पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): कोरगाव बेकायदा खाणीच्या संदर्भातील कागदपत्रे आज गुन्हा अन्वेषण विभागाने जप्त केली असल्याची माहिती मिळाली आहे. या खाणीला परवानगी होती की ती बेकायदा सुरू होती, याची पडताळी करून पाहिली जाणार असल्याची माहिती सूत्राने दिली.
सदर खाणीविरोधात खाण संचालनालयाने तसेच, अन्य सरकारी खात्यांनी कोणकोणत्या नोटिसा बजावल्यात, कोणती कारवाई करण्यात आली, याचाही माहिती मागण्यात आली आहे. दरम्यान, या खनिज मालाची वाहतूक बेकायदा सुरू असल्याची माहिती वाहतूक खात्याला असूनही कसलीच कारवाई या खात्याने केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे वाहतूक खात्याचे अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविषयीचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर करत आहेत.
Sunday, 15 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment