Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 15 April 2011

तुये भगवती देवस्थानचा आजपासून रौप्यमहोत्सव

पेडणे, दि. १४ (प्रतिनिधी)
पेडणे तालुक्यातील तुये गावचे आराध्य दैवत श्री देवी भगवती पंचायतन देवस्थानचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन १५ ते १७ एप्रिलपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या १५ रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद व रात्री ८ वा. भजनाचा कार्यक्रम होईल. १६ रोजी सकाळी गणपती पूजा, कुंभाभिषेक होम, महापूजा व रात्री ९ वा. ओंकार स्पोर्टस् ऍण्ड कल्चरल संघातर्फे भरतनाट्यमचा कार्यक्रम होईल. १७ रोजी सकाळी गणपती पूजा, कलश स्थापना, नवचंडी होम, कुंकुमार्चन, महाप्रसाद व रात्री हौशी नाट्यमंडळ, गावकरवाडातर्फे ‘गगनात घुमली शिवगाथा’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
श्री देवी भगवतीच्या सर्व महाजन, भक्तगणांनी या उत्सवाला उपस्थिती लावून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष आनंद नाईक यांनी केले आहे.

No comments: