कुड्डेगाळ खाण अपघात
शिगाव, दि. २१ (प्रतिनिधी): कुड्डेगाळ - फोमेंतो खाणीवरील टेलिंग डंप कोसळून मातीच्या ढिगार्याखाली गाडला गेलेला अभियंता क्वाद्रुस तिपाजी याचा मृतदेह शोधून काढण्यास आज शोधपथकाला यश आले. अशा रीतीने या अपघातातील तिन्ही मृतदेह हाती आले आहेत.
गेल्या शनिवारी अजित नायक या सुरक्षारक्षकाचा तर काल सोमवारी गुलप्पा चल्मी या कामगाराचा मृतदेह सापडला होता. आज तिपाजी याचा मृतदेह प्लांटच्या भागातच आढळून आला. तो आत अडकून पडल्यामुळे काढण्यासाठी पथकाला खूपच तसदी घ्यावी लागली. शेवटी सिलिंडर कटरचा वापर करून लोखंडी भाग कापून तो काढावा लागला. सदर मृतदेह शवचिकित्सेसाठी हॉस्पिसियोत पाठवला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सदर मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला असून तो ओळखण्यापलीकडे होता. उद्या मडगाव स्मशानभूमीत त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Wednesday, 22 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment