फोंडा, दि. १४ (प्रतिनिधी): कुळे येथे प्रसिद्ध दुधसागरावर सहलीसाठी आलेल्या फातोर्डा मडगाव येथील डॉमनिक निकलाव बार्बोझा (४९) यांचा आज (दि.१४) दुपारी बाराच्या सुमारास दुधसागर नदीतील सिग्नलकोंड येथे बुडून मृत्यू झाला.
फातोर्डा मडगाव परिसरातील सहा जणांचा एक सकाळी रेल्वेने दुधसागरावर सहलीसाठी आला होता. दुपारी सर्वजण तेथील धोकादायक अशा सिग्नलकोंड या ठिकाणी आंघोळ करीत असताना डॉमनिक बार्बोझा नदीत बुडाला.
त्याला त्यांच्या मित्रांनी पाण्यातून बाहेर काढून काकोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉमनिक मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी ३.३० वाजता या घटनेची माहिती कुळे पोलिसांना देण्यात आली. उपनिरीक्षक सूरज गावस यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवला.
Sunday, 15 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment