२ जीस्पेक्ट्रम घोटाळा
नवी दिल्ली, दि. २० (रवींद्र दाणी): २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात आज अनिल धीरुभाई अंबानी समूहाच्या तिघा तर डीबी रियालिटीच्या दुसर्या अधिकार्यास अटक झाल्यानंतर अनिल अंबानी व केंद्रीय कृषिमंत्री श्री. शरद पवार यांच्याभोवतालचा ङ्गास आवळला जाऊ लागला असल्याचे मानले जात आहे.
स्पेक्ट्रम घोटाळ्यात प्रथमच अंबानी समूहाच्या अधिकार्यांना अटक झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांनाही चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात बोलविण्यात आले होते. या समूहाच्या तिघा अधिकार्यांना आज अटक झाल्यानंतर अनिल अंबानी यांच्या समस्या वाढण्याची शक्यता असल्याचे मानले जाते.
दुसरीकडे डीबी रियालिटीचे विनोद गोयंका यांची अटक पवार यांच्यासाठी धोक्याचा इशारा मानला जातो. स्पेक्ट्रम घोटाळ्यात अटक होणारे गोयंका हे पवार यांचे दुसरे मित्र आहेत. डीबी रियालिटीचे शाहिद बलवा यांना यापूर्वीच अटक झाली असून ते तिहार कारागृहात आहेत.
मुंबईतील डीबी रियालिटी या कंपनीशी शरद पवार यांचे ङ्गार जवळचे संबंध असल्याची माहिती टाटा समूहाच्या लॉबिस्ट नीरा राडिया यांनी सीबीआयला दिली आहे. या माहितीचा वापर सीबीआयने न्यायालयात केला आहे.
दिल्लीतील एका स्थानिक न्यायालयाने आज डीबी रियालिटीचे विनोद गोयंका यांना अटक केल्यानंतर, पवार यांची संकटे वाढतील असे मानले जाते. या घोटाळ्याशी द्रमुक नेते करुणानिधी व शरद पवार यांचा ङ्गार जवळचा संबंध असल्याचे सीबीआयला वाटत आहे.
तामिळनाडूतील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने सीबीआयला करुणानिधींची मुलगी कानीमोझीविरुध्द कारवाई करण्याची परवानगी दिली नव्हती. तेथील निवडणुका आटोपताच कानीमोझीविरुद्धकारवाई होईल, असे मानले जाते.
डीबी रियालिटीविरुद्ध कारवाई सुरू करून सीबीआयने पवार यांना योग्य तो संकेत दिला आहे. पवार यांच्याविरुद्धही कारवाई सुरू होईल काय, याचे उत्तर योग्य वेळी मिळेल असे सीबीआयमधून सांगितले जात आहे.
आरोपींना१४ दिवसांची कोठडी
नवी दिल्ली, दि. २० : टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी आज विशेष न्यायालयाने विनोद गोएंकांसह पाच जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष सीबीआय न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी हे आदेश दिले. या पाच जणांनी जामीन अर्ज दाखल केला होता. तो ङ्गेटाळून लावत न्यायाधीशांनी त्यांना कोठडीत पाठविले.
स्वान टेलिकॉमचे संचालक विनोद गोएंका, युनिटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा, अनिल धीरूभाई अंबानी समूहातील गौतम दोशी, हरी नायर आणि सुरेंद्र पिपारा यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्वांची तिहार कारागृहात रवानगी केली जाणार आहे.
टू-जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी सीबीआयने तयार केलेल्या ८० हजार पानांच्या आरोपपत्रामध्ये या पाच जणांची नावे आहेत. पण, त्यांना आजवर अटक झाली नव्हती. आता कोर्टाने अर्ज ङ्गेटाळल्याने त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता हायकोर्टात धाव
सीबीआय कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींनी या निर्णयाला लगेचच दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले.
सीबीआय कोर्टाने या पाचही जणांना जामीन न देण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांना अटक करून तिहार कारागृहात पाठविण्यात आले. दरम्यान, त्यांच्या जामीनाचा अर्ज उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. न्या. विक्रमजीत सेन आणि सिद्धार्थ मृदूल यांच्या न्यायासनासमोर हा अर्ज दाखल झाला. उद्या यावर सुनावणी होणार आहे.
Thursday, 21 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment