Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 12 June 2011

नक्षल्यांशी चकमक तीन जवान शहीद
रायपूर,दि. ३ : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात आज नक्षलवाद्यांबरोबर उडालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएङ्ग)चे तीन जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी हल्ला करण्याची एकाच आठवड्यातील ही तिसरी घटना आहे.
आंध्रप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या भेजी या भागात सीआरपीएङ्गचे जवान व २५० नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. यात तीन जवान शहीद झालेत. घटनास्थळी पोहोचणे पोलिसांना कठीण व्हावे, यासाठी नक्षलवाद्यांनी स्ङ्गोटकांच्या साह्याने रस्ते उडवून लावले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

हेडलीची अधिक चौकशी अमेरिकेच्या विचारार्थ
वॉशिंग्टन, दि. ११ : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दोषी आढळलेल्या डेव्हिड हेडलीची भारताला अधिक चौकशी करू देण्यावर अमेरिका विचार करीत आहे. आमच्या चौकशी संस्थांना हेडलीची पुन्हा एकदा चौकशी करू देण्यात यावी, अशी विनंती भारताने केल्यानंतर त्यावर विचार केला जाईल, असे अमेरिकेच्या परऱाष्ट्र विभागाने म्हटले आहे.
आम्ही याआधीही हेडलीची भारतीय चौकशी संस्थांना चौकशी करू दिली होती. अर्थात त्याच्यावरील खटला येथील न्यायालयात सुरू असल्याने, अशी चौकशी सध्या तरी करता येणार नाही परंतु खटला संपल्यानंतर आम्ही यावर विचार करू शकतो, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मार्क टोनेर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुशर्रङ्ग यांच्याविरुद्ध स्थायी अटक वॉरंट
इस्लामाबाद, दि. ११ : माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या २००७ मध्ये झालेल्या हत्येच्या तपासात सहकार्य करत नसल्याची गंभीर दखल घेत पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रङ्ग यांच्याविरोधात स्थायी अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे.
अनेकवेळा समन्स बजावल्यानंतर किंवा ङ्गरार घोषित केल्यानंतरही मुशर्रङ्ग न्यायालयासमोर हजर झाले नाहीत, असे सरकारी वकीलांनी रावळपिंडीस्थित दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्या. राणा निसार अहमद यांच्या निदर्शनास आणून दिले आणि मुशर्रङ्ग यांच्याविरुद्ध स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली.

चीनमध्ये नव्याने महापूर ५० जणांचा बळी
बीजिंग, दि. ११ : चीनच्या चार दुष्काळग्रस्त प्रांतांत धुवॉंधार कोसळत असलेल्या पावसानंतर नव्याने आलेल्या पुराने ५० जणांचा बळी घेतला असून, या भागातील १.२७ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाचे तसेच नदी किनार्‍यांची मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे.
मध्य चीनमधील हुबेई प्रांतात काल संध्याकाळी आलेल्या पुरात २५ जण वाहून गेले असून १२ लोक बेपत्ता आहेत, असे या प्रांताच्या सरकारी प्रवक्त्याने सांगितले. याच प्रांतातील जवळपास १.२७ लाख लोकांना जबरदस्तीने सुरक्षित स्थळी हलवावे लागले. पुराने जवळपास १३३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे, असे वृत्त क्झिनहुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे.

मुंबईत वरिष्ठ पत्रकाराची गोळ्या घालून हत्या
मुंबई, दि. ११ : मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्रात गेल्या दोन दशकांपासून अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या बातम्या देणार्‍या एका वरिष्ठ पत्रकाराची आज पवई येथे दिवसाढवळ्या गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली.
ज्योती डे, असे गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव असून, ते मिड-डेच्या विशेष तपास विभागाचे संपादक होते. ते ५६ वर्षांचे होते. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अज्ञात इसमांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या, असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त रजनीश सेठ यांनी सांगितले. अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मोटारसायकलवर आलेल्या चार आरोपींनी पवईच्या हिरानंदानी भागात डे यांच्यावर मागून गोळ्या झाडल्या. घटनेनंतर लगेचच डे यांना उपचारासाठी नजीकच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. पाच राऊंड गोळ्या झाडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेचा तपास सुरू आहे, असेही नांगरे पाटील यांनी सांगितले.

1 comment:

Unknown said...

ice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys