नवी दिल्ली, दि. ३ : भ्रष्टाचारविरोधी उपोषण आंदोलनासाठी योगगुरू बाबा रामदेव यांनी उद्या पहाटे पाच वाजताचा मुहूर्त शोधला असला तरी गुरूवारी रात्रीपासूनच दिल्लीतील रामलीला मैदान बाबांच्या भक्तांनी गजबजू लागले आहे. पंचतारांकित सुविधांनी सुसज्ज झालेल्या रामलीला मैदानात बाबांनीही आज सकाळी भक्तांना दर्शनपर प्रवचन देऊन आपल्या रामदेवलीलांना प्रारंभ केला.
माझे भ्रष्टाचारविरोधी उपोषण आंदोलन शनिवारी पहाटेपासून सुरू होणार आहे, अशी आठवण त्यांनी रामलीला मैदानात आजपासूनच जमलेल्या शेकडो भक्तगणांना करून दिली. भ्रष्टाचारी व्यक्तीला जात, धर्म, पंथ नसतो. त्यामुळे अशा भ्रष्ट मंत्र्यांना आणि सरकारी अधिका-यांना ङ्गाशीची शिक्षाच दिली पाहिजे. या राक्षसांच्या विरोधात आपले आंदोलन असणार आहे, असे रामदेवबाबांनी भक्तगणांसमोर मार्गदर्शन करताना यावेळी जाहीर केले.
भ्रष्टाचार आणि विदेशी बँकांतील काळा पैसा पुन्हा भारतात आणावा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी रामदेवबाबांनी आंदोलन पुकारले आहे. माझे आंदोलन कुणाही राजकीय पक्षाविरूद्ध किंवा व्यक्तीविरूद्ध नाही, असेही त्यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.
दरम्यान, बाबा रामदेव यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून त्यांचे भक्तगण मध्य दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानात जमू लागले आहेत. याठिकाणी अडीच लाख चौरस ङ्गुटांचा प्रचंड मंडप बाबांसाठी सज्ज असून, त्याठिकाणी अनेक पंचतारांकित सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारपासून सुरू होणा-या उपोषणासाठी बाबांचे किमान दोन लाख भक्त त्यांना साथ देतील अशी अपेक्षा आहे.
रामलीला मैदान बाबांच्या भक्तांनी एक महिन्यासाठी आरक्षित केले आहे. दिल्लीचा उकाडा ध्यानात घेऊन उपोषणकर्त्यांना गारेगार करण्यासाठी ५ हजार पंखे आणि कुलर्स लावण्यात आले आहेत. उपोषणकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून १३०० स्वच्छतागृहांची व्यवस्थाही आहे. अचानक वैद्यकीय मदत लागली तर त्यासाठीही सर्व सोयी असतील. ५० ते ६० डॉक्टरांची ङ्गौज उपोषणर्कत्यांच्या मदतीसाठी सज्ज असेल.
आठ ङ्गूट लांबीच्या स्टेजवरून लाखो भक्तगणांना बाबांचे नीट दर्शन व्हावे म्हणून मोठमोठे टीव्ही स्क्रीन्स बसवण्यात आले आहेत. ३० ते ४० क्लोज सर्किट कॅमेरे, मुख्य मैदान, प्रवेशद्वार तसेच बाहेर जाण्याच्या मार्गावर बसवण्यात आले आहेत. स्टेजचे तीन भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागात एक दिवस उपोषण करणारे बसतील. दुसर्या भागात बाबांना पूर्णवेळ साथ देणारे असतील तर तिसरा भाग बाबांच्या भेटीसाठी येणा-या पाहुण्यांसाठी असेल.
दिल्ली पोलिसांची यंत्रणा कमी पडेल म्हणून बाबांच्या भारत स्वाभिमान ट्रस्टचे हजारो स्वयंसेवक रामलीला मैदानावर तैनात असतील. संपूर्ण देशभरातून ट्रस्टच्या युवा कार्यर्कत्यांना आमंत्रित करण्यात आले असून त्यातील हजारो युवक एमबीए पदवीधारक आहेत. बाबांच्या उपोषणाला साथ देण्यासाठी हजारो महिला कार्यर्कत्यांनीही दिल्लीकडे कूच केले आहे.
Saturday, 4 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment