पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) : फोंडा येथील सुशीला फातर्पेकर खूनप्रकरणी सीरियल किलर महानंद नाईक याला दोषी ठरवण्यात आले आहे. एकूण सोळा खुनांचा आरोप असलेल्या महानंदला खूनप्रकरणी दोषी ठरवले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. येत्या ६ जून रोजी त्याच्या शिक्षेसंदर्भात अंतिम युक्तिवाद होऊन नंतर त्याला शिक्षा ठोठावली जाईल.
आज सदर प्रकरण सुनावणीस आले असता सुशीला फातर्पेकर खून प्रकरणात महानंदला दोषी ठरवल्याचेे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी जाहीर केले.
महानंदला यापूर्वी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पाच खून प्रकरणांत तो दोषमुक्त झाला आहे. न्या. नूतन सरदेसाई यांनी महानंदला बलात्कार प्रकरणात शिक्षा सुनावली होती. फोंडा येथे घरकामाला जाणार्या सुशीला हिला बांबोळीतील जंगलात आणून तिचा खून २००७ साली झाला होता. गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आगशी पोलिसांना आढळून आला होता.
या खटल्यात सरकारी वकील सुभाष सावंत देसाई यांनी युक्तिवाद केला. अंतिम टप्प्यात सरकारी वकील सरोजिनी सार्दिन यांनी युक्तिवाद केला. महानंदला कोणती शिक्षा ठोठावली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tuesday, 31 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment