न्यायदंडाधिकार्यांचे आदेश - खाण संचालकांवरही ठपका
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
पेडणेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांच्याविरुद्ध बेकायदा खाण व्यवसायात गुंतल्याप्रकरणी प्रथम चौकशी अहवाल (एफआयआर) नोंद करण्याचे आदेश पेडणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांनी पोलिसांना दिले आहेत. या संपूर्ण बेकायदा व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, असेही या आदेशात म्हटले आहे.
भाईडवाडा - कोरगाव येथे बेकायदा खाण उद्योगाव्दारे जितेंद्र देशप्रभू यांनी सरकारी तिजोरीला सुमारे ५० कोटी रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार माहिती हक्क कायदा कार्यकर्ते काशिनाथ शेटये व इतरांनी केली होती. याप्रकरणी देशप्रभू यांच्यासह खाण खात्याचे संचालक व इतरांवरही ठपका ठेवण्यात आला आहे.
जितेंद्र देशप्रभू यांना या बेकायदा खाण प्रकरणी खाण खात्यातर्फे १.७२ कोटी रुपयांचा यापूर्वीच दंड ठोठावण्यात आला आहे. खुद्द सरकारने याची माहिती विधानसभा अधिवेशनातही दिली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याने तक्रारदारांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांकडे दाद मागितली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण केल्यानंतर पेडणेच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विजयालक्ष्मी शिवोलकर यांनी हा आदेश जारी केला आहे.
Sunday, 8 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment