पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
राज्यातील खाजगी बसमालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल दि.१२ पासून जुन्ता हाउससमोर उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि. १५ पासून बसेस बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. वाहतूक खात्याने बस मालकांच्या मागण्या अमान्य करून बंद मोडून काढण्याची तयारी चालवली आहे. या संघर्षात वाहतूक खात्याने नियमांचे उल्लंघन करणार्या खाजगी बसमालकांकडून ऑक्टोबर २०१० ते मार्च २०११ पर्यंत तब्बल २९, ६०, ७५० रुपये एवढा दंड वसूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात ऑक्टोबर महिन्यात ८,१९,९०० रु., नोव्हेंबर महिन्यात ५,१९,४५० रु., डिसेंबरात ७,५७,६५० रु., जानेवारीत ५,१६,०५० रु., फेब्रुवारीत २,०५,४०० रु.तर मार्च महिन्यात १,४२,३०० रु. एवढा दंड वसूल केल्याची माहिती मिळाली आहे.
Thursday, 14 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment