गवळीवाडा प्रभागातील लोक आक्रमक
पणजी, दि.२४ (प्रतिनिधी): चिंबल येथील श्री देवी चिंबलकरीण देवीच्या पुरातन विहिरीभोवताली एका बिल्डरने पंचायतीच्या मान्यतेने बांधकाम सुरू केल्यामुळे या गावातील लोक संतप्त बनले आहेत. या विहिरीला विशेष महत्त्व असून अनेकांच्या धार्मिक भावनाही या ऐतिहासिक वास्तूशी निगडीत आहेत. त्यामुळे सुरू असलेले बांधकाम त्वरित बंद करून ही विहीर पूर्ववत करावी, अशी मागणी गवळेभाट प्रभागातील ग्रामस्थांनी केली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, चिंबल पंचायत क्षेत्रातील गवळेभाट वाड्यावर एक पुरातनकालीन विहीर आहे. या विहिरीला येथील ग्रामदेवता श्री चिंबलकरीण देवीची विहीर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ही विहीर अनेकांच्या श्रद्धेचा विषय असून तिच्याशी त्यांच्या धार्मिक भावना गुंतलेल्या आहेत. या विहिरीभोवतालची जागा ‘शारंग’ नामक एका बिल्डरने विकत घेतली असून त्याच्याकडून नगरनियोजन खात्याची व स्थानिक पंचायतीची परवानगी मिळवून सध्या जोरात काम सुरू आहे. या कामाला ग्रामस्थांनी विरोध करूनही स्थानिक पंचायतीकडून मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे सरळसरळ दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान, या बांधकामामुळे सदर पुरातन विहिरीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे श्री देवी चिंबलकरणीच्या उत्सवप्रसंगी या विहिरीवर धार्मिक विधी केले जातात. ही विहीरच नष्ट करण्याचा घाट घालून एकार्थाने पंचायतीने येथील लोकांच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केल्याची टीका येथील ग्रामस्थांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, इथे सुरू असलेल्या या बांधकामाच्या मूळ आराखड्यात या विहिरीचा उल्लेखच नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. याप्रकरणी सरपंच चंद्रकांत कुंकळकर यांना विचारले असता, ते मात्र या बांधकामाचे समर्थनच करतात. विहिरीच्या सभोवताली बांधकाम सुरू असूनही, बिल्डरने विहीर बुजवली तर आपण सरपंचपदाचा राजीनामा देईन, असे म्हणून ते जनतेलाही बुचकळ्यात टाकण्याचे प्रयत्न करीत असल्याचेही दिसून आले आहे.
दरम्यान, येथील संतप्त ग्रामस्थांनी आज पत्रकारांना प्रत्यक्ष बांधकामस्थळी नेऊन सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली. या विहिरीबाबत सरपंच कितीही बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असले तरी ज्या पद्धतीने इथे बांधकाम सुरू आहे ते पाहता या विहिरीचे अस्तित्व धोक्यात आहे हे स्पष्टपणे जाणवते. सुमारे पन्नास ते साठ फूट खोल असलेल्या या देवीच्या विहिरीत वर्षाचे बाराही महिने पाणी असते. या विहिरीचा पाण्याचा येथील बांधकामासाठी वापर होत असल्याचेही यावेळी दिसून आले. पंचायतीने या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहावे व सदर इमारतीचे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी करीत ग्रामस्थांच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील व त्याला सर्वस्वी पंचायत जबाबदार राहील,असा इशाराही या लोकांनी दिला आहे.
Monday, 25 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
We are uhe solid first platform for modeling newcomers to achieve there new dreams. The first to train and promote out models at our expense to avoid burden on them. Join the most popular agency if you modelling jobs in Delhi for female freshers, models, students, housewives aiming to start there modeling career. We are top modelling agency in Delhi offering modelling jobs in Delhi for upcoming female freshers or experienced models who want to join lingerie modeling agencies.
modeling agencies in Delhi
modeling agencies
modeling jobs
modeling auditions
model coordinators
modeling jobs in Delhi
Post a Comment