रविशंकर यांची यशस्वी शिष्टाई
आणखी तीन दिवस रुग्णालयातच राहणार
देहराडून, दि. १२
श्री श्री रविशंकर यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे योगगुरू बाबा रामदेव यांनी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेले आपले उपोषण आज मागे घेतले. दरम्यान, बाबा रामदेव यांची प्रकृती स्थिर असली तरी, त्यांना आणखी दोन ते तीन दिवस रुग्णालयातच राहावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
श्री श्रींनी आज सलग तिसर्या दिवशी बाबा रामदेव यांची देहराडून येथील रुग्णालयात जाऊ भेट घेतली आणि उपोषण मागे घेण्यासाठी त्यांना विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन बाबांनी ङ्गळांचा रस घेऊन आपले उपोषण सोडले. यावेळी विविध धर्मगुरू उपस्थित होते.
देशात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या मुद्यावरून बाबा रामदेव यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांची प्रकृती खाल्यावल्यामुळे गेल्या शुक्रवारी त्यांना येथील हिमालया इन्स्टिट्युट ऑङ्ग मेडिकल सायन्समधील आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. तथापि, आयसीयुमध्येही त्यांन आपले उपोषण सुरूच ठेवले होतेे.
त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर विजय दशमाना यांनी सांगितले की, बाबा रामदेव यांनी उपोषण सोडणे अतिशय आवश्यक झाले होते. कारण, त्यांची प्रकृती ङ्गारच ढासळलेली होती. उपोषण सोडल्यानंतरही त्यांची प्रकृती चांगली होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा वेळ लागणार असल्याने त्यांना तोपर्यंत रुग्णालयातच राहावे लागणार आहे.
दरम्यान, बाबा रामदेव यांचे निकटचे आणि विश्वासातले अनुयायी बालकृष्ण यांनीही बाबांसोबतच आपले उपोषण मागे घेतले. बाबा रामदेव यांनी आपल्या असंख्य अनुयायांची आणि श्री श्री रविशंकर यांच्यासह विविध धर्मगुरूंची विनंती मान्य करून आपले उपोषण मागे घेतले असल्याची माहिती बालकृष्ण यांनी दिली.
बाबांनी उपोषण मागे घेतले असले तरी, भ्रष्टाचारविरोधी त्यांचा लढा संपलेला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. भ्रष्टाचाराविरोधी लढ्यांचा बाबांचा संदेश जगभरातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्याबद्दल आपण मीडियाचे ऋणी असल्याचेही ते म्हणाले.
श्री श्री रविशंकर यांनी म्हणाले की, मी कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी म्हणून बाबा रामदेव यांच्याकडे आलो नाही. बाबांची देशाला गरज असल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती मी स्वत:कडूनच करण्यासाठी येथे आलो आहे. यात कुठलेही राजकारण नाही.
Monday, 13 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment