देहरादून, दि. १३ : योगगुरू रामदेवबाबा यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली असून त्यांना उद्या रुग्णालयातून डस्जार्ज मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हिमालयन हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एल. जेठानी यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, रामदेवबाबांनी ङ्गळे आणि ङ्गळांचा रस घेतला. आता ते उठून बसू शकण्याच्या स्थितीत आले आहेत. आपल्या रुग्णालयातील खोलीत त्यांनी चकराही मारल्या. आता त्यांची प्रकृती बर्यापैकी स्थिर असून त्यात झपाट्याने सुधारणा दिसून येत आहे.
सध्या दर अर्ध्या तासाने त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवले जात आहे. त्यांनी आता थोडे बरे वाटू लागल्यावर रुग्णालयाबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, त्यांना प्रचंड अशक्तपणा आला आहे. जोवर त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार कायम राहतील तोवर त्यांना डिस्चार्ज देता येणार नाही. उद्यापर्यंत नीट तपासणी करून निर्णय घेतला जाईल. त्यासाठी डॉक्टरांची चमू त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवून असल्याचे डॉ. जेठानी यांनी सांगितले.
तब्बल ९ दिवसांच्या उपोषणानंतर रविवारी रामदेवबाबांनी ङ्गळांचा रस ग्रहण केला. त्यांना १० जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते रुग्णालयातच आहेत.
Tuesday, 14 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment