• १४ लाखांची हानी • संशयितास अटक
म्हापसा, दि. १६ (प्रतिनिधी): कळंगुट येथील कोको बीचवर पार्क केलेल्या दोन मच्छीमार बोटी जळून खाक झाल्याने एकूण १४ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली. यासंबंधी पर्वरी पोलिसांनी संशयित म्हणून कोवलासी शानी सिमॉस (पर्रा बार्देश) याला अटक केली आहे. आज (दि.१६) पहाटे तीनच्या सुमारास आपल्या बोट किनार्यावर उभ्या करून ठेवलेल्या फायबरच्या बोटींना अज्ञाताने आग लावल्याची माहिती बोटींचे मालक मार्शेल कार्मिल व फ्रान्सिस्को कार्दोज यांना मिळताच त्यांनी अग्निशामक दलाला कळविले. दलाच्या जवानांनी सुमारे पहाटे पाच वाजता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग विझवण्याचे बरेच प्रयत्न केले पण दोन्ही बोटी जळून खाक झाल्या होत्या.
बोटींत असलेले दोरखंड, जाळी, मोटर आणि इतर साहित्य मिळून सुमारे १४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पर्वरी पोलिसांनी दिली आहे.
Tuesday, 17 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment