पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): मडगावचे उपजिल्हाधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांना माहिती आयोगाने ठोठावलेला दोन हजार रुपयांचा दंड मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कायम केला. माहिती आयोगाने दंड ठोठावल्याने श्री. फर्नांडिस यांनी या दंडाला गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. ती याचिका फेटाळून लावत न्यायालयाने दंडावर शिक्कामोर्तब केले.
उतोर्डा-माजोर्डा येथील मिंगेल मोन्तेरो यांनी दि. ३ मे २०१० रोजी मडगाव जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती मागितली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती अधिकारी श्री. फर्नांडिस यांनी ३० दिवसानंतरही त्यांना ही माहिती दिली नसल्याने त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांकडे दाद मागितली. त्यानंतर माहिती देण्यात आली तरी मुदतभंग केल्याने माहिती आयोगाकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली होती व आयोगाने श्री. फर्नांडिस यांना दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या आदेशाला त्यांनी गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. माहिती देण्यास उशीर का लागला याचे कोणतेही कारण श्री. फर्नांडिस स्पष्ट करू न शकल्याने खंडपीठाने त्यांचा दंड कायम केला.
Friday, 17 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment