पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): चंद्रू गावस याचा मृत्युपूर्व जबाब पोलिसांच्या ताब्यात देण्यास विशेष न्यायदंडाधिकारी मारीया मास्कारेन्हस यांनी विरोध केल्याने आज पोलिसांना हात हालवत माघारी जावे लागले. सदर जबाब पोलिसांना दिला जावा की नाही, यावर उद्या सुनावणी होणार आहे.
आज पणजी पोलिस निरीक्षक रमेश गावकर चंद्रू गावस याचा मृत्युपूर्व जबाब ताब्यात घेण्यासाठी प्रथम वर्ग न्यायालयात हजर झाले होते. या जबाबाची प्रत मिळणार असल्याने पत्रकारांनीही न्यायालयात गर्दी केली होती. परंतु, हा सीलबंद जबाब पोलिसांना द्यावा की नाही यावर बंद खोलीत सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी हा जबाब नोंद करणार्या विशेष न्यायदंडाधिकार्यांनी पोलिसांना तो देण्यास विरोध दर्शविला. सदर जबाबात गुन्हा अन्वेषण विभागातील तीन वरिष्ठ अधिकार्यांची नावे असल्याने या जबाबाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच, त्यात पोलिस अधिकार्यांची नावे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई कण्याचाही प्रसंगही पोलिस खात्यावर ओढवणार आहे. दरम्यान, आज सकाळी सीआयडी विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर व निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांना पोलिस महासंचालक डॉ. आदित्य आर्य यांनी पुन्हा पाचारण केले होते. मात्र या विषयीची कोणतीही माहिती देण्यास अधिकार्यांनी नकार दिला.
तारा केरकरही पोलिसांविरोधात उतल्या
चंद्रू याने आपल्या मृत्युपूर्व जबाबात नाव घेतलेल्या तिन्ही पोलिस अधिकार्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी आज वास्को पालिकेच्या नगरसेविका तारा केरकर यांनी केली आहे. तसेच, न्यायालयाच्या विशेष न्यायदंडाधिकार्यांना जर धमक्या मिळू शकतात तर, या गोव्यात कोणीही सुरक्षित नसल्याचा आरोपही त्यांनी केला. दि. ९ जुलै रोजी चंद्रूचे लग्न होणार होते. त्यामुळे त्याच्याशी जिचा विवाह होणार होता त्या तरुणीनेही सदर पोलिसांविरोधात तक्रार करावी, असे मतही त्यांनी पत्रकार परिषदेत प्रदर्शित केले.
Friday, 1 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment