पणजी, दि.३० (प्रतिनिधी): ‘उटा’च्या आंदोलनादरम्यान बाळ्ळी येथे झालेल्या जळीतकांड प्रकरणी तिघा जणांवर गुन्हा नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नरेंद्र फळदेसाई, प्रशांत फळदेसाई व दीपक फळदेसाई या तिघांवरही गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) गुन्हे नोंदवले आहेत. यातील एक संशयित दीपक फळदेसाई याला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, आंदोलनकर्ते ‘उटा’ संघटनेच्या चौघा जणांवर गुन्हे नोंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र त्यास दुजोरा देण्यास पोलिस अधिकार्यांनी नकार दिला.
आमदार रमेश तवडकर यांच्यावर बाळ्ळी येथे हल्ला चढवणार्या तरुणाची ओळख पटवण्यात आली असल्याचे माहिती श्री. तवडकर यांनी दिली. छायाचित्रावरून या तरुणाची ओळख पटवण्यात आली असून त्या तरुणाला अटक केली की नाही, याची माहितीही देण्याचे पोलिसांनी नाकारले. आज दिवसभरात सात जणांच्या जबान्या नोंद करून घेण्यात आली आहेत.
Tuesday, 31 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment