आश्वे भूखंड घोटाळा प्रकरण
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): आश्वे भूखंड घोटाळा प्रकरणी निलंबित झालेले उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासाची ‘फाईल’ बंद करण्यात आली आहे. राज्यपालांच्या शिफारशीनंतर त्यांच्यावर झालेले आरोप मागे घेण्यात आले असून यापुढे अशी पुन्हा चूक करू नये, अशीही तंबी त्यांना देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गत लोकसभा निवडणुकांदरम्यान झालेल्या बदल्यांच्या वेळी घाईगडबडीत २ लाख २५ हजार ४३४ चौरस मीटर सरकारी जागा एका खाजगी व्यक्तीच्या नावावर करण्याचा निवाडा दिल्याने सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन २००९ मध्ये श्री. फर्नांडिस यांना सेवेतून निलंबित केले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध खात्याअंतर्गत करण्यात आलेल्या चौकशीत यात गैरप्रकारही आढळून आला होता. तरीही, त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीची ‘फाईल’ बंद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
----------------------------------------------------------------
घोळात घोळ...!
दरम्यान, आपण दिलेला निवाडा योग्य असल्याचे प्रशासकीय न्यायालयाने दिलेल्या आदेशातही म्हटले आहे असा दावा करून श्री. फर्नांडिस यांनी सरकारच्या निलंबनाला आव्हान दिले होते. मात्र, प्रशासकीय लवादाच्या त्या निवाड्यालाही सरकारने आता आव्हान दिल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. एका बाजूने सरकारकडून ही फाईल बंद केली जाते आणि दुसर्या बाजूने लवादाच्या निवाड्याला आव्हान दिले जाते, हा सर्व काय घोळ आहे याचा उलगडा अनेकांना झालेला नाही.
Wednesday, 11 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment