पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): राज्य सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील मूल्यवर्धित करात २ टक्के कपात केल्याने डिझेल दरात ७० पैसे तर पेट्रोल दरात १ रुपयाने कपात झाली आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची अधिसूचनाही जारी करण्यात आली.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना इंधन दरवाढीपासून काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी मूल्यवर्धित करात किंचित कपात करण्याची सूचना केली होती. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी तात्काळ वित्त खात्याचे अधिकारी तसेच व्यावसायिक आयुक्तालयाच्या अधिकार्यांशी चर्चा करून हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला. गोव्यात पेट्रोलवरील व्हॅट २२ टक्के तर डिझेलवरील व्हॅट २० टक्के आकारला जातो. आता यात २ टक्के कपात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री कामत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे ग्राहकांना फारसा दिलासा मिळणार नसला तरी राज्याला मात्र वार्षिक ५० कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याची माहिती देण्यात आली. घरगुती गॅस सिलिंडरवरील ४ टक्के व्हॅट कपात गेल्यावर्षी जुलै महिन्यात करण्यात आली होती.
Friday, 1 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment