पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): खारीवाड्यावरील घरे पाडल्याने त्याच्या निषेधार्थ बार्ज, मच्छीमारी नौका उभ्या करून जलवाहतूक अडवल्याने ‘त्या’ जहाजांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा न्यायदंडाधिकारी प्रसन्न आचार्य यांनी दिले आहेत. कालपासून मुरगाव पोर्ट ट्रस्टमधून निघणार्या सर्व जहाजांचा मार्ग शंभर मच्छीमारी नौका, २० बार्ज आणि ४० ते ४५ होड्या उभ्या करून अडवण्यात आला होता. यामुळे जलवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
काल दुपारी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव व अन्य अधिकार्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेऊन चर्चा केली. परंतु, त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे तटरक्षक दलाच्या मदतीने जलवाहतूक अडवलेल्या सर्व जहाजांवर कारवाई करण्याचे आदेश दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक व वास्को पोलिस निरीक्षकाला देण्यात आले. दरम्यान, आज सायंकाळी उशिरापर्यंत या नौकांवर कोणताही कारवाई करण्यात आली नव्हती. गेल्या दोन दिवसापासून जल वाहतूक ठप्प झाल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा ‘एमपीटी’ने केला आहे.
Sunday, 17 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment