर, प्रकाश बांदोडकर, रुपेश नाईक, अजय गोवेकर, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोर्चेकर्‍यांनी पोलिस व गृहखात्याला या प्रकरणी तपास करण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे.

म्हापसा अपघातात दुचाकीचालक ठार

म्हापसा, दि. ८ (प्रतिनिधी)
म्हापशाहून पणजीच्या दिशेने आज सकाळी जात असलेल्या पल्सर मोटारसायकल चालकाने कारला ओव्हरटेक करून जाण्याचा प्रयत्न करताना समोरून येणार्‍या कदंबचा अंदाज न आल्याने सदर कारला धडक बसली. यात म्हापसा आल्तिनो व मूळ कर्नाटकातील दुचाकीचालक वासुदेव रमेश अय्यर (२८) हा तरुण ठार झाला.
सकाळी सॅमसंग मोबाईल कंपनीच्या कार्यालयात जाण्यासाठी वासुदेव आपली पल्सर (जीए ०७ एच ६३८७) घेऊन म्हापशाहून निघाला. बोडगेश्‍वर मंदिराजवळ एका कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना समोरून येणार्‍या कदंबचा (जीए ०१ एक्स ०४२४) अंदाज न आल्याने सदर कारलाच त्याने धडक दिली. यात वासुदेव हा फेकला गेला व डोके आपटून त्याचा मृत्यू झाला.
कदंब चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवली. स्थानिक लोकांनी पोलिसांनी घटनेची कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह आझिलो इस्पितळात नेला. तेथून शवचिकित्सेसाठी तो बांबोळीला पाठवण्यात आला. म्हापसा पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

चित्ररथ वाहनाच्या ठोकरीने म्हापशात अकरा जखमी

म्हापसा, दि. ८ (प्रतिनिधी)
म्हापशातील कार्निव्हल महोत्सवात सहभागी झालेल्या टिटो या चित्ररथाच्या जीपचा ब्रेकफेल झाल्याने जीपसमोर नृत्य करणार्‍यांना ठोकर बसून त्यात अकराजण जखमी झाले. त्यांना म्हापशातील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. आज (दि.८)संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान हा अपघात झाला.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आज कार्निव्हलचे उद्घाटन झाल्यानंतर सहभागी चित्ररथ कोर्टाकडील उतारावरून जात असताना टिटो हा चित्ररथ घेऊन जाणार्‍या जीपचे (जीडीए ७७७७) ब्रेक निकामी झाले. त्यामुळे जीपसमोर नृत्य करणार्‍या ७ ते २६ या वयोगटातील नर्तकांना ठोकर बसली. यात रोहित वेंगुर्लेकर, दिलीप नाईक,वीरेंद्र साळगावकर, राजेश हडफडकर, सुभाष ताम्हणकर, विनायक साळगावकर, (सर्व कळंगुट), रमेश नाईक (कांदोळी), सतीश नाईक (म्हापसा), संदेश दाभोलकर (वास्को), यांचा समावेश आहे.
सदर जीप दोन वाहनांच्या मधोमध अडकली. .यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी जखमींना आझिलोत नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. हवालदार लवू परब यांना पंचनामा केला.

माहिती मिळवण्याच्या स्वातंत्र्याचा वापर करा - पर्रीकर

• ‘गोवादूत’तर्फे महिला दिन उत्साहात
• ‘टेंप्टेशन’सह सहा पुस्तकांचे प्रकाशन

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
महिलांनी माहिती मिळवण्याच्या स्वातंत्र्याचा प्रभावीपणे वापर करुन समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध सतत आवाज उठवावा, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे केले. आज दि. ८ रोजी १०० व्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पणजीतील गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजिलेल्या महिला दिन सोहळ्यात श्री. पर्रीकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून गोवा विद्यापीठाच्या व्याख्यात्या डॉ. किरण बुडकुले, खास निमंत्रित म्हणून बँक ऍाफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक आनंद बडे, ‘गोवादूत’चे संपादक गंगाराम म्हंाबरे, अभिनव पब्लिशर्सचे संचालक सागर अग्नी, संचालिका ज्योती धोंड व लेखिका मेघना कुरुंदवाडकर व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. पर्रीकर यांनी यांनी सांगितले की, सकारात्मक विचारधारा अंगी बाळगून समाजहितासाठी प्रत्येकाने कार्य करायला हवे. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत आपण महिलांसाठी विविध योजना आखल्या व त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. खरे तर महिला दिन साजरा करावाच लागू नये. प्रत्येक दिवस हा महिला दिवसच वाटावा असे दैदीप्यमान कार्य महिलांनी करावे. या प्रसंगी लेखिका कुरुंदवाडकर यांनी ‘गोवादूत’च्या ‘अक्षरदूत’ पुरवणीत लिहिलेल्या ‘साठा उत्तराची कहाणी’ या लेखमालेवर ‘गोवादूत’तर्फे प्रकाशित पुस्तकाचे संचालिका ज्योती धोंड यांनी ‘अन्नपूर्णा’ या पाककला पुस्तकाचे इंग्रजीमध्ये अनुवादन केलेल्या ‘टेंप्टेशन’ या पुस्तकाचे श्री. पर्रीकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच कुरुंदवाडकर यांनी लिहिलेल्या ‘तिची कथा’, ‘रोलर कोस्टर’, ‘उत्तरांचल ते आंचल’ व ‘मनात माझ्या’ या चार पुस्तकांचे अनुक्रमे मंदा सावंत, सुनिता गावणेकर, शैलेश कामत व सुहास बोबडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मुलगी होणे भाग्य ः डॉ. बुडकुले
या प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना डॉ. किरण बुडकुले म्हणाल्या की, महिलांनी फक्त बोलून न थांबता आपले कौशल्य व कार्य प्रत्यक्ष कृतीतून दाखवून द्यावे. मुलगी होणे ही भाग्याची गोष्ट असून फक्त मुलगाच हवा ही मनोधारणा प्रथम महिलांनीच बदलायला हवी. त्यानंतर पुरुषांना सदर गोष्ट पटवून द्यायला हवी. समाजातील वाईट गोष्टींवर प्रहार करून समाजहितासाठी जिवाचे रान करणार्‍या महिला सर्वत्र तयार व्हायला हव्यात. त्यानंतरच महिलांना उच्च स्थान मिळून त्यांच्या भावनांचा सर्वत्र आदर केला जाईल असे सांगून डॉ. बुडकुले यांनी ज्योती धोंड व ‘गोवादूत’ परिवाराचे अभिनंदन केले.
संपादक श्री. म्हाबरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘गोवादूत’ हा सर्वसामान्यांच्या हितासाठी समाजातील वाईट गोष्टीवर नेहमीच प्रहार करत आलेला असून कॅसिनोसारख्या वाईट गोष्टीला सतत विरोध करण्याचे कार्य या वृत्तपत्राने नेहमीच केले आहेे. संचालक श्री. अग्नी यांनी महिला दिन सोहळा आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. श्री. बडे, कुरुंदवाडकर व प्रा. सुमन सामंत आदींनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी ‘गोवादूत’चे पुरवणी संपादक पुष्पाग्रज (अशोक नाईक ) यांच्या ‘शांती अवेदना’ या कवितासंग्रहाला यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्वागतगीत मीना समुद्र यांनी सादर केले. सूत्रसंचालन गिरिजा मुरगुडी यांनी रसाळ शैलीत केले. नीता कळंगुटकर, संगीता दळवी व दया भोबे यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. ‘गोवादूत’चे कार्यकारी संपादक सुनील डोळे यांनी आभार मानले.

द्रमुक-कॉंग्रेस पेच संपुष्टात

तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून कॉंग्रेस व दमुक यांच्यात निर्माण झालेला पेच मंगळवारी अखेरीस संपुष्टात आला. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत ६३ जागा कॉंग्रेसला देण्यास द्रमुकने संमती दर्शवल्याने तीन दिवसांपासून दोन्ही पक्षांत सुरू असलेला पेच सुटला. तामिळनाडूत १३ एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर दमुक व कॉंग्रेस यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू होती. कॉंग्रेसने ६३ जागांचा आग्रह धरला होता तर द्रमुक ६० जागांवर अडून बसली होती. त्यावरून दोन्ही पक्षांत बेबनाव झाला. अखेरीस दमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांनी शनिवारी यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेत कॉंग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या निर्णयामुळे कॉंग्रेस नरमाईची भूमिका घेईल ही दमुकची अटकळ मात्र सपशेल फोल ठरली. त्यानंतर द्रमुकने कॉंग्रेसशी पुन्हा चर्चेची तयारी दर्शवली. त्यादृष्टीने सोमवारी रात्री संरक्षणराज्यमंत्री पलानिमनिक्कम यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. मात्र, त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. मंगळवारी दयानिधी मारन व एम. के. अळागिरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी दोनदा चर्चा केली. सोनिया गांधींचे विश्वासू सहकारी अहमद पटेल हेही या चर्चेला उपस्थित होते. अखेरीस द्रमुकने नमते घेत कॉंग्रेसची ६३ जागांची अट मान्य केल्याने तीन दिवसांपासून दोन्ही पक्षांत सुरू असलेला पेच सुटला.

मडकईकर-बाबूश गटात भाटले येथे धुमश्‍चक्री


परस्पर विरोधी तक्रारी दाखल

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेचे वातावरण भाटले पणजी येथे तापू लागले असून आज बाबूश आणि उदय मडकईकर गटाच्या कार्यकर्त्यांनी परस्पर विरोधी मारहाणीच्या तक्रारी पणजी पोलिस स्थानकावर सादर केलेल्या आहे. देवेंद्र नाईक यांनी प्रचार करीत असताना शिवीगाळ करून धमकी दिली तर, सुशांत नाईक यांनी आपल्यावर प्रचार करताना दगडफेक केल्याच्या परस्पर विरोधी तक्रारी दोघांनीही दिलेल्या आहे. पोलिसांनी दोघांच्या विरोधात फौजदारी कलम १५१ नुसार गुन्हा नोंद करून अटक केली. त्यानंतर दोघांनी विभागीय न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करून जामिनावर सोडण्यात आले.
दुपारी सुमारे १२.४५ वाजता हा प्रकार घडला. पणजी पालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रचाराला जोर आला आहे. यात भाटले भागात बाबूश मोन्सेरात आणि उदय मडकईकर गट आमने सामने आल्याने येथील परिस्थिती नाजूक बनली आहे. आज दुपारी दोन्ही गट प्रचाराला उतरले असता दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. यावेळी दोघांनी एकमेकांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्याही घटना घडल्या. बाबूश मोन्सेरात यांनी सुरुवातीला उदय मडकईकर यांना आपला पॅनलमध्ये स्थान देऊन त्यानंतर त्यांची हकालपट्टी केल्याने येथील मडकईकर समर्थक बाबूश यांच्यावर नाराज बनले आहेत. तर, बाबूश समर्थक उदय मडकईकर यांना कोणत्याही परिस्थितीत पाडण्यासाठी जोराने कामाला लागले आहेत.
दरम्यान, दीपाली श्यामसुंदर शेटगावकर यांनी अशोक, ज्योती व रेखा या तिघांवर मारहाण व विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. पालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरुनच हा प्रकार झाल्याचे पणजी पोलिसांनी सांगितले. तक्रारीनुसार आज दुपारी अशोक, ज्योती व रेखा यांनी आपल्या घरात घुसून आपली नाईटी फाडली व मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तिघांवरही भा. दं. सं. ५०६, ५०४, ३५४ व ४५२ कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे.
याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे साहाय्यक उपनिरीक्षक श्याम आमोणकर करीत आहेत.

दुर्गाभाट फोंडा येथे विद्यार्थिनीची आत्महत्या

फोंडा, दि. ८ (प्रतिनिधी)
बारावीच्या परीक्षेच्या ताणामुळे दुर्गाभाट फोंडा येथील एक विद्यार्थिनी कु. सयामी श्याम पंडित (१७) हिने राहत्या घरात गळफास लावून आज (दि.८) सकाळी आत्महत्या केली.
राज्यातील बारावीच्या परीक्षेला काल सोमवार ७ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कु. सयामी हिने सोमवारी पहिला पेपर लिहिला होता. हा पेपर कठीण गेल्याने ‘ती’ मानसिक तणावाखाली होती. तिने त्याच तणावातून आत्महत्या केल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. तिचे वडील व्यावसायिक आहेत आणि आई शिक्षिका आहे. कु. सयामी ही कवळे येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होती. मंगळवार ८ रोजी सकाळी तिचे आई आणि वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यानंतर सयामी हिने राहत्या घरात पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ८.३० च्या सुमारास शेजार्‍याला खिडकीतून कु. सयामी ही पंख्याला लटकत असल्याचे आढळून आले. त्यानंतर फोंडा पोलिसांना माहिती देण्यात आली. कु. सयामी हिच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयाच्या जबान्या नोंदवून घेतल्या असून परीक्षेचा पेपर कठीण गेल्यामुळे तणावाखाली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पेडणेकर यांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर सयामीचे पार्थिव नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Tuesday, 8 March 2011

वास्को खारीवाडा घरांवरील कारवाई तूर्तास टळली

न्यायालयाचा स्थगितीचा आदेश

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
खारीवाडा वास्को येथील ३६२ घरांपैकी २१७ घरांवर कारवाई करण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिली. त्यामुळे खारीवाड्यावरील या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात मुरगाव पालिकेने ही सर्व घरे पाडण्यासाठी नोटिस बजावली होती. त्यावर न्यायालयाने स्थगिती दिल्याने तूर्तास ही कारवाई टळली आहे. तसेच, या घरांची काय परिस्थिती आहे, याची माहिती आज पालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली. या ठिकाणी ३६२ घरे आहे असून ३६३ जणांना या नोटिसा बजावलेल्या होत्या. एकाच घरावर दोघांनी आपला हक्क सांगितल्याने ३६३ नोटिसा बजावलेल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी खंडपीठाला दिली. यातील १४७ जणांनी पालिकेच्या या नोटिशीला कोणतेही आव्हान दिलेले नाही.
या सर्व घरांवर आज दि. ७ मार्च रोजी कारवाई होणार होती. त्यापूर्वी काहींनी प्रशासकीय लवादासमोर धाव घेऊन स्थगिती मिळवली होती. मुरगाव बंदराच्या विस्तारीकरणामुळे व इतर काही कारणांसाठी खारीवाडा येथील या शेकडो घरांना पाडण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
मुरगाव बंदर न्यायालयात गेल्याने ही घरे पाठवण्याचा आदेश त्यावेळी खंडपीठाने दिला होता. तसेच, यावर कारवाई करून त्याचा १५ फेब्रुवारीपर्यंत या घरांवर कोणती कारवाई केली त्याचा अहवाल न्यायालयासमोर ठेवण्याचा आदेश पालिकेला दिला होता. त्यानुसार आज त्याचा अहवाल पालिकेने ठेवला. खारीवाडा येथे ही चाळ असल्याने एक एक घर पाडता येत नाही. तसेच, काही घरांना प्रशासकीय लवादाने स्थगिती दिल्याने स्थगिती न मिळालेल्या आणि स्थगिती मिळालेल्या घराची भिंत एकच असल्याने त्यावर कारवाई करणे कठीण होत असल्याचेही यावेळी न्यायालयाला सांगण्यात आले.
न्यायालयाने यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून या घरांनी २१७ घरांना स्थगिती दिली. त्यामुळे राहिलेल्या अन्य घरांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

श्रीपाद नाईक व पर्रीकर यांच्या सहभागामुळे

’पणजी फर्स्ट’ च्या प्रचारात उत्साह

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
उत्तर गोव्याचे खासदार तथा भाजप नेते श्रीपाद नाईक यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या बरोबरीने ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पणजी महापालिका क्षेत्रात फिरण्यास सुरुवात केल्याने पणजी फर्स्टच्या उमेदवारांत उत्साह संचारला आहे. माजी मुख्यमंत्री श्री. पर्रीकर व माजी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेले श्रीपाद नाईक या दोन्ही निःस्वार्थी व कर्तृत्ववान नेत्यांच्या प्रचारातील सहभागामुळे पणजीतील लोकांची मते पणजी फर्स्टच्या उमेदवारांच्या बाजूने झुकण्यास सुरुवात झाल्याचे चित्र महापालिका क्षेत्रात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले आहे.
‘पणजी फर्स्ट’च्या युवा उमेदवारांच्या त्यांनी या पूर्वी केलेल्या जनसेवेची पावती त्यांना मिळावी तसेच विद्यमान भ्रष्टाचारी सत्ताधारी मंडळ सत्ताभ्रष्ट होऊन नव्या निःस्वार्थी व विकास करणार्‍या मंडळाकडे सत्ता यावी म्हणून पणजी महापालिका क्षेत्रातील नामवंत मंडळी कधी नव्हे ती एकत्र झालेली असून जादातर लोकांचे तथा विचारवंतांचे मत हे विद्यमान मंडळ पायउतार व्हावे व पणजी फर्स्टची सत्ता यावी आहे. त्यासाठी ही मंडळी विविध माध्यमातून आपल्या परीने प्रचार करताना दिसत आहेत.
दरम्यान श्री. पर्रीकर व खासदार नाईक यांनी पणजी फर्स्टच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक प्रभागातील मतदारांकडे संपर्क साधण्यास प्रारंभ केला असून मतदारांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी दृष्टीस पडत आहे.

आता नोकरीचे आमिष
पणजी महापालिकेवर आपली सत्ता पुन्हा यावी यासाठी विकास आघाडीच्या उमेदवारांकडून विविध किमती वस्तूंचे वाटप होत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे गेल्यामुळे सतर्क झालेल्या निवडणूक आयोगाने ताळगाव भागात आपले निरीक्षक तैनात केले आहेत. मात्र त्यामुळे हादरलेल्या विकास आघाडीच्या उमेदवारांनी वस्तू वाटताना पकडले गेल्यास किंवा तसे सिद्ध झाल्यास अपात्रता ओढवण्याचा धोका आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला सरकारी नोकर्‍या देण्याचे आमिष दाखवण्यास सुरू केले आहे. गेली पाच वर्षे काय झाले ते विसरून जा व एकवेळ निवडून द्या! आपले सरकार सत्तेवर आहे त्यामुळे सत्ता आम्हांलाच द्या! प्रत्येकाला सरकारी नोकरी देतो. असे आश्‍वासन विकास आघाडीचे उमेदवार प्रचाराच्यावेळी प्रत्येकाला देत आहेत.
एवढे दिवस मंत्री आश्‍वासने देत होते पण सरकारकडेच नोकर्‍या नाहीत. त्यामुळे हे मंत्री तरी कुठून नोकर्‍या देणार असा प्रश्‍न होता. मात्र सध्या पालिकेच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवारच नोकर्‍या देण्याचे आमिष दाखवत आहेत हे आश्‍चर्य आहे. त्याचप्रमाणे गेली पाच वर्षे राज्यात व महापालिकेत सत्ता असूनही नोकर्‍या दिल्या नाहीत आणि आता मतासाठी नोकर्‍यांची आमिषे दाखवणार्‍या या भ्रष्टाचारी लोकांवर आम्हां युवकांचा विश्‍वासच नाही असे प्रतिपादन एका शिक्षित युवकाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले. युवकांचा अनैतिक गोष्टीसाठी वापर करणार्‍यांना सत्ताभ्रष्ट केलेच पाहिजे! असेही तो म्हणाला. अशाच प्रतिक्रिया अनेक युवकांनी व्यक्त केल्या असून युवकांच्या कल्याणासाठी सत्ताबदल हवाच असे या युवकांनी ठासून सांगितले आहे.

अरुणाला ‘दयामरण’ नाही

सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली, दि. ७
मागील ३७ वर्षांपासून कोमात असलेल्या आणि वैद्यकीय शास्त्रानुसार ‘ब्रेन डेड’ असलेल्या अरुणा शानबाग यांना ‘दया मरण’ कदापि देता येणार नाही, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने आज अरुणाच्या वतीने दाखल करण्यात आलेला ‘दया मरणा’चा अर्ज ङ्गेटाळून लावला. मरण यातना भोगत जर कुणी जगत असेल (पॅसिव्ह युथनेझियाची स्थिती) तर अगदीच अपवादात्मक स्थितीत त्या व्यक्तीला ‘दया मरणा’ची परवागनी देता येऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
‘एखादी व्यक्ती जर कोमात असेल आणि कुठल्याही यातना तिला नसेल (ऍक्टीव युथनेझियाची स्थिती) तर अशा स्थितीत दया मरणाला परवानगी देणे बेकायदा ठरेल,’ असे न्या. मार्कंडेय कात्जू आणि न्या. ज्ञानसुधा मिश्रा यांच्या खंडपीठाने, अरुणाच्या आयुष्यावर पुस्तक लिहीत असलेल्या लेखिका पिंकी इराणी यांनी अरुणाच्या वतीने दाखल केलेला, दया मरणाचा अर्ज ङ्गेटाळून लावला.
मुंबईतील केईएम रुग्णालयात पारिचारिका म्हणून काम करणार्‍या अरुणावर २७ नोव्हेंबर १९७३ रोजी याच रुग्णालयातील एका सङ्गाई कामगाराने तिच्या गळ्यात पट्टा घट्टपणे बांधून लैंगिक छळ केला होता. यामुळे तिच्या मेंदूला प्राणवायूचा पुरवठा बंद होऊन ती कोमात गेली होती. आज अरुणा ६० वर्षांची असून, ती आजही कोमात आहे.
अरुणा ज्या स्थितीत आहे, ते वास्तव, वैद्यकीय पुरावे आणि न्यायालयासमोर उपलब्ध असलेले दस्तावेज लक्षात घेता अरुणाला दया मरणाची अजिबात गरज नसल्याचेच स्पष्ट होते. तथापि, न्यायालयाने आपल्या निकालात असेही म्हटले आहे की, दयामरणावर आपल्या देशात कुठलाही कायदा नसल्याने, मरण यातना भोगत असलेल्या रुग्णाला अतिशय अपवादात्मक स्थितीत दयामरण देण्यावर विचार केला जाऊ शकतो.
या मुद्यावर संसद जोपर्यंत ठोस आणि स्पष्ट कायदा तयार करीत नाही तोपर्यंत न्यायालयाची उपरोक्त दोन्ही मुद्यांवरील भूमिका कायम राहील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
‘ऍक्टीव युथनेझिया’च्या स्थितीत रुग्णाला डॉक्टरांच्या उपस्थितीत अतिशय जहाल इंजेक्शन देऊन त्याला मृत्यू दिला जातो; तर ‘पॅसीव्ह युथनेझिया’च्या स्थिती संबंधित रुग्णाची जीवनदायी प्रणाली काढून त्याला मृत्यू दिला जातो.
यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने, ‘नातेवाईकांना असाध्य आजाराच्या खाईत लोटून दयामरणाचा आधार घेत संपवायचे आणि त्यांच्या संपत्तीवर डल्ला मारायचा, असे प्रकार समाजात घडू शकतात,’ अशी भीती व्यक्त करीत आपला निकाल आज सोमवारपर्यंत राखून ठेवला होता. आज या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यानंतर ऍटर्नी जनरल जी. ई. वहानवटी यांनी, कोणत्याही कायद्यात, इतकेच काय तर; भारतीय राज्यघटनेतही दया मरणाला मान्यता देण्यात आलेली नाही, असा युक्तिवाद केला. तर, केईएम रुग्णालयाच्या वतीने युक्तिवाद करताना ऍड. वल्लभ सिसोडिया यांनी, रुग्णालयाचे व्यवस्थापन अरुणाची उत्तम काळजी घेत असल्याचा दावा केला.
सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आणि तीन सदस्यीय वैद्यकीय समितीने दया मरणाच्या मुद्यावर सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर अरुणाला दया मरणाची परवानगी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
आपल्या निकालात न्यायालयाने पिंकी इराणी यांच्या प्रयत्नांचीही स्तुती केली. दया मरणासाठी अर्ज सादर करण्याचा इराणी यांचा उद्देश मुळीच वाईट नव्हता. पण, दया मरण देणे अशक्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

केईएम रुग्णालयाकडून स्वागत
अरुणाचा दया मरणाचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने ङ्गेटाळून लावल्यानंतर, या ऐतिहासिक निकालाचे मुंबईतील केईएम रुग्णालयातर्ङ्गे स्वागत करण्यात आले. या निकालामुळे आम्ही ङ्गार आनंदी झालो आहोत. गेल्या ३७ वर्षांपासून अगदी व्यवस्थितपणे अरुणाची काळजी घेण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले, ते न्यायालयाला मान्य झाले आहेत, असे अरुणाला विद्यार्थी दशेत सर्वप्रथम भेटणार्‍या कुशे या परिचारिकेने म्हटले आहे. तर नर्स भानुप्रिता म्हणाली की, रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी अरुणाची कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे काळजी घेत आहेत. दरम्यान, या निर्णयाचे स्वागत करताना रुग्णालयातील परिचारिकांनी एकमेकांचे तोंड गोड करून आनंद व्यक्त केला.

ड्रग्ज चौकशी प्रकरणी मुख्य सचिवांचे ‘सीबीआय’ला पत्र

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
पोलिस, ड्रग्स माफिया व राजकारणी साटेलोटे प्रकरणी थेट केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाला चौकशीसाठी स्वतंत्र पत्र पाठवण्यात आल्याची माहिती मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी दिली. यापूर्वी या प्रकरणी केंद्रीय कार्मिक मंत्रालयाला पत्र पाठवण्यात आले होते. या प्रकरणी सरकार आढेवेढे घेत असल्याचा आरोप होत असल्यानेच हे नव्याने पत्र थेट ‘सीबीआय’ ला पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
गोव्यात गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणाची चौकशी थंडावल्याचा आरोप होत असतानाच आता सरकारकडून या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’कडे देण्याचे घाटत आहे. राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होती परंतु ‘एनएसयुआय’ या कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेकडून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’कडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली विशेष पोलिसांनी विशेषाधिकार देण्याची अधिसूचना राज्य गृह खात्याकडून जारी करण्यात आली आहे. यासंबंधी अद्याप ‘सीबीआय’कडून कोणताही प्रतिसाद आला नसल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा संशयित ‘अटाला’ याला विदेशात ‘इंटरपोल’कडून अटक करण्यात आली असली तरी त्याला गोव्यात आणण्यासाठीची प्रक्रिया अद्याप पुढे सरकत नसल्याचेच दिसून आले आहे. हे प्रकरण पुन्हा एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात उफाळून येण्याचा धाक असल्यानेच आता राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’कडे सोपवण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचे दाखवण्यासाठीच हा पत्रव्यवहार झाल्याचे बोलले जात आहे.

पोलिस निरीक्षक व अधीक्षकांना नोटीस

कावरेपिर्ल केपे खाण प्रकरण

पणजी, दि. ७(प्रतिनिधी) ः
कावरेपिर्ल - केपे येथे बेकायदा खाण चालवणारे शेख सली यांच्या विरोधात केपे पोलिस स्थानकात तक्रार सादर करूनही त्याची नोंद करून न घेतल्याने केपे पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नार्वेकर व दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक एलन डिसा यांना न्यायालयीन नोटीस बजावण्यात आली आहे.
या भागातील नागरिकांनी आंदोलन करून बेकायदा खाण बंद पाडल्यानंतर या खाणीच्या विरोधात आणि खाण संचालकांसह अन्य अधिकार्‍यांविरोधात तक्रार करण्यात आली होती. परंतु, त्याची कोणताही दखल न घेतल्याने आज दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वरील दोन्ही पोलिस अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ही खाण बेकायदा पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारला याचा जबरदस्त फटका बसला असून करोडो रुपयांचा महसूलही बुडाला आहे. या प्रकरणात खाण मालक आणि सरकारी अधिकार्‍यांनी संगनमताने सुमारे ३० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा युक्तिवाद आज न्यायालयात करण्यात आला. मुख्तार मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध तसेच ही बेकायदा खाण सुरू ठेवण्यात मदत करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद करावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. तक्रारीत काशिनाथ शेटये यांनी यावेळी युक्तिवाद केला.
या खाणीतून आत्तापर्यंत ५० हजार टन खनिजाचे उत्खनन करण्यात आले आहे. त्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त खोदकाम केले गेले आहे. तरीही संबंधित खात्याने या खाणीला एकही कारणे दाखवा नोटीस बजावलेली नाही. राज्य सरकारचे खाण संचालनालय अशा बेकायदा खाणींना प्रोत्साहनच देते आहे, असाही युक्तिवाद करण्यात आला. त्याप्रमाणे यात मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही सहभागी आहेत, असाही दावा केला आहे.
सरकारी अधिकार्‍यांसह कावरे पंचायतीचे सरपंच आणि सचिव यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार निर्मूलन कायदा ७, ८, ९, १०, ११, १२ व १३ तसेच, २१७, २१८, ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१ आणि १२०(ब) कलमानुसार गुन्हा नोंद करून चौकशी करावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

Monday, 7 March 2011

द्रमुकचे मंत्री आज राजीनामा देणार

चर्चेस कॉंग्रेस अनुत्सुक

चेन्नई, दि. ६
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना झालेल्या मतभेदांमुळे केंद्रात सत्तारुढ असलेल्या संपुआतून बाहेर पडण्याची घोषणा शनिवारी रात्री केल्यानंतर, केंद्रीय मंत्रिमंडळातील द्रमुकचे सदस्य उद्या आपला राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, द्रमुकच्या निर्णयावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता, आणखी चर्चा करण्यासही कॉंग्रेस उत्सुक नसल्याचे संकेत मिळत आहेत.
‘आमच्या पक्षाचे मंत्री राजीनामा सादर करण्यासाठी उद्या दिल्लीला जातील,’ असे द्रमुकचे वरिष्ठ नेते व लोकसभा सदस्य टी. आर. बालू यांनी आज येथील पक्ष मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. एम. के. अलागिरी व दयानिधी मारन यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळात द्रमुकचे सहा सदस्य आहेत. मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची घोषणा केल्यापासून आतापर्यंत कॉंग्रेसच्या कुठल्याही नेत्याने द्रमुकशी संपर्क साधलेला नाही, असेही बालू यांनी यावेळी सांगितले.
१३ एप्रिल रोजी तामिळनाडूत होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपात आपल्याला ६३ जागा मिळाव्या, असा हट्ट कॉंग्रेसने धरला होता. कॉंग्रेसच्या या हटवादी भूमिकेमुळे नाराज झालेल्या द्रमुकने संपुआ सरकारचा पाठिंबा काढण्यासह मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय शनिवारी रात्री घेतला होता. मात्र, सरकारला यापुढेही मुद्यांवर आधारित पाठिंबा देणार असल्याचेही जाहीर केले होते.

‘पणजी फर्स्ट’च्या प्रचाराला जोर


• ‘टुगेदर टू..’ला मर्यादा तर ‘आघाडी’ची गोची
• निवडणूक आयुक्तांतर्फे भरारी पथकांची नियुक्ती


पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेच्या दि. १३ मार्च रोजी होत असलेल्या निवडणुकीला आता थोडेच दिवस बाकी असून निवडणुकीत उतरलेले उमेदवार जीव तोडून घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. पणजीकरांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘पणजी फर्स्ट पॅनल’च्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून या पॅनलला लोकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले तर ‘टुगेदर टू पणजी’ या पॅनलच्या प्रचाराला बर्‍याच मर्यादा पडल्याचे महापालिकेच्या प्रभागात फेरफटका मारला असता दिसून आले.
त्याचप्रमाणे एका गटाकडून निवडून येण्यासाठी किमती वस्तू वाटल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्याने निवडणूक आयोगाने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘भरारी पथकां’ची नियुक्ती केल्यामुळे व या भरारी पथकांनी ताळगाव भागातील प्रभागावरच जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे किमती वस्तू वाटणार्‍या सदर गटाची चांगलीच गोची झाली आहे.
‘पणजी विकास आघाडी’ची गोची
मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पुढाकाराने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या ‘पणजी विकास आघाडी’ने सर्वांत प्रथम पॅनल जाहीर केले. पहिल्याच दिवशी म्हणजेच सर्वांत प्रथम उमेदवारी अर्ज भरले व प्रचारही सर्वांत आधी सुरू केला होता. मात्र या आघाडीचा जाहीरनामा अजून प्रसिद्ध झालेला नाही. मागील जाहीरनाम्यातील एकही काम न केल्यामुळे कदाचित जाहीरनाम्याला उशीर केलेला असू शकतो. मात्र या आघाडीच्या उमेदवारांनी अनेक दिवसापासून घरोघरी प्रचार करण्यास सुरू केला आहे. त्यातच या आघाडीच्या उमेदवाराकडून किमती भेटवस्तू वाटण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्यामुळे निवडणूक आयुक्त एम. मुदस्सीर यांनी या वस्तू वाटणार्‍यावर नजर ठेवण्यासाठी निरीक्षक (भरारी पथक) नेमले. या भरारी पथकाने ताळगाव परिसरातीलच प्रभागावर जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे आघाडीच्या ‘धनवान’ व ‘दानशूर’ उमेदवारांची गोची झाल्याचे वृत्त आहे. गेल्या पाच वर्षात विकास न केल्याने लोकांच्यासमोर कसे जावे याच विवंचनेत आघाडीचे उमेदवार सापडले आहेत.

’पणजी फर्स्ट’चा प्रचार तेजीत
एकीकडे आघाडीची गोची झालेली असतानाच त्याला तोडीस तोड टक्कर देण्यासाठी पणजीच्या सर्व मान्यवर लोकांनी एकत्र येऊन स्थापलेली व भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेल्या पणजी फर्स्टचा प्रचार मात्र तेजीत सुरू असून मनोहर पर्रीकर व माजी महापौर अशोक नाईक यांचे निःस्वार्थी व विकसित नेतृत्व व नुकताच पणजी फर्स्टने जाहीर केलेला पणजी विकासाचा वचननामा यामुळे लोकांचा कल पणजी फर्स्ट पॅनलच्या युवा उमेदवारांकडे वळला आहे. पणजी फर्स्टच्या उमेदवारांच्या घरोघरी प्रचारात अनेक लोक सहभागी होताना दिसत आहेत. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना व अशोक नाईक महापौर असताना पणजीचा झालेला विकास लोकांसमोर असल्याने लोक पणजी फर्स्टच्या हाती महापालिका देण्यास सज्ज झाल्याचे अनेक मतदारांच्या बोलण्यातून जाणवत आहे.

‘टूगेदर टू पणजी’च्या प्रचाराला मर्यादा
वरील दोन पॅनलबरोबरच टुगेदर टू पणजी हे राष्ट्रवादी पक्षाने समर्थन दिलेले पॅनल या निवडणुकीत उतरले असून या पॅनलचे उमेदवारी मर्यादित असून त्यांनी आपापल्या प्रभागातच प्रचार करण्यास प्रारंभ केला असून इतर अपक्ष उमेदवारसुद्धा आपापल्या प्रभागात मतदाराला आपल्या बाजूने वळवण्यात मग्न आहेत. दरम्यान टुगेदर टू पणजी पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराला माजी मंत्री मिकी पाशेको येणार असल्याचे सांगण्यात येत असून ते आल्यानंतरच टुगेदर टू पणजी चर्चेत येणार आहे.

माडावरून पडल्याने वास्कोत युवकाचा मृत्यू

वास्को, दि. ६ (प्रतिनिधी)
वास्को खारीवाडा येथे राहणारा व मूळ मिरज येथील साईनाथ कलगे (२९) या तरुणाचा आज (दि.६) संध्याकाळी माडावरून पडल्याने मृत्यू झाला. साईनाथ हा कामगार म्हणून काम करत होता. वास्कोतील मिरजवाडा येथील सीताराम नाईक यांनी त्याला आपल्या बागेतील कैर्‍या व नारळ काढण्यासाठी बोलावले होते. त्याप्रमाणे साईनाथने कैर्‍या काढल्या व नारळ काढण्यासाठी माडावर चढला. मात्र माडावरून तोल जाऊन साईनाथ खाली पडून गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेत त्याला चिखलीच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तो वाटेतच मृत झाल्याचे घोषित केले. या संदर्भात वास्को पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेनंतर गोमेकॉच्या शवागारात पाठवला आहे. या संदर्भात वास्कोच उपनिरीक्षक अमरनाथ पाटील अधिक तपास करत आहेत.

