Monday, 18 April 2011
शिवोली तार अपघातात सायकलस्वार वृद्ध ठार
म्हापसा, दि. १७ (प्रतिनिधी): शिवोली येथे एका सायकलस्वाराला कारने मागून येत धक्का दिल्याने सायकलस्वार रमेश रामा बांदेकर (कामुर्ली) यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१७) सकाळी साडेनऊच्यादरम्यान घडली. सविस्तर माहितीनुसार कामुर्ली येथून बांदेकर हे शिवोली तार येथे सायकलने आले असता मागून येणार्या कारने(जीए ०७ ई ०६३०) त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सायकलला धडक बसून बांदेकर हे खाली जमिनीवर कोसळले. त्यांना त्वरित १०८ रुग्णवाहिकेने बांबोळी येथे गोमेकॉत उपचारासाठी पाठवले असता दुपारी ११च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हणजूण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक विश्वजित चोडणकर यांनी पंचनामा करत कार चालक शरीफ घोडामती रा. आगशी याला अटक केली असून सदर कारही ताब्यात घेतली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment