सर्व उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
पणजी, दि.१६ (प्रतिनिधी): मलेरिया सर्वेक्षकांचे उपोषण आज (शनिवारी) सलग दहाव्या दिवशीही सुरूच असून त्यापैकी बहुतांश उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. विशेष म्हणजे त्यांची तातडीने दखल घेणे राहिले दूरच; उलट हे उपोषण समाप्त करावे यासाठी त्यांच्यावर उच्च पातळीवरून दबाव आणला जात असल्याचे समजते.
विद्यमान सरकारच्या कारकिर्दीत विक्रमी आंदोलने झाली आहेत. मात्र एवढा दीर्घ काळ आपल्या न्याय्य मागणीसाठी लांबलेले हे पहिलेच आंदोलन ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी या कर्मचार्यांची भेट घेतली; तथापि त्यांना सेवेत कायम करण्याचे ठोस आश्वासन ते देऊ शकले नाहीत. सोमवार दि .१८ एप्रिल रोजी याबाबत चर्चा करू, असे गुळमुळीत आश्वासन या कर्मचार्यांना देण्यात आले आहे. सदर आश्वासनाबद्दल खात्री वाटत नसल्यामुळे सोमवारी चर्चा होऊन सेवेत कायम केल्याचे पत्र हाती येईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या कर्मचार्यांची भेट घेतली असता त्यांच्यात बोलण्याचेही त्राण उरले नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. ते कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या मनःस्थितीत नाहीत.मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे व आम्हाला सेवेत कायम करावे अशी विनवणी या मंडळींनी केली. दरम्यान, या उपोषणमुळे सरकारची नाचक्की होत असल्याने ते मागे घ्यावे यासाठी सदर कर्मचार्यांवर उच्च पातळीवरुन दबाब आणला जात असल्याचे कळते.
Sunday, 17 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment