येडियुरप्पांवरील सुनावणी स्थगित
बंगलोर, दि. ३० : माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर असणार्या भ्रष्टाचाराच्या गुन्हा संदर्भातील खटल्यावरील सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयाने २ जूनपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे.येडियुरप्पा खटल्यात दाखल करण्यात आलेल्या विनंती अर्जाला ङ्गेटाळून न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
कनिमोझी; जामिनावरील निर्णय कोर्टाने राखला
नवी दिल्ली, दि. ३० : द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची कन्या आणि २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी खासदार कनिमोझी यांच्या जामीन अर्जावरील निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने आज राखून ठेवल्यामुळे कनिमोझी यांना आणखी काही दिवस तिहार तुरुंगातच काढावे लागणार आहे.
बेनझीर हत्याप्रकरणी मुशर्रङ्ग ङ्गरार आरोपी!
इस्लामाबाद, दि. ३० : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येच्या चौकशीत सहकार्य करण्यात अपयशी ठरलेले आणि वारंवार समन्स बजावूनही कोर्टात हजर न राहिलेले माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रङ्ग यांना स्थानिक न्यायालयाने ङ्गरार आरोपी म्हणून जाहीर केले. रावळपिंडी येथील कनिष्ठ न्यायालयाचे न्यायमूर्ती राणा निसार अहमद यांनी ङ्गेडरल इन्व्हेस्टीगेशन एजंसीच्या विनंतीवरून मुशर्रङ्ग यांना ङ्गरार आरोपी घोषित केले आहे.
करीम मोरानीची तिहारमध्ये रवानगी
नवी दिल्ली, दि. ३० : २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी आणि चित्रपट निर्माता करीम मोरानी याचा जामीन अर्ज ङ्गेटाळून लावताना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने आज त्याची तिहार तुरुंगात रवानगी केली. ‘सिनेयुग ङ्गिल्म प्रा. लि.चे संचालक असलेल्या मोरानीला आज सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर, न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी त्याचा जामीन अर्ज ङ्गेटाळून लावला आणि त्याला अटक करण्याचे आदेश सीबीआयला दिले. सीबीआयने त्याला लगेच अटक केली आणि तिहार तुरुंगात पाठविले.
दलाई लामांनी घेतला राजकीय संन्यास
धर्मशाळा, दि. ३० : तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी आज अखेर राजकीय आणि प्रशासकीय संन्यास घेतला. भारतात आश्रयात असलेल्या तिबेट सरकारच्या घटनादुरुस्तीवर दलाई लामा यांनी रविवारी स्वाक्षरी केली.
दलाई लामा यांच्या विनंतीवरून त्यांच्याकडे असलेले राजकीय आणि प्रशासकीय अधिकार त्यांच्याकडून काढून घेण्याच्या मुद्यावर तिबेटियन संसदेत तीन दिवस चर्चा झाल्यानंतर ही घटनादुरुस्ती तयार करण्यात आली. काल ती दलाई लामा यांना सादर करण्यात आले. त्यावर त्यांनी लगेच स्वाक्षरी केली, अशी माहिती तिबेट संसदेच्या प्रवक्त्याने दिली.
Tuesday, 31 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment