बंगलोर, दि. २२ : कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनी लोकपाल मसुदा समितीवरून राजीनामा देऊ नये, यासाठी त्यांच्या समर्थकांकडून दबाव वाढत असतानाच, या समितीवर कायम राहायचे की नाही, याबाबतचा निर्णय आपण उद्या शनिवारी जाहीर करणार असल्याचे हेगडे यांनी आज स्पष्ट केले.
मसुदा समितीवर असलेल्या सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांविरोधात राजकीय मंडळींनी चालविलेल्या अपप्रचारामुळे आपण व्यथित झालो असून, या समितीवर कायम राहण्याची आता आपली मुळीच इच्छा नाही, असे काल हेगडे यांनी सांगितले होते. त्यानंतर आज सकाळपासूनच हेगडे यांच्या समर्थकांनी त्यांची मनवळवणी करण्याची मोहीमच हाती घेतली. हेगडे यांनी राजीनामा देऊ नये, अशी विनंती त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
याच मुद्यावर बोलताना हेगडे यांनी आज वृत्तसंस्थेशी बोलताना, ‘‘आपला निर्णय आपण उद्या जाहीर करू,’’ असे सांगितले. मी उद्या दिल्लीला जात आहे. तिथे मी माझ्या सहकार्यांशी चर्चा करेन आणि अंतिम निर्णय घेईन, असे ते म्हणाले.
माझ्या वक्तव्यामुळे आपल्या भावना दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो, या कॉंगे्रसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांचे वक्तव्य मी अद्याप वाचलेले नाही, एवढेच त्यांनी सांगितले.
Saturday, 23 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment