आग्रा/ग्रेटर नोएडा, दि. ८
जमीन अधिग्रहणाच्या मुद्यावरून शेतकरी आणि पोलिस यांच्यात शनिवारी झालेल्या संघर्षात दोन शेतकर्यांसह चार जणांचा बळी गेल्यानंतर आज या संघर्षाचे लोण आगर्यापर्यंत पोहोचले असून, आज पोलिस आणि शेतकर्यांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
नोएडा येथे शनिवारी झालेल्या संघर्षात शेतकर्यांना चिथावणी देणार्या नेत्याच्या अटकेसाठी उत्तरप्रदेश सरकारने ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. आज संतप्त शेतकर्यांनी मथुरा आणि अलिगढ येथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली, असे उत्तरप्रदेशचे पोलिस महासंचालक कर्मवीर सिंग यांनी सांगितले.
आगर्याजवळील छोगान गावात शेतकर्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. संतप्त शेतकर्यांनी अनेक वाहने आणि बांधकामस्थळी लावण्यात आलेले मंडप जाळण्याचा प्रयत्न केला. यमुना एक्सप्रेस वेसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचा जास्त मोबदला मिळावा यासाठी शेतकर्यांनी हे आंदोलन केले, असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महासंचालक ब्रिजलाल यांनी लखनौ येेथे सांगितले.
Monday, 9 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment