न्यूयॉर्क, दि. १९
एका सनसनाटी आणि तेवढ्याच नाट्यमय घटनेअंतर्गत डॉम्निकस्ट्रॉस कान यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (‘आयएमएङ्ग’ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक क्षेत्र आणि फ्रान्सच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.
दरम्यान, आता ‘आयएमएफ’च्या प्रमुखपदासाठी सुरू झालेल्या शर्यतीत भारतीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया यांनीही उडी घेतल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेच्या खाजगी भेटीवर असताना न्यूयॉर्क येथील ‘सोङ्गिटेल’ हॉटेलमध्ये महिला हॉटेल कर्मचार्याचे लैंगिक शोषण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांनी ‘आयएमएङ्ग’च्या कार्यकारिणीकडे राजीनामा पाठवून दिला आहे. राजीनामा पत्रात स्ट्रॉस कान यांनी त्यांच्यावर झालेले व होत असलेले सर्व आरोप ङ्गेटाळले आहेत. त्याचवेळी या कठीण परिस्थितीत आयएमएङ्गची कुचंबणा होऊ नये’, या उद्देशाने राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.
‘मी आयएमएङ्गमध्ये केलेल्या कामगिरीमुळे सध्याच्या परिस्थितीत मला घरच्यांप्रमाणेच आपलाही पाठिंबा असेल. माझी बदनामी करण्याच्या हेतूने काही मंडळी अङ्गवा पसरवत आहेत. लवकरच सत्य परिस्थिती जगापुढे येईल’, असा विश्वास व्यक्त करत स्ट्रॉस कान यांनी राजीनामा लेखी स्वरूपात सादर केला आहे. पुढील वर्षी फ्रान्समध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एक प्रमुख दावेदार म्हणून कान यांच्याकडे पाहिले जात होते. तथापि, आता ती शक्यताच संपुष्टात आल्याचे चित्र गडद होत चालले आहे.
मॉंटेकसिंग शर्यतीत..
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष डॉम्निक स्ट्रॉस कान यांच्या राजीनाम्यानंतर नवीन अध्यक्ष शोधण्यासाठी शोधमोहीम सुरु झाली आहे. भारताच्या नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया यांचे नाव यादीमध्ये आघाडीवर आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.
अहलुवालिया यांच्याबरोबरच केमाल डेरव्हिर्र्स (तुर्कस्तान) , ख्रिस्तीन लेगार्ड (ङ्ग्रान्स), ट्रिव्हर मॅन्युएल (दक्षिण आङ्ग्रिका) आणि गॉर्डन ब्राऊन (ब्रिटनचे माजी पंतप्रधान) यांचीही नावे शर्यतीमध्ये आहेत.
आत्महत्या करू नये म्हणून...
अतितणावामुळे स्ट्रॉस कान यांनी आत्महत्येचा प्रयत्न करू नये, यासाठी अमेरिकेतील तुरुंगाधिकारी विशेष काळजी घेत आहेत. कान यांना शुक्रवारपर्यंत तुरुंगवासात ठेवण्यात येणार आहे. त्यांना लेस नसलेले बूट देण्यात आले असून, दर १५ ते २० मिनिटांनी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
Friday, 20 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment