कौलोत्सवास प्रारंभ - भाविकांची अलोट गर्दी
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): शिरगाव येथील प्रसिद्ध श्री लईराई देवीचा वार्षिक जत्रोत्सव काल दि. ८ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी व्रतस्थ भक्तांबरोबरच (धोंड) भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
काल पहाटे ५ वाजल्यापासून आज उशिरापर्यंत लाखो भाविकांनी रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतले. आज पहाटे होमकुंडातून अग्निदिव्य केल्यानंतर धोंडांनी आपले एका महिन्याचे व्रत सोडले. दरम्यान, जत्रोत्सवाच्या सांगतेबरोबरच आजपासून देवीच्या कौलोत्सवाला प्रारंभ झाला. देवीचा कळस येत्या चार दिवसांत शिरगावात घरोघरी फिरणार असून भाविकांना देवीचा कौल मिळणार आहे. त्यासाठी आज भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. कौलोत्सवात मोगर्याच्या फुलांपासून बनविलेल्या माळांना बरीच मागणी असल्याने अस्नोडा व शिरगाव येथे शेकडो विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून या फुलांची विक्री करीत आहेत. कौलोत्सवाची सांगता १२ मे रोजी होणार आहे.
Tuesday, 10 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment