म्हापसा, दि. २६ (प्रतिनिधी)
म्हापशातील विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर एका मोटारसायकल स्वाराने पुढे जाणार्या सायकलस्वाराला मागून ठोकर दिल्याने सायकलस्वार ठार झाला. म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक मिलिंद भुईबर यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री १.३५ च्या दरम्यान हा अपघात झाला. सायकलस्वार जोसेफ रिबेलो हा म्हापशाहून धुळेर येथे जात असताना त्याला मागून येणार्या दुचाकीस्वार सिद्धेश कपालकर या दुचाकीस्वाराने (जीए ०३ जे ५०२६) ठोकर दिली. यात दुचाकी चालक व जोेसेफ हे दोघेही जमिनीवर पडले. यात रिबेलो हा जबर जखमी झाला. त्याला १०८ रुग्णवाहिकेने आझिलोत दाखल केले असता त्याला पुढील उपचारासाठी गोमेकॉत पाठवण्यात आले. मात्र गोमेकॉत पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हवालदार श्री. हरमलकर यांनी पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे. दरम्यान, दुचाकीचालक सिद्धेश कपालकर याच्यावर आझिलोत उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले.
Monday, 27 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment