Sunday, 15 May 2011
जनतेचे कंबरडे मोडण्याचा प्रकार: आर्लेकर
वास्को, दि. १४ (प्रतिनिधी): गेल्या ९ महिन्यांत पेट्रोलाचे दर ९ वेळा वाढलेले असून यावेळी पेट्रोलाच्या दरात ५ रुपयांनी वाढ केल्याने कॉंग्रेस सरकारने आम जनतेचे कंबरडे मोडण्याचा प्रकार केलेला आहे. पेट्रोल दराबरोबरच इतर सर्वसामान्य वस्तूंचे दर वाढत असून केंद्रातील तसेच गोव्यातील कॉंग्रेस सरकारला आम आदमीचे म्हणवून घेण्याचा कुठलाच अधिकार नसल्याची तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी दिली. वारंवार पेट्रोल दरवाढ करून देशातील सामान्य जनतेवर कुर्हाडीचे घाव घालण्याचा प्रकार केंद्र सरकारकडून सुरू असल्याचे ते म्हणाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment