दर आठवड्याला एकेक पद त्यागणार
पणजी, दि. २१ : कवी, लेखक, नाटककार व भारतीय भाषा सुरक्षा मंचचे कार्यकर्ते विष्णू सुर्या वाघ यांनी आज माहिती व प्रसिद्धी खात्याशी संलग्न ‘गोवा सरकारचे प्रेस व मीडिया सल्लागार’ या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे पाठवून दिला आहे. राजीनामा पत्राची एक प्रत प्रसिद्धी व माहिती संचालक मिनीन पेरीस यांनाही पाठवून देण्यात आली आहे.
कोकणी किंवा मराठीपेक्षा मुख्यमंत्र्यांना इंग्रजी जवळची वाटते. त्यामुळे आपण आपले राजीनामापत्र इंग्रजीतून लिहिले आहे. या शिवाय इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून; ते देखील सरकारी शाळेमधून घेऊनही आपण चांगले इंग्रजी लिहू शकतो हे मला मुख्यमंत्र्यांना दाखवायचे होते, असे वाघ यांनी सांगितले.
सरकारने दिलेली सर्व पदे सोडण्याची घोषणा आपण यापूर्वीच केली होती. भारतीय भाषा सुरक्षा मंचने सरकारला १८ जूनपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत संपली तरी सरकारने निर्णय बदललेला नाही. त्यामुळे आता सरकारशी थेट संघर्ष हा एकच पर्याय शिल्लक राहिलेला आहे. गेले अनेक दिवस आपण सरकारविरुद्ध बोलत आहोत, पण आपणाला पदावरून काढण्याची हिंमत सरकारने दाखवलेली नाही. त्यामुळे आता आपण कृष्णनीतीचा अवलंब करून सरकारलाच नामोहरम करायचे ठरवले आहे. ‘शठं प्रति शाठ्यम्’ या उक्तीप्रमाणेच दर आठवड्याला आपण एका पदाचा राजीनामा देणार आहोत. प्रत्येक राजीनामापत्रातून सरकारने घेतलेल्या माध्यमविषयक भूमिकेचे वाभाडे काढणार आहोत. आपले एकेक राजीनामापत्र सरकारला घायाळ करणारे शब्दांचे हत्यार असेल, असे श्री. वाघ यांनी म्हटले आहे.
दिगंबर कामत सरकारविरुद्ध गावोेगावी लोकआंदोलनाचा वणवा भडकू लागला आहे. ग्रामदैवतांना गार्हाणे घालण्याचा कार्यक्रम सर्व थरांतील लोकांना भावला आहे. आता तालुका पातळीवर लेखक - कलाकार मेळावे भरवून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येईल, असे श्री. वाघ यांनी सांगितले. यातील पहिला मेळावा शनिवारी फोंडा शहरात आयोजित केल्याचीही माहिती त्यांनी दिली.
(विष्णू वाघ यांना मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या
पत्राचा मराठी तर्जुमा खाली देत आहोत)
Wednesday, 22 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Congress have used Mr.V. Wagh like using a tiger in a circus show
Post a Comment