बांबोळी व आझिलो इस्पितळातील

वाहनचालकांचा आंदोलनाचा इशारा

• रुग्णसेवा भत्त्याची मागणी
• सरकारला २१ दिवसांची मुदत

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व म्हापसा येथील आझिलो इस्पितळातील वाहनचालकांनी रुग्णसेवा भत्ता त्वरित द्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा आज (दि.६) येथे घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोव्यातील सरकारी आरोग्य केंद्रांत काम करणार्‍या (विशेषत: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व म्हापसा येथील आझिलो इस्पितळ) माळी, सुरक्षारक्षक व नर्सेस यांना प्रत्येक महिन्याला रुग्णसेवा भत्ता देण्यात येतो. मात्र, रुग्णांची ने-आण करणार्‍या वाहनचालकांना सदर भत्ता देण्यात येत नाही. त्यामुळे दोन्ही इस्पितळांतील वाहनचालकांनी गोवा सरकारी कर्मचारी संघटनेमार्फत अनेक वेळा सरकारकडे सदर भत्ता मिळावा म्हणून प्रयत्न केले होते. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे संतापलेल्या या वाहनचालकांनी आज सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये सदर प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकारला २१ दिवसांची मुदत देण्याचे ठरले. या मुदतीत वाहनचालकांना न्याय न मिळाल्यास सर्व वाहनचालकांनी आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
या बैठकीला सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर, सरचिटणीस जॉन नाझारेथ, प्रशांत देवीदास, बेनीदाता गुदिन्हो, स्नेहा मांद्रेकर यांची उपस्थिती होती.

‘पोर्तुगीज छळाचा खरा इतिहास शिकवा’

पणजीत भारतीय स्त्री शक्ती कार्यकर्ता संमेलन
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
गोव्यावर ४५० वर्षे राज्य केलेल्या पोर्तुगीजांनी येथील लोकांवर अमानुष अन्याय व अत्याचार केलेले आहेत. मात्र विद्यमान शिक्षण प्रणालीत या छळाचा खरा इतिहास मुलांना शिकवला जात नाही. त्यामुळे आत्ताची पिढी असंस्कृत बनत चालली आहे. मातांनी स्वाभिमानाचे तेज अबाधित ठेवून आपल्या मुलांना खरा इतिहास शिकवून त्यांच्यात देशभक्तीचे स्फुल्लिंग भरावे. जेणेकरून देशात देशभक्तांची संख्या वाढेल व सुसंस्कृत पिढीद्वारे देशाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन प्रा. सुभाष वेलींगकर यांनी आज येथे बोलताना केले.
‘भारतीय स्त्री शक्ती’च्या गोवा विभागातर्फे पणजी येथे आयोजित कार्यकर्ता संमेलनात प्रा. वेलींगकर ‘गोव्याचे राष्ट्रजीवन व महिला’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.
या प्रसंगी बोलताना प्रा. वेलींगकर म्हणाले की, गोवा स्वतंत्र झाल्यानंतर जन्मलेल्या पिढीला गोवा मुक्तीचा खरा इतिहास शिकवला गेला नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी वा संभाजी महाराजांचा आदर्श राहिला नाही. काहीजण अजूनही अत्याचारी तथा दुष्ट पोर्तुगीजांचे पोवाडे गात आहेत. हे योग्य नसून प्रत्येक महिलेने गोव्याच्या खर्‍या इतिहासाचा व पोर्तुगीजांच्या अत्याचारी छळाचा इतिहास वाचायला हवा व त्यावरून आपल्या कार्याची दिशा ठरवायला हवी. यावेळी प्रा. वेलींगकर यांनी उपस्थित महिलांना गोवा मुक्तीचा व पोर्तगीजांच्या छळाचा इतिहास कथन केला. या वेळी प्रा. वेलींगकर यांनी आजही पोर्तुगिजांंची भाटशाही करणार्‍यांवर जोरदार ताशेरे ओढले व देशभक्तांच्या कार्यांचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्यामल कामत यांनी प्रा. वेलींगकर यांचे स्वागत केले.
स्वतःवर विश्वास ठेवून कार्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास समाजकारण व राजकारण यात निश्‍चित यश मिळते. असे प्रतिपादन श्रीमती मनस्विनी प्रभुणे यांनी येथे बोलताना केले. भारतीय स्त्री शक्तीच्या कार्यकर्ता संमेलनात ‘३३ टक्के आरक्षण व कुटुंबव्यवस्थेवर परिणाम’ या विषयावर बोलताना श्रीमती प्रभुणे यांनी वरील प्रतिपादन केले. त्या पुढे म्हणाल्या की, योग्य नियोजन व आत्मविश्वास याद्वारे कुठल्याही क्षेत्रात कार्यतत्पर राहता येते व त्याबरोबरच कुटुंबसुद्धा चालवता येते.
या सत्रा पूर्वीच्या सत्रात डॉ. राजेश धुमे यांनी ‘महिलांची मानसिकता व कुटुंब’ या विषयावर मार्गदर्शन केले. भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या अध्यक्षा ऍड. स्वाती केरकर, सचिव सुनिता दांडे, खजिनदार दीपाली बाणस्तारकर व श्यामल कामत यांच्या उपस्थितीत दिवसभर आयोजित या कार्यकर्ता संमेलनाचा समारोप झाला.