कस्टम्सने फास आवळला - विदेशवारीवरही बंदी
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे सापडलेल्या मर्यादेपेक्षा जास्त विदेशी चलनाबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत व त्यामुळेच आज त्यांच्या विरोधात कस्टम्स व ‘फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट’ कायदा (फेमा) अंतर्गत तक्रार नोंद करण्यात आली. बाबूश यांचा जप्त केलेला पासपोर्ट परत करण्यासही मुंबई कस्टम्सने नकार दर्शवीत त्यांच्यावर विदेशवारी करण्यासही बंदी टाकल्याने त्यांच्या भोवतालचा फास आता अधिकच आवळला गेला आहे.
काल शुक्रवारी बाबूश यांची झाडाझडती घेतल्यानंतर मुंबई कस्टम्सने आजही त्यांची सुमारे सहा तास जबानी नोंदवून घेतली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणी बाबूश यांना अटक करण्यास कस्टम्स खात्याकडे आवश्यक पुरावे असतानाही केवळ राजकीय दबावापोटी त्यांची अटक टाळली जात असल्याचेही समजते. बाबूश यांच्याकडे सापडलेल्या बेहिशेबी चलनाबाबत त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे मिळू शकली नाहीत. हा पैसा ते नेमके कोणत्या कामासाठी नेत होते याचेही समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नाहीत व त्याचमुळे त्यांच्या विरोधात रीतसर तक्रार नोंद करून घेण्यात आली आहे. बाबूश यांच्याकडे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या प्रकरणी मागितलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी या चलनाबाबत आपल्याकडे कायदेशीर कागदपत्रे असल्याचे सांगितले होते. परंतु, आज कस्टम्स अधिकार्यांसमोर मात्र ही कागदपत्रे सादर करण्यात ते अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री कामत साफ तोंडघशी पडले आहेत.
Sunday, 10 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment