पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
मुंबई कस्टम अधिकार्यांच्या कचाट्यात बेहिशेबी विदेशी चलनासहित सापडलेल्या शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आज दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींसमोर आपली जबानी दिल्याची माहिती मिळाली आहे. कॉंग्रेसचे गोवा प्रभारी जगमीतसिंग ब्रार यांच्यासमोर बाबूश यांनी २ एप्रिल रोजी घडलेल्या संपूर्ण घटनाक्रमाची इत्थंभूत माहिती ठेवल्याचे त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.×
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना विदेशी चलन तस्करी प्रकरणी कस्टम अधिकार्यांनी ताब्यात घेतल्याचे प्रकरण सध्या बरेच गाजत आहे. गोव्यात विरोधी भाजपकडून याप्रकरणी जोरदार आवाज उठवण्यात आला. भाजपकडून चार दिवस विधानसभेचे कामकाजही रोखण्यात आले. दिल्लीतही भाजपने याविषयी आवाज उठवल्याने त्याची गंभीर दखल घेऊन कॉंग्रेस श्रेष्ठींनी बाबूश यांना दिल्लीत आज पाचारण केले. यावेळी बाबूश यांनी श्री. ब्रार यांची भेट घेतली व त्यांना घडलेला प्रकार कथन केला. याप्रकरणी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे चर्चा केली जाणार आहे. गोव्यातील कॉंग्रेस नेत्यांची भेट घेऊन त्यांचेही मत जाणून घेतले जाईल. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडेही याप्रकरणी अहवाल मागितला असून या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही श्री. ब्रार यांनी सांगितले.
Monday, 11 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment