उद्या कार्यभार स्वीकारणार
पणजी, दि. १०
गोवा विद्यापीठाच्या कुलसचिव (रजिस्ट्रार) या पदावर डॉ. विजयेंद्र कामत यांची नियुक्ती निश्चित झाली असून येत्या १२ रोजी ते आपल्या नव्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
गोव्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस. एस. सिद्धू यांनी सदर नियुक्तीला मान्यता दिली आहे. सध्या डॉ. कामत हे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. २५ वर्षांपासून ते ज्ञानार्जनाचे अखंड कार्य करत असून त्यांनी जपानमधील तोहोकू विद्यापीठात संशोधन केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्या त्यांनी पटकावल्या आहेत. तसेच जपान, अमेरिका, इंग्लंड आदी देशांमध्ये विविध आंतरराष्ट्रीय परिषदांत त्यांनी शोधनिबंधांचे वाचन केले आहे. ऑरगॅनिक केमिस्ट्री हा त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय होय. त्यांनी अधिव्याख्याता या नात्याने गोवा विद्यापीठात आपल्या शैक्षणिक कारकिर्दीचा आरंभ केला. रसायनशास्त्र या विषयातील त्यांचा अधिकार वादातीत आहे. विद्यापीठाची परीक्षा पद्धत सुलभ करण्याकामी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी चळवळीतही त्यांनी महाविद्यालयीन जीवनात सक्रिय भाग घेतला होता. राज्यातील शिक्षणक्षेत्रात डॉ. कामत यांच्याकडे अतिशय आदराने पाहिले जाते.
Monday, 11 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment