तेंबी राय येथील घटना
ठेकेदार व ट्रकचालकावर कारवाईची मागणी
मडगांव, दि.२५(प्रतिनिधी): तेंबी राय येथे आज सकाळी ट्रक आणि कार यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघे जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. हा अपघात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. रामतुल्ला कुंदूर (33,रा. आर्लेराय), महमंद रफीक कुंदी (29) आणि इरफान शिरगुड (25, रा. दवर्ली) असे या अपघातात मृत पावलेल्या दुर्देवी ठरलेल्या तिघांची नावे आहेत. अपघातातील गंभीर जखमी मौलाना अब्दूल (22, रा. रूमडामळ-दवर्ली) याच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकिय इस्पितळात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आर्ले ते बोरीपर्यंत रस्त्याचे रूंदीकरण व हॉटमिक्सीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून मंदगतीने सुरू आहे. येथील दुभाजक आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आज या तिघांना आपला प्राण गमवावा लागला असल्याचा आरोप होत आहे. या अपघातचे वृत्त समजताच अपघातातील मृतांचे आई-वडिल तसेच इतर नातेवाईक मोठया संख्येने हॉस्पिसिओ इस्पितळात जमले. मुलांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.
फोंडयाहून मडगांवच्या दिशेने ट्रक क्रमांक एमएमच ४३-ई-४९९५ हा भरधाव वेगाने निघाला होता तर पालिओ क्रमांक जीए-०१-एस-४०५४ या कारमधून चौघेजण फोंडा येथे बांधकामासाठी निघाले होते. दोन्ही वाहने भरधाव वेगाने हाकली जात होती. तेबी राय येथे आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दोन्ही वाहने समोरासमोर आली असता, त्यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरात होती की, धडकेमुळे मोठा आवाज निर्माण झाला. पालिओ कार .......तिचा चुराडा झाला. या धडकेमुळे कारमधील चालक स्टिअरिंगमध्येच अडकला होता. या अपघाताची खबर स्थानिक नागरीकांनी पोलिसांना देताच ...कुडतरी पोलिस निरिक्षक सिद्धांत शिरोडकर हे पोलिस पथकासह घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी यावेळी त्वरित १०८ रूग्णवाहिकेला पाचारण केले. अपघातामुळे घाबरलेला ट्रकचालक ट्रक तेथेच सोडून फरार झाला. यानंतर रूग्णवाहिकेतून अपघातातील चारही जणांना हॉस्पिसिओ रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिघाजणांना मृत घोषित केले. या तिघांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचे कपडे व शरीर रक्ताने माखलेले होते.
आज दुपारी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर हॉस्पिसिओचे अधिक्षक डॉ.दळवी यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले. या शवविच्छेदनादरम्यान मृतांचे नातेवाईक, मित्र असे शेकडेाजण इस्पितळाच्याबाहेर जमलेले होते. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या संबंधित ट्रकचालक व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत होती. मात्र, पोलिस निरिक्षक शिरोडकर यांनी संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. अपघातातील दोघे मृत व जखमी बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव यांच्या मतदारसंघातील आहेत.
चौकट
हॉस्पिसिओ रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी
या अपघातचे वृत्त समजताच दवर्ली, रूमडामळ, आर्ले व घोगळ येथील शेकडोजण प्रथम घटनास्थळी जमा झाले. यावेळी अपघातातील जखमींना हॉस्पिसिओमध्ये दाखल केल्याचे समजताच तेथे दुपारपर्यंत सुमारे पाचशेहून अधिक लोक जमले होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच यातील कित्येकांना अश्रु आवरता आले नाहीत. तिघा मृतांच्या आई-वडिलांचाही आक्रोश ह्दय पिळवटून टाकणारा होता. यावेळी येथे उपस्थित असणार्या पोलिस व लोकांनी त्यांना धीर दिला.
चौकट
राय येथील पेट्रोलपंपापासून तीन मीटर अंतरावरील वळणावर दुभाजकामुळे हा अपघात झाला. दुभाजकासाठी माती घातली व वाहतूक मडगांवहून बोरीला जाताना दुभाजकाच्या उजव्या बाजूचा रस्ता.... करुन डाव्या बाजूने वाहतूक सुरू होती. दोन्ही बाजूची वाहने एकाच बाजूने ये-जा करीत होती. ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू असल्याबाबत एकही सिग्नल किंवा फलक घटनास्थळी लावलेला नव्हता. तसेच गेल्या तीन वर्षांपासून बोरीपर्यंत रस्त्याचे काम मंदगतीने सुरू आहे. हे काम दीड वर्षात व्हायला हवे होते. मात्र, तीन वर्षे झाली तरी हे काम संपलेले नाही.येथील दुभाजकामुळे तर या रस्त्यावर दररोज सरासरी दोन अपघात होतात. याकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या महिन्यात राय येथे लोकांनी रास्ता रोको करून निषेध नोंदवला होता.
Sunday, 26 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment