पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
न्यायाधीश श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांना ‘क्लीन चीट’ देऊन त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले आहे. याविषयीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी काढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दीड वर्षापूर्वी श्रीमती प्रभुदेसाई यांच्यावर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, त्यांचे निलंबन मागे घेतल्याने ‘हा सत्याचा विजय होय’, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. सुसंस्कृत, मितभाषी म्हणून ओळखल्या जाणार्या अनुजा प्रभुदेसाईंची न्यायदान करताना मात्र कर्तव्यकठोर भूमिका असते, अशी ख्याती आहे. काही काळ त्यांनी राज्याच्या कायदा विभागाचे सचिवपदही सांभाळले होते.
Saturday, 7 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment