नवी दिल्ली, दि. २६
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे संपुआ सरकारमधील काही मंत्रिपदे रिक्त आहेत. त्यांना भरण्यासोबतच आगामी ङ्गेरबदलात ‘युवराज’ राहुल गांधी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, जूनअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात ङ्गेरबदल होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून संपुआ सरकारमध्ये समाविष्ट होण्याचे राहुल गांधी सातत्याने टाळत आहेत. किंबहुना, सोनिया गांधी यासाठी तयार होत नव्हत्या. दुसरीकडे, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची राहुलला मंत्रिमंडळात घेण्याची तीव्र इच्छा आहे. आता होणार्या ङ्गेरबदलात तरी राहुलचा चेहरा दिसावा, असे त्यांच्यासकट अनेक कॉंग्रेसी नेत्यांना वाटत आहे.
शिवाय, राहुल गांधींनी आता पंतप्रधान व्हावे, असे मतही कॉंग्रेसी नेते व्यक्त करीत आहेत. मनमोहनसिंग यांना अंतर्गत विरोधही वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर राहुलचे यावेळी मंत्री होणे, जवळपास निश्चितच मानले जात आहे. कॉंग्रेसच्या सूत्रांनी मात्र याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सोनिया गांधी याविषयी अंतिम निर्णय घेतील, असे बोलले जात आहे. इंदिरा गांधी यांनीही पंतप्रधान होण्याआधी मंत्री म्हणून अनुभव घेतला होता. त्यामुळे, राहुल यांना मंत्री करण्याची चर्चा उगाच होत नाही, असे पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. पण, यात स्वत: राहुल गांधी कितपत रूची घेतात, याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
Monday, 27 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment