भाजपतर्फे वाळपईत येथील निषेध सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद
वाळपई, दि. ११ (प्रतिनिधी): विद्यमान कॉंग्रेस सरकार असंवेदनशील असून जनसामान्यांच्या भावनेची काडीचीही कदर त्यास नाही. राजकीय फायद्यासाठी मोजक्याच लोकांच्या दबावाखाली येऊन मातृभाषेचा गळा घोटण्याचे काम कामत सरकारने केले आहे. प्राथमिक स्तरावर इंग्रजीला मान्यता देऊन भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस सरकारने केला आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीपाद नाईक यांनी केले. वाळपईत आज भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस गोविंद पर्वतकर, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, मंडळ अध्यक्ष नारायण गावस आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. नाईक म्हणाले, गोव्याबरोबर केंद्रातील सरकारही भ्रष्टाचारात लडबडले आहे. जनतेचा पैसा दोन्ही हातांनी ओरपणे यालाच त्यांनी प्राधान्य दिले आहे. म्हणूनच त्यांनी दडपशाहीचे राजकारण सुरू केले असून भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार्या रामदेवबाबा यांच्यावरील कारवाई हे त्याचे ज्वलंत उदाहरण. मागील चार वर्षांत गोव्यातील कॉंग्रेस सरकारने कोणतेही विधायक कार्य केलेले नसून केवळ आश्वासनांची खैरात केली. यामुळे आज आपल्या रास्त मागण्यांसाठी सामान्य जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे. जनता या निर्णयाविरुद्ध पेटून उठली आहे.
गोविंद पर्वतकर म्हणाले, विद्यमान सरकारच्या कारवाया पाहता गोव्यातील नागरिकांचे भवितव्य सुरक्षित नाही. गोव्याला संस्कृती रक्षणासाठी भाजप सरकार सत्तेवर येणे कधी नव्हे एवढे गरजेचे बनले आहे. आज वाळपईबरोबरच इतरही भागांमध्ये विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची लुबाडणूक सुरू आहे. निवडून येण्यापूर्वी कर्जदारांची देणी देण्यासाठी पैसे नसलेल्यांवर अफाट माया गोळा केल्याच्या कारणावरून आयकर खात्याचे छापे पडतात. यावरूनच त्या नेत्यांचा भ्रष्टाचार कोणत्या थराला पोचला आहे याची प्रचीती येते. जर खरोखरच गोवा व गोव्याची संस्कृती टिकवायची असेल तर येत्या निवडणुकीत जनतेने कोणत्याही दबावाखाली न येता व कोणत्याही आमिषांना बळी न पडता योग्य उमेदवाराला मत दिले पाहिज
माजी उपसभापती नरहरी हळदणकर यांनीही कामत सरकारचे वाभाडे काढले. भाजपचे वाळपई मंडळ अध्यक्ष नारायण गावस यांनी स्वागत केले व आभार मानले.
Sunday, 12 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
ice information
Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!
Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys
Post a Comment