शिरगावात पवित्र वातावरण - लाखभर भाविकांची उपस्थिती राहणार
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
गोवा तसेच अन्य राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या रविवार दि. ८ रोजी साजरा होत आहे. एकूण पाच दिवस चालणार्या या जत्रोत्सवात लाखो भाविक श्री देवी लईराईचा आशीर्वाद घेण्यासाठी शिरगावात उपस्थिती लावणार आहेत.
अन्य भाविकांबरोबरच महिनाभर व्रतस्थ राहून देवीची भक्ती करणारे धोंड उद्या पहाटेपासून शिरगावात दाखल होणार आहेत. परवा दि. ९ रोजी पहाटे २.३० ते ४ या दरम्यान होमकुंडातील निखार्यांवरून चालून अग्निदिव्य करूनच ते घरी परतणार आहेत. जत्रोत्सवानिमित्त या परिसरात अत्यंत चैतन्यमयी असे वातावरण निर्माण झाले असून शिरगाव, अस्नोड्यातील स्थानिकांचे सगे सोयरेही दाखल होऊ लागले आहेत. उद्याचा जत्रोत्सव व परवा पहाटे होणार्या अग्निदिव्यानंतर देवीच्या कौलोत्सवाला सुरुवात होणार असून हा कौलोत्सव दि. १२ मे पर्यंत चालणार आहे.
Sunday, 8 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment