चावडी, दि. २ (वार्ताहर)
काटेबाग तळपण पैंगीण येथून विल्मा रॉबर्ट बार्रेटो (३५) ही विवाहीत महिला रविवार दि. २४ एप्रिलपासून काटेबागहून बेपत्ता असल्याची तक्रार तिची सासू व्हिसेंत बार्रेटा यांनी काणकोण पोलिस स्थानकात केली आहे. सदर महिलेने निळ्या रंगाचा चुडीदार परिधान केला असून उंची ५.४ सेमी आहे. अशी माहिती काणकोण पोलिसांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक तेर्रान डिकॉस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण सावंत करीत आहेत.या संदर्भात माहिती मिळाल्यास काणकोण पोलिस स्थानक (०८३२-२६३३३५७) येथे संपर्क साधावा.
नरेंद्र रायकर यांचे निधन
चावडी, दि. २ (वार्ताहर)
काणकोण पणसुले येथील सोन्याचे कारागीर नरेंद्र रायकर (७२) यांचे सांगली महाराष्ट्र येथे निधन झाले. नातीच्या लग्नानिमित्त रायकर हे सांगलीला गेले असता तेथे ते आजारी पडले. इस्पितळात उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. आज २ मे रोजी काणकोण पणसुले येथे त्यांचा मृतदेह पोहोचल्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येतील असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्यामागे पत्नी, विवाहीत कन्या व मुलगा असा परिवार आहे.
पार्वती गावकर यांचे निधन
चावडी, दि. २ (वार्ताहर)
येडा - खोतिगाव येथील पार्वती मोनो गावकर (८५) यांचे आज २ मे रोजी येडा येथे निधन झाले. ३ मे रोजी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील. त्यांच्यामागे पुत्र, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
साईश्रद्धा क्लबचा शनिवारी वर्धापनदिन
पणजी, दि. २
साईश्रद्धा क्रीडा व सांस्कृतिक क्लब, घाटेश्वर नगर, खोर्ली म्हापसाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त ७ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता १५ वर्षांखालील आणि १५ ते २० वर्षांमधील युवकांसाठी प्रश्नमंजूषा व एकपात्री अभिनय स्पर्धा तर ८ मे रोजी अखिल गोवा संगीत स्पर्धा केवळ प्रथम ३० स्पर्धकांसाठी आयोजित केली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस रु. ५०००, द्वितीय रु. ३००० व तृतीय रु. २००० दिले जाईल. अधिक माहितीसाठी सुहास (९४२११५०२३७), सिद्धार्थ (९७६२६६३७५७) किंवा क्लबच्या अध्यक्षांना ९८८१३१८१४८ वर संपर्क साधावा.
गोवा लेखा कॅडरची १२ रोजी आमसभा
पणजी, दि. २
लेखा संचालनालयातील गोवा लेखा कॅडर अधिकारी संघाची आमसभा संचालनालयाच्या प्रशिक्षण सभागृहात गुरुवार दि. १२ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजित केली आहे. यावेळी नवीन कार्यकारी समितीची निवड केली जाईल.
पणजीत आजपासून आर्ट ऑफ लिव्हिंग
पणजी, दि.२ (प्रतिनिधी)
श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्य जोरात चालू असून उद्या दि.३ रोजी पणजी येथील टीबी कुन्हा सभागृहात आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग वर्ग सुरू होत आहेत. दि.३ ते ८ मे दरम्यान दररोज संध्याकाळी ६.३० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत हे वर्ग चालणार आहेत. शारीरिक आरामाबरोबरच मानसिक आनंद देणारे हे वर्ग असून या वर्गात दाखल होऊन आनंदप्राप्ती करून घेण्याची संधी पणजीवासीयांना लाभली आहे. अधिक माहितीसाठी नीला नावेलकर (९८२२१०४४२१) किंवा श्रद्धा परब (९४२३३०७८०९) यांच्याशी संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे.
Tuesday, 3 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